तुम्ही तुमच्या मुलांकडून काय शिकला?

Submitted by मी अश्विनी on 7 February, 2019 - 14:05

नवीन पिडी, जनरेशन गॅप आणि त्या अनुषंगाने येणार्‍या अनुभवांबद्दल आपण ऊठता बसता बोलतो, तक्रार करतो. पावलोपावली ह्या गॅपचा कडू गोड अनुभव देणारे आप्ल्या सगळ्यात जवळचे लोक म्हणजे आपलीच मुले.
आपण नवपालक असो वा सिनियर सिटिझन, आपल्यापेक्षा २५-३० वर्ष तरूण असणार्‍या आपल्याच सावलीतून आपल्याला शिकण्यासारखे खूप असते. बाळलीला दाखवणारी तान्ही मुले वा घराबाहेरच्या जगाशी दोन हात करणारी शिकती-करती-सवरती तरूण मुले कळत-नकळत आपल्याला नेहमीच काहीतरी चांगले शिकवून जातात. प्रत्येक वेळा आपला ईगो ही शिकवण आपल्याला लक्षात ठेऊ देईल असे नाही, तरीही मुलांचा निरागसपणा, अनुभवांची कमतरता पण फ्रेश आयडीयांनी भरलेला मेंदू कधीकधी नेहमीच्याच गोष्टी वेगळ्या पण चांगल्या दृष्टीकोनातून दाखवून जातात.

ऊदा.. माझा मुलगा दीड वर्षांचा असल्यापासून जेवतांना त्याच्या तीन खाणे असलेल्या एकाच प्लेट मध्ये एकाच खाण्यात ठेवलेला पदार्थ खात असे. तोच किंवा दुसरा पदार्थ दुसर्‍या खाण्यात ठेवलेला असेल किंवा एकदा संपल्यावर त्याच खाण्यात पुन्हा ठेवला तरी त्याला हात सुद्धा लावायचा नाही मग तो आवडीचा असला तरी.
सध्या त्याचा आहार चौरस झाला आहे आणि ईतर दोन खाण्यातही पदार्थ ठेवलेले असतात पण तरी तीच खाण्यांची प्लेट आणि पहिल्याने दिले तेवढेच खाणे आहे तसेच आहे. खरं सांगते मी सुद्धा हळूहळू त्याचे पाहून पोर्शन कंट्रोल करायला शिकले.
मोठा होत गेला तसा त्याला त्याच्या बाबांच्या काहीबाही डब्यातून घेऊन तोंडात टाकण्याचीसवय सुद्धा आवडेनाशी झाली. मग काय बाबाला सुद्धा ही अवेळी वरचेवर खाण्याची सवय सोडावी लागली.

माझ्या सहावीतल्या भाच्चीकडून मी सॉरी किंवा थँक्यू बोलतांना मख्ख चेहर्‍रा न ठेवता खरोखरच चेहर्‍यावर त्या शब्दांना साजेसा भाव ठेवल्यास त्या शब्दांचा प्रभाव कितीतरी पटीने वाढतो आणि समोरच्यालाही मनातून चांगले वाटते हे सुद्धा नव्याने शिकले.

तुम्ही ऊचलल्या आहेत का मुलांच्या अशा चांगल्या शिकवणी/ सवयी?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच विषय घेतला आहेत अश्विनी. मी माझ्या ५ वर्षाच्या मुलाकडून राग, चिडचिड पटकन विसरायला शिकतो आहे. कधी त्याला रागवलो किंवा चिडचिड झाली कि तो पण खट्टु होतो. कधी कधी तर एकदम गप्प होतो पण पुढच्या १०-१५ मिनिटात तो परत हसत खेळत असतो. त्याच्या डोळ्यात तीच चमक आणि उत्साह असतो. माझे तसे नाही. माझा राग खूप वेळ रहातो... तो पटकन विसरायला मी मुलाकडून शिकतो आहे Happy

माझा मोठा मुलगा रांगायला लागला आणि त्यानंतर उभा राहण्यासाठी धडपड करायला लागला. कित्येकदा तो पडत होता, बहुतेक महिनाभर ही त्याची उभे राहण्याची धडपड सुरु होती. प्रत्येकवेळी उभा राहिल्यावर, किंवा राह्तांना तोल सांभाळला न गेल्याने तो धपाधप पडत असे. तरी हा त्रास सहन करुनही तो प्रत्येक वेळी परत उठून उभा राहण्याची पराकाष्ठा करत राही. आणि एक दिवस तो खरोखर आपल्या पायावर उभा राहिलाच. तो पहिल्यांदा पूर्णपणे तोल सांभाळून उभा रहिला तो क्षण मी कॅमेरात टिपून घेतला आहे. त्याची ती जिद्द चिकाटी नैसर्गिकच होती, प्रत्येक बाळ उभे राहतांना या अनुभवातुन, अवस्थेतून जातेच. परंतु रोज रोज ते दृश्य त्यची धड्पड डोळ्यासमोर पाहुन पाहून माझ्या मनात प्रचंड आत्मविश्वास संचारला. त्याचे ते धडपडणे बघून मी ही विचार केला की आपण नोकरी सोडून व्यवसाय सुरु करावा. कदाचित आपणही असेच अपयशी होऊ परंतु ह्या धडपडीतूनच आपल्याला पुढे शक्ती येइल व आपन समर्थपणे उभे राहू शकू. मी माझ्या मुलाकडून हे शिकलो.

त्यानंतर माझ्या दुसर्‍या मुलाकडून मी सेल्स चे स्किल शिकलो. सेल्स बद्दल मला शून्य माहिती होती. गेल्या तीन चार वर्षापासून मी ह्या प्रकारात रस घ्यायला सुरुवात केली. तर माझ्या मुलाने मी जे वाचत शिकत होतो ते प्रॅक्टिकली कर्रुन दाखवायला सुरुवात केली. तो अगदी लहान असल्यापासून त्याला हवे ते कसे मिळवावे हे पक्के ठावूक असते. आपण नक्की काय केले म्हटले की समोरचा निरुत्तर होऊन आपल्याला हवे ते देतो हे त्याच्याकडे पाहून कळले. पुढे तो बोलायला लागल्यावर तर त्याच्याशी निगोशिएशन करणे म्हणजे डोक्याला ताप झाले. Happy त्याची बोलण्याची, शब्द निवडण्याची, पटवून सांगण्याची पद्धत इतकी भारी आहे की आपण निगोशिएशनमध्ये हरतोच हरतो. जणू हा जन्मजात हाडाचा सेल्समन आहे. त्याच्यापासून सातात्य, चिकाटी, हवे ते मिळवण्यासाठी योग्य त्या पद्धतीने समोरच्याला पटवणे ह्या गोष्टी शिकलो.

माझ्यासाठी ह्या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या ठरल्या.

मस्त विषय आहे.>>> +१.
अशाच विषयावर एक इंग्रजी कविता होती."लहान मूल किती उत्सुकतेने,निखळ आनंदाने सभोवताल निरखित असते.अरे हा आनंद, मी रोजच्या जीवनात का बरे घेऊ शकत नाही? थँक्स माझ्या चिमुकल्या,मला तू छोट्या छोट्या गोष्टींत रस घ्यायला शिकवलंस". अशा अर्थाची ती कविता होती.

मी अश्विनी,तुमचं कौतुक आणि अभिनंदन हा धागा काढल्याबाबत!

छान धागा आहे !!! मी माझ्या मुलीकडून नेहमी खरे बोलावे, खोटे बोलू नये हे शिकण्याचा प्रयत्न करतोय.

सध्या माझ्या छोट्या कडून निरागसता शिकतेय ...त्याच्या निरागस डोळ्यांतील भाव पाहून वाटते कुठे हरवली आपल्यातली निरागसता ..खऱ्या खोट्याच्या दुनियेत फार आप मतलबी झालोय आपण
...वर सांगितल्याप्रमाणे पहिलं रांगताना, पहिलं पाउल टाकताना ज्या जिद्दीने मुले प्रयत्न करतात ते अंगी बाणवायचा प्रयत्न करतेय ...