शासन(सरकार)

आजारच नसलेल्या पेशंटचं टेन्शन

Submitted by डॉ अशोक on 10 September, 2013 - 12:23

आजारच नसलेल्या पेशंटचं टेन्शन

रोगावर उपचार करतांना पेशंटला टेन्शन असतं तसंच डॉक्टरवर ही असतं. कालांतरानं डॉक्टरांना याची संवय होते. पण समजा की पेशंटला मुळातच काही आजार नाही तर मग? तुम्ही म्हणाल मग काय प्रॉब्लेम आहे? टेन्शनचं कारणच काय? तर मग ऐका :आजारच नसलेल्या पेशंटची कहाणी.

पिंपरीचिंचवडमधिल मृत्युचे सापळे - सौजन्य:- यमदूत बनलेले संघटीत गुन्हेगार

Submitted by limbutimbu on 6 September, 2013 - 05:48

पिंपरी चिंचवडमधिल मृत्युचे सापळे फोटो रुपाने इथे मांडण्यासाठी हा धागा केला असे.

पिंपरी चिंचवडच्या थर्मॅक्स चौकातील हा मृत्युचा सापळा गेले पन्धरा दिवस बळीची वाट बघतो आहे.
कदाचित एखाददोन बळी मिळाल्यानंतरच हा खड्डा बुजेल असे वाटते.

Thermax Chauwk 1 DSCN2510.jpg

संघटीत गुन्हेगारीबाबत एकही गृप मायबोलिवर नाही?

नोकरी शोधात होणारी फसवणूक

Submitted by limbutimbu on 6 September, 2013 - 05:25

आत्ताच थोरल्याचा फोन आला की एक व्हीपीपी आली आहे, ५०० रुपये भरुन सोडवुन घ्यायला सांगत आहे, कुणा SSS Industrial Job Services कडून आली आहे, मी आत्ता पोस्टमनला परत पाठविले आहे, तुम्ही नेटवरुन माहिती काढाल का?
माहिती काढल्यावर त्या नावाच्या एक दोन साईट्स सोडता, बनावट कॉल लेटर्स/गार्बेजची व्हीपीपी पाठवुन होणार्‍या फसवणूकीच्या तक्रारींनी भरलेले गुगलचे पान नजरेस पडले. तत्काळ मुलास फोन करुन सांगितले की ती व्हीपीपी तू घेऊ नकोस, घेतलीस तर फुकाचा फसशील. जी गोष्ट "विकतची" म्हणून तू मागवलेलीच नाहीस, त्याकरता पैसे का भरतोस?
याच संदर्भात पुढील बातमी देखिल पहा

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-४)

Submitted by अभय आर्वीकर on 27 August, 2013 - 07:56

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-४)

दोषी कोण?

Submitted by विजय देशमुख on 27 August, 2013 - 06:56

अजुन एक बातमी, अन सगळ्यांची चीडचीड. तारस्वरात ओरडणारे चॅनेल्सवाले आणि मग सरकारची कासवाच्या, किंबहुना अधिकच संथपणे काही प्रतिक्रिया. मागील काही दिवसात ह्या घटना पुन्हा-पुन्हा होत आहेत. या घटनांनी "बलात्कार्‍याला फाशीच" दिली पाहिजे असे म्हणणारेसुद्धा वाढत आहेत. पण खरच फक्त ज्यांनी प्रत्यक्ष गुन्हा केला तेच दोषी आहेत का? त्यांना त्वरीत पकडणे, खट्ला चालवणे, शिक्षा करणे, इतकं पुरसं आहे का?

विषय क्र. २ - जलतज्ज्ञ डॉ. माधव चितळे

Submitted by kanksha on 25 August, 2013 - 14:19

१३ ऑगस्ट १९९३ - स्टॉकहोममधील नगर सभागृह एका देखण्या समारंभात रंगलं होतं. गेली कित्येक वर्षे नोबेल पुरस्कार समारंभाचं साक्षीदार असलेलं हे सभागृह्. सी. व्ही. रमणांनंतर ६३ वर्षांनी एका भारतीयाचा या सभागृहात स्वीडनच्या राजाच्या हस्ते सन्मान होत होता. ही भारतीय व्यक्ती म्हणजे जलतज्ज्ञ डॉ. माधव आत्माराम चितळे. चाळीसगावसारख्या एका छोट्याशा गावात डॉ. चितळे यांचा जन्म झाला. शालांत परीक्षेत गुणवत्ता यादीत महाराष्ट्रातून दुस-या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्यानंतर पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून सुवर्णपदकासहित बी.ई. सिव्हीलची पदवी प्राप्त करून चितळे यांनी सरकारी नोकरीत प्रवेश केला.

विषय क्र. १. - राममंदिर निर्माण चळवळ

Submitted by limbutimbu on 24 August, 2013 - 07:24

विषय क्र. १. राममंदिर निर्माण चळवळ

पार्श्वभूमि:

रूपयाचे चिन्ह अन रूपयाचे अवमुल्यन

Submitted by पाषाणभेद on 17 August, 2013 - 21:05

रूपयाचे चिन्ह अन रूपयाचे अवमुल्यन

जुलै २०१० मध्ये भारतीय रूपया या चलनाचे नविन चिन्ह स्विकारले गेले. दैनिक सामनाच्या या बातमीनुसार अंकशास्त्रतज्ञ तसेच वास्तुशास्त्र, लिपीशास्त्र यांच्या तज्ञांच्या मते हे चिन्ह अशुभ आहे. केवळ या कारणामुळे रूपया या चलनाचे अवमुल्यन अंतरराष्ट्रीय बाजारात होते आहे असेही या तज्ञांना वाटते. हे चिन्ह बदलण्यात यावे व त्याचबरोबर नोटांवर असलेली गांधीजींच्या प्रतिमेचीही दिशा बदलवण्यात यावी असे या तज्ञांनी सुचवलेले आहे.

शब्दखुणा: 

गुजरात, बिहार इ. राज्यांचा विकास : खरे काय ?

Submitted by उद्दाम हसेन on 15 August, 2013 - 13:57

राज्यांच्या विकासात सध्या गुजरात मॉडेल आणि बिहार मॉडेल असे परवलीचे दोन शब्दप्रयोग सतत ऐकू येतात. यात महाराष्ट्र किंवा इतर राज्यांचं स्थान काय ? ही मॉडेल्स नेमकी काय आहेत ? वस्तुस्थिती किती, प्रचाराचा भाग किती याचं हितगुज इथं करूयात.
(सांख्यिकी काथ्याकुटीला पर्याय नाही हे उघड आहे. जाणकारांनी सोप्या भाषेत सांगावं ही विनंती ).

Pages

Subscribe to RSS - शासन(सरकार)