असा पाऊस

Submitted by पाषाणभेद on 30 June, 2019 - 14:11

नभातून पडावा पाऊस
मनात उतरावा पाऊस

धरतीमध्ये थेंब थेंब
रुजवावा पाऊस

झाडांवरल्या थेंबातूनी
झरावा पाऊस

कौलांच्या पागोळ्यांतूनी
ओघळावा पाऊस

हातातल्या ओंजळीत
पकडूनी प्यावा पाऊस

अधिर ओठांचा स्पर्शाने
हलकेच चुंबावा पाऊस

ललनेच्या केसांतूनी
झटकावा पाऊस

गावा पाऊस घ्यावा पाऊस
पाऊस घेवून आपणही व्हावे पाऊस

- पाभे
३०/०६/२०१९

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान जमलीय पाषाणभेद साहेब ... पण सध्या जो पावसाने धुमाकूळ घातलाय , त्यावरही अजून एक बनायला पाहिजे ...

खिलजी उवाच