''केल्याने होत आहे रे...'' ह्या उक्तीनुसार गेल्या वर्षी आपल्या काही मायबोलीकरांनी एकत्र येऊन पुण्याच्या बुधवार पेठ येथील रेड लाईट एरियामधील नूतन समर्थ प्राथमिक विद्यालयात 'हसत खेळत स्पोकन इंग्लिश'चे वर्ग घ्यायला सुरुवात केली. हे विद्यालय परिस्थितीने निम्नवर्गीय व रेड लाइट एरियातील मुलामुलींना शिक्षण देण्याचे कार्य करते. ऑगस्ट २०१३ पासून सुरु केलेल्या 'हसत खेळत स्पोकन इंग्लिश' ह्या उपक्रमाला मायबोलीकरांच्या माध्यमातून मिळालेले स्वयंसेवक शिक्षक व शाळेतील विद्यार्थ्यांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला.
काय करतो आपण ह्या उपक्रमात?
"आई, माझ्याकडे सगळीच लहान मुलांची पुस्तके आहेत. आता मला मोठ्या मुलांची पुस्तके घेऊन दे."
"हे काय!? हे नको मला. खुप वेळा वाचुन झालंय माझं. आणि ते पण नको. मोठ्या मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे, लहान मुलांचं !!"
असे संवाद तुमच्या घरी ऐकु येतात का? आमच्याकडे सुरु झालेत सध्या.
पुस्तके किती आणि कोणती विकत घ्यायची, पुन्हा ठेवायची कुठे हे प्रश्न आहेतच.
मग मला वाटले इथे आपण मुलांचा पुस्तक क्लब सुरु केला तर?
- महिन्यातुन एकदा किंवा जसे जमेल तसे एकत्र भेटुन मुलांची पुस्तके शेअर करायची.
इथे बच्चेकंपनींना करता येण्याजोग्या पाककृती, टीप्स, आयडियाज इथे शेअर करू या
सुरुवात करण्याआधी काही साध्याच पण महत्वाच्या गोष्टी:
स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यापूर्वी आणि करताना ज्युनिअर शेफ्सनी घ्यायची काळजी:
१. हात स्वच्छ साबण लावुन धुवुन घावेत.
२. केस नीट बाधुंन घ्यावेत.
३. साधे, अंगासरशी कॉटनचे कपडे घालावेत.
४. सूरी, कात्री, किसणी इ इ धारधार वस्तु वापरताना आई बाबांची मदत घ्यावी. बाजारात कमी धार असलेल्या मुलांना वापरता येण्याजोग्या सुर्या/कात्र्या मिळतात त्या वापराव्यात.
उन्हाळ्याच्या सुट्टीशी आपल्या कितीतरी छान आठवणी निगडीत असतात ना? मे महिन्याची सुट्टी म्हणजे आंबे, पत्ते, पापड-कुरडया, पाहुणे, गाव असे छानसे समिकरण असते. यातले काही घटक बदललेही असतील. तर मग, आपापल्या अनुभवातील, मनातील मे महिना इथे मांडूयात का?
मित्रांनो, ह्या मध्ये आपण सेफ्टी डोअर, इतर घरगुती उपकरणे, घरच्या माहितीची गुप्तता, घरात कामाला येणारे व बिल घ्यायला येणारे यांच्याशी कसे वागावे, वाहन असेल तर त्याची सुरक्षितता इत्यादी बद्दल चर्चा करूया. सिक्युरिटी गार्ड किंवा एजन्सी वगैरे इथे अपेक्षित नाही. आणि घर म्हणजे अगदी सदनिकेपासून ते बंगल्यापर्यंत अभिप्रेत आहे. चला कुणीतरी सुरवात करा बरं