शेवटी मोदी आले.... कित्येक दिवस सगळे ज्याची वाट पहात होते, ते घडले. मोदींना निवडणुक प्रचाराचे प्रमुख करण्यात आले. अडवाणींनी अडवणुक करण्याचा प्रयत्न केला, काहींना रुसवा धरला, पण शेवटी मोदींना थांबवेल असं सध्यातरी कोणीच दिसत नाही.
गुजरातमधील भरभराट, विकास, हाच मोदींचा अजेंडा असेल, अशी अपेक्षा आहे. पुढील ५ वर्षात गुजरातच्या धर्तीवर भारताचाही विकास व्हावा हीच सदीच्छा.
{बाकी ते गोध्रा, एककल्लीपणा, मीच एक तो ग्रेट, याम्चेशी काय घेणे-देणे. विकास महत्वाचा}.
वाटे मला हा देश भकास आता
शांती कधी लाभेल जगास आता
पेटेल क्रांती देश नवा कराया
लागेल थोडे तेल धगास आता
ॠतू अवेळी रंग नवाच फेकी
आणू नव्या शोधून ढगास आता
मौनी असे राजा ललनेस दारी
सोडायची ना त्यास मिजास आता
गेली कशी गूरे बघ छावणीला
लागेल मोठ्ठ टाळ घरास आता
चेकाळली श्वाने लत वासनेची
जाईल कोण्या देश थरास आता
(मार्गदर्शन अपेक्षीत)
कधी कधी मी मराठी असल्याची लाज वाटते. अर्थात हे वाक्य केवळ "मराठी" हा शब्द बदलून अनेक बाबतीत वापरता येईल. तर मुळ मुद्दा मराठी असण्याचा. का ? आणी कधी वाटते बर लाज ? सुरेश भटांनी लिहिलेल्या
" लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढया जगात माय मानतो मराठी"
नेहमी प्रमाणे सकाळ च्या वेब साईट वर आलो. आणि पहिलीच बातमी होती '५ वर्षाच्या मुलीवर दिल्लीत बलात्कार'. ५ वर्षे, दिल्ली, बलात्कार हे शब्द अतिशय विसंगत वाटले म्हणून परत एकदा हेड्लाईन वाचली. मला कसेतरीच वाटले. लाज वाटली. किळस वाटली. माझ्याच पुरुष असण्याची विलक्षण घृणा वाटली. मन भरून आले. अनेक नकारार्थी विचार गर्दी करू लागले. माझ्या समाजात हि हीन वृत्ती कुठून आली असावी याने आतड्याला पीळ पडला. मलाही २ मुली आहेत. एक ७ वर्षाची आणि दुसरी ३ वर्षांची आहे. त्यामुळे ५ वर्षांची मुलगी कशी असते, तिचे विश्व काय असते, तिची विचारसरणी कशी असते याचा अगदी घरचा अनुभव माझ्याकडे आहे.
फार वर्षांपूर्वी, एका मोठ्ठ्या जुन्या झाडावर एक प्रचंड मोठं मधमाश्यांचं पोळं होतं. आजूबाजूला रंगीबेरंगी टवटवीत फुलांनी बहरलेले बाग-बगिचेही होते.
आजच्या सकाळमधील कोथरुडच्या सर्व्हे क्रमांक ४४ चे उद्यानाचे आरक्षण विकास आराखडा मंजूर करून घेताना नगरसेवकांनी कसे हातोहात बदलून ते ''व्यापारी'' केले याचे
मुंब्र्यात सात मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत साधारणतः ६० लोकांचा बळी गेला.निर्ढावलेले भूमाफिया आणि सुस्त शासनव्यवस्था या पार्श्वभूमीवर सदरील दुर्घटनेच्या संदर्भाने चर्चा अपेक्षित.
नमस्कार,
दुष्काळाबद्दलच्या बातम्या आपण वाचत असतो. साधारणपणे दरवर्षी पाण्याचे हाल होताना आपण पाहतो/ऐकतो.
मी लहान असल्यापासुन कुठल्याही भाषणांमधे "पिण्याचे पाणी" , दुष्काळ याचे उल्लेख ऐकत आलो आहे. आणि अजुनही ऐकतच आहे.(३० वर्षानंतरही).
या बाफचा उद्देश कुणालाही दोष देणे इ नसुन या दुष्काळाबद्दलची माहिती एकत्रित करणे हा आहे. (यात शेती इ. बाबतचे कोणी तज्ञ असतील त्यानीही आकडेवारी दिलीत्/लिंक्स दिल्यात तर उत्तम).
नेत्रदान खर्या अर्थाने सार्थकी लागते काय?
नेत्रदान केल्याने गरजुला दॄष्टी देण्याचे महान कार्य होते हे महत्व पटुन अनेकांनी मरणोपरांत नेत्रदानाचा संकल्प केलेला आहे. कित्येकांनी नेत्रदान केलेही आहे.
नुकत्याच वाचनात आलेल्या बातमी नुसार शासनाच्या पेढीतुन ७० टक्के बुबुळे निकामी झाली आहेत. काहीच बुबुळे दॄष्टीहीन व्यक्तीला बसविली गेली आहे. तर काही प्रयोगा दाखल वापरली आहे. असे शासनानेच जाहीर केले आहे.
असेच जर चालु राहीले तर भविष्यात नेत्रदानाला कितपत मह्त्व उरेल देव जाणे.
मध्यंतरी अशी बुबुळे कुठेतरी फेकुन दिल्याचेही वाचनात आले होते.