सुरुवातीला "आम्ही कशाला, आम्ही कशाला - " इथून सुरवात होऊन “आम्हीसुद्धा दिडक्याच मोजल्या आहेत ना ? - मग ज्युनिअर ऋन्मेश चा बाप पहिल्या रांगेत आणि आम्ही मागे, हे का? त्याला पावणेदोनशे चाहते, म्हणून?" असा पारा चढत गेला.
"अरे जा !! - टीपापाकराच्या पायाशी त्या वाडेकराच्या बच्याला बसायला सांगतोस काय- "
"आरे पत्त्या कुठाय तुजा.! किती फोन केलं मी.! सगळं बंदच असतंय गा कायम?"
हॅलोs ? कोण ?
"बास का आता? आता आवाज पन इसरला का आमचा?"
नाय रे.. आवाज नाय ओळखला मी.
"आरे पवन बोलतोय पवन.!"
पवन ?.. पवन ताटे का? मला आवाजाची काय ओळख
लागली नाय रे आजून.
"पवन जाधव बोलतो. पळशीवरनं."
आरे हां हां.. हां.. बोल बोल.. कसा काय फोन केला..?
"काय नाय.. बगावं म्हणलं काय चाललंय..! तुजा काय फोन नाय काय नाय..कुठं हाईस कुटं तू ? "
हाय की.. हितंचाय.. चाललंय निवांत.
लिफ्टमधून बाहेर येऊन अमृताने तिच्या आठव्या मजल्यावरील फ्लॅटचे दार लॅच कीने उघडले. भराभर सगळे लाइट्स लावून, बेडरूमचा एसी चालू करून ती रेस्टिंग चेअरवर रिलॅक्स होऊन रेलली. डोळे मिटून ती आशुतोष बद्दलच्या विचारांत हरवली. "काय करत असेल अाशु? एव्हाना पोहोचला असेल का बंगलोरला?? उद्या त्याला आपल्या फ्लॅटचा ताबा मिळेल. पुढच्या विकेंडला जाऊया बेंगलोरला फ्लॅट बघायला म्हणजे इंटेरिअर डिझाइनर सोबत बोलून, ठरवून, लग्नाआधीच फ्लॅट डेकोरेट करून घेता येईल."
तर झालेय असे, कि माझ्याकडे आणि माझ्या मामेसाबांकडे एवढ्यातल्या एवढ्यात आसपास अनेक लग्नाळू मुला मुलींची स्थळे व माहीती गोळा झालेली आहे. योगायोग म्हणा किंवा काहीही.. पण एका जवळच्या मैत्रीणीकडे आणि तिच्या आईकडेही अशीच बरीच स्थळे व त्यांची माहीती गोळा झालेली आहे. त्यात कोणत्या मुलामुलींच्या अपेक्षा एकमेकांशी मॅच होतात ते शोधून शोधून आम्ही एकमेकांना पाठवतो आहोच. पण या सगळ्यात काही वेळ द्यावा लागतो आहे आणि हे सगळे एफर्ट्स अन-ऑर्गनाईझ्ड पद्ध्तीने चालू आहेत.शिवाय आमच्याकडे असलेल्या कोणाच्याच अपेक्षेत न बसणारे पण अनेकजण आहेत.
लग्नाचा क्लास - ५
पालकांची भूमिका कठीण आहे.(२) ले. मंगला मराठे
लग्न ठरवताना प्रत्येक बाबतीत मुलांशी बोलावे, अगदी स्थळ बघायच्या सुरवातीपासून हे पालकांना पटले तरी ती गोष्ट त्यांच्यासाठी तितकी सोपी नसते. कारण साधारण पणे हा संवाद असा असतो --
“आई हे कसले रुमाल आणलेस ग ?” अजय आईवर वैतागला.
“काय झाल; चांगल्या क्वालिटीचे तर आहेत.”
“चांगल्या क्वालिटीचे आहेत ग. पण नॉट ऑफ माय स्टाइल. मला नकोत हे. हयांच तू काहीतरी करून टाक. नाहीतर बाबांना देऊन टाक.”
लग्नाचा क्लास – ३
‘हल्लीच्या मुली’ ले. मंगला मराठे
नमस्कार मंडळी,
तर या वर्षी आपण श्रावणमासात आदर्श पती स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत लग्नात किंवा लिव्ह ईन रिलेशनशिप मधे असलेल्या सर्वांना भाग घेता येईल. प्रश्न तयार करताना व्हॉट्सअप्प/ फेसबूक वर ढकलल्या जाणार्या सर्व पाणचट विनोदांचा आधार घेण्यात आला आहे.
स्पर्धा अतिशय सोप्पी आहे. तुम्ही फक्त खालील सर्व मुद्द्यांसमोर लिहिलेल्या मार्कांप्रमाणे स्वतःच्या पतीला अथवा स्वतःला गुण द्यायचे आहेत. ज्यांच्या गुणाची बेरीज जास्त होइल त्यांना विजेते घोषित करण्यात येईल.
सेमी ईंग्रजी वाल्यांसाठी टीपः- ऊणे म्हणजे मायनस आणि अधिक म्हणजे प्लस....
लग्नाचा क्लास – २
आय ॲम कन्फ्युज्ड ले. मंगला मराठे