रूपयाचे चिन्ह अन रूपयाचे अवमुल्यन

Submitted by पाषाणभेद on 17 August, 2013 - 21:05

रूपयाचे चिन्ह अन रूपयाचे अवमुल्यन

जुलै २०१० मध्ये भारतीय रूपया या चलनाचे नविन चिन्ह स्विकारले गेले. दैनिक सामनाच्या या बातमीनुसार अंकशास्त्रतज्ञ तसेच वास्तुशास्त्र, लिपीशास्त्र यांच्या तज्ञांच्या मते हे चिन्ह अशुभ आहे. केवळ या कारणामुळे रूपया या चलनाचे अवमुल्यन अंतरराष्ट्रीय बाजारात होते आहे असेही या तज्ञांना वाटते. हे चिन्ह बदलण्यात यावे व त्याचबरोबर नोटांवर असलेली गांधीजींच्या प्रतिमेचीही दिशा बदलवण्यात यावी असे या तज्ञांनी सुचवलेले आहे.

मुळात देवनागरी वर्णमालेत रू. हे अक्षर सुटसुटीतपणे लिहीता येत असतांना हे नविन चिन्ह स्पर्धेव्दारे निवड केले जाणे हेच मोठे अतार्तीत होते. जुने रू. चिन्ह रदबदली करून अनेक प्रश्न उपस्थीत झाले आहेत. जेथे जेथे रू. हे चिन्ह वापरत होते तेथे तेथे नविन रूपयाचे चिन्ह वापरावे लागले असेल. टांकसाळीत नविन डाईज, नोटांवर नविन छपाई आदींमध्ये बदल करावे लागले असतील.

त्याचबरोबर संगणकाच्या लिपीमध्येही हे चिन्ह तयार करावे लागले. हा नविन फॉन्ट म्हणजे केवळ इमेज म्हणून वापरला गेल्याने बहूतेक ठिकाणी तो ठिगळासारखा दिसतो हे मान्य करावे लागेल.

नाविन्याचा शोध घ्यायला हरकत नाही पण ज्या गोष्टी प्रचलित आहेत, सोप्या आहेत त्या बदल करून काय मिळते?
या बदलाआधी रूपया हे अक्षरात लिहीता येत होतेच की. आणि केवळ चिन्ह बदल केला म्हणजे फार काही मोठी गोष्ट केली असे होत नाही. चिन्हात बदल केल्याने ज्या गोष्टी रूपया किंबहूना भारतीय चलनासोबत होत होत्या व भविष्यातही होत राहतील त्यात काही बदल होणार नाही.

देवनागरी वर्णमाला रूपया हे अक्षर रू. या चिन्हात लिहीण्यासाठी परिपुर्ण असतांना केवळ काहीतरी वेगळे करायचे हे ठसविण्यासाठी रूपयाचे नविन चिन्ह स्विकारले गेले असे म्हणता येईल.

अंकशास्त्र, वास्तुशास्त्र, लिपीशास्त्र काहीही म्हणोत. भारत सरकारने रू. हे जुनेच चिन्ह कायम करावे कारण तेच जास्त लोक अजुनही वापरतात व त्याद्वारे देवनागरी लिपीची ओळख नष्ट होत नाही.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा लेख लिहील्यानंतर रूपयाच्या नविन चिन्हावर अधिक प्रकाश टाकणारा http://anil.org.in/2010/08/26/new-indian-rupee-symbol-and-the-design-problems/ हा ब्लॉग सापडला.

हे नविन चिन्ह स्विकारतांना भ्रष्टाचार झालेला आहे. याविरूद्ध saveindianrupeesymbol.org ही संघटना कायदेशीर लढाही देत आहे.
कृपया आपण अधिक माहीतीसाठी वरील ब्लॉगवर असलेल्या लेखाखाली असलेल्या कमेंट्स वाचू शकतात. त्यात रोहन या नावाने लिहीलेली कमेंट उल्लेखनीय आहे.

का ही तरी काय. ते पूर्वी बी एस ई च्या बाहेर एक बुल चे शिल्प बसवले होते आणि त्याचे तोंड बाहेर च्या
दिशेला होते म्हणून शेअर बाजा रात मंदी आली असा एक प्र वाद होता त्या टाइपाचे वाट्ते आहे.

अहो ४७ ला मिळालेला भारताचा 'प्लॉट' पण वास्तूशास्त्रानुसार नाही.
पंचकोनी प्लॉट ठेऊन बाकीचे अनियमित कोपरे उडवायला हवेत.
पश्चिमेला अरबीसमुद्र आहे तो ईशान्येला करायला हवा.
केंद्रस्थानाजवळच्या सगळ्या उंच इमारती पाडायला हव्या.
भारताच्या स्पेलींगमध्ये एक 'ए' वाढवायला हवा.
Wink

बाकी रूपयाचे चिह्न अगदी डॉलरसारखे किंवा पौंडासारखे ठेवले तरी त्याचे अवमूल्यन अटळ आहे.

बरोबर आहे.......
यावर भारत सरकार ने निश्चित उपाययोजना करायला हवी... वास्तुशास्त्र हे प्राचीन अर्वाचिन..चीन चीन शास्त्र आहे..
याचा सम्मान केलाच पाहीजे..
लगेच यावर अंमलबजावनी करायला सुरुवात करावी...

चांगले ज्योतीष च्यांच्या कडुन "निवडणुका कधी घ्याव्या " याचा मुहुर्त काढुन घ्यावा... त्या नुसार तारखा घोषीत कराव्या... मुहुर्त विशिष्ट पक्षालाच लाभदायक ठरु नये या करीता किमान ५ वेगवेगळ्या भागातल्या ज्योतिष निवडुन त्यांचे मंडळ स्थापन करावे...
निवडणुक बुथ स्थापन करण्याकरीता सुध्दा वास्तुशास्त्र या विषयात पारंपरागत असणार्या ५ व्यक्तींचे मंडळ स्थापन करावे.. उत्तर दक्षिण पुर्व पश्चिम या चारही दिशांकडुन येणारे स्त्रोत तपासुन मगच बुथ स्थापन करावे..
उमेदवार निवडताना आधी त्यांची जन्म पत्रिका निवड्णुक आयोगा कडे पाठवावी... त्यावर १० दिवसांमधे निर्णय घेउन संबंधीत पक्षांना तो उमेदवार योग्य आहे का याचे उत्तर मिळेल..
मंत्रीमंडळ स्थापन करताना मुहुर्त काढा...मगच शपथविधी चा कार्यक्रम करा...

संसद ची इमारत सुध्दा वास्तुशास्त्रने परिपुर्ण आहे का हे तपासुन घ्यावे... तरच स्थिर सरकार निवडुन येईल ...

भारताच्या भुखंडाची सुध्दा तपासणी करुन घ्यावी... जर वायव्येला पाकिस्तान फार चुकिच्या ठिकाणी असेल तर त्याला श्रीलंकेच्या ठिकाणी स्थापन करावा... ...अरबी समुद्र जर पश्चिमेला दोष देत असेल तर आपण बंगाल च्या उपसागराचे नाव बदलुन अरबी समुद्र करु... जेणे करुन मग अरबी समुद्र पुर्वेकडे येउन भारताला लाभ द्यायला सुरुवात करेल...

अजुन कुणाकडे उपाय योजना असतील तर नक्की सांगा...............शेवटी ..देशच्या प्रगती साठी आहे सर्व Wink

पाभे, घाबरु नका, आहे तसे राहुद्या.

रुपयाचे जेवढे जास्त अवमुल्यन होईल तेवढा जास्त शेतकर्‍यांना फायदा होतो. देव करो आणि हा रुपया आणखी भरपूर घसरो. Happy

मुटेजी,आर यू शूअर?

कसा फायदा होतो शेतकर्यांना ,जरा समजावून सांगा बरं.

मी पार्ट्टाईम शेती सोडून फुल टाईम शेती सुरू करते.
कारण रुपयाचे चिह्न काही सरकार बदलणार नाही आणि रूपयाचे अवमूल्यन थांबणार नाही.
Wink

@ साती - १०१ % श्युअर.

मात्र असा क्लिष्ट विषय प्रतिसादातून संक्षिप्तपणे हाताळणे शक्य होत नाही.
तरी यथावकाश लिहितो.

रुपयाच्या 'चिन्हा'चा अन 'वास्तूशास्त्राचा' काय संबंध?
------- रुपयाचे चिन्ह स्विकारण्याचा निर्णय हा कुठल्यातरी 'वास्तूत' झाला असेल असा काही संबंध असेल.

फ्राय्डे ला तर सेन्सेक्स जाम कोसळला. आणि एन एस डीएल फ्रॉड चे काय? गोल्ड रेट शूट झाला आहे. रुपी फर्दर डाउन. पण रुपी डाउन झाला की आम्ही मायबोली यूएस च्या बाजूने असतो. अप झाला कि मायबोली इंडिया टीमच्या बाजूने असतो. कुणी कडून फायदा झाल्याशी कारण. त्यानिमित्ताने रंजक माहिती मिळते आहे!

बैलांना कुठे ही वाइट वागणूक मिळाल्यास मी पेटा तर्फे निषेध नोंदवेन तो ही फेसबुकवर.

रुपयाचे नवीन चिन्ह फारच अशुभ आहे तरी लेखकाने माझ्याकडे नोटा बदलवून शुभ चिन्हांकित नोटा घेऊन जाव्या हाहाहा

सर्व लोकांना आवाहन करण्यात येत आहे की... आपल्या कडे आलेल्या सर्व नोटांवर "स्वस्तिक" हे "शुभ चिन्ह" काढावे.....मगच त्या खर्च करण्यात यावे.....या मुळे नोटांवर शुभ चिन्ह येईल आणि रुपयांचे अवमुल्य होणार नाही

मस्त लेख!
जगातला इतका मोठा कर्जबाजारी देश त्याचे चलन इतके वर ठेउ शकतो. (कोणत्या अर्थशास्त्राच्या थियरीत हे बसते ते कळत नाही) त्याच न्यायानुसार वरचे भारतीय रुपयाच्या बाबतीतले विवेचन योग्य आहे असेच म्हणावे लागेल Happy

कर्जबाजारी असण्याचा आणि चलनाच्या किंमतीचा काय संबंध? तसे तर अंबानीलाही कर्ज असेल, पण विमलचे एक वार कापड घ्यायला गेले तर त्याचा दर तोंडाला फेस येईल इत्का असणारच ना? की अंबानी कर्जबाजारी आहे म्हणून त्याचे प्रॉडक्ट फुकट विकले जावे?

चर्चेचा उद्देश केवळ एकाचेच मत ग्राह्य न धरता त्या चर्चेच्या अनुषंगाने इतर मुद्यांनाही स्पर्श व्हावा हा असतो. या लेखाद्वारे आपण सर्वांनी रूपयाचे नविन चिन्ह व त्याची घसरण यावरील अनेक मुद्यांना स्पर्श केलात.

मुळात माझा अंकशास्त्र, वास्तुशास्त्र, लिपीशास्त्र, भविष्य आदिंवर अजिबात विश्वास नाही. भविष्य, बुवाबाजी यांवर काही रचनाही केल्याचे काही वाचकांना स्मरत असेल.
म्हणूनच "अंकशास्त्र, वास्तुशास्त्र, लिपीशास्त्र काहीही म्हणोत" असले वाक्य माझ्या लेखात मी वापरले आहे. बहूतेक वाचकांना मी अंकशास्त्र, वास्तुशास्त्र, लिपीशास्त्र यांचा संबंध रूपयाच्या घसरणीशी आहे याचे समर्थन करतो आहे असे वाटून त्यांनी प्रतिवाद केल्याचे दिसून आले. काहींना तर माझा लेख विनोदीही वाटला. अर्थात तसे वाटण्याने माझ्या नेहमीच्या लिहीण्याच्या प्रकृतीचे त्याद्वारे समर्थन झाले.

दै. सामनामधील प्रस्तूत लेखातील बातमी वाचून त्यावर टिका करण्यासाठी व रूपयाचे नविन चिन्ह कसे गरजेचे नव्हते ते ठसविण्यासाठी हा चर्चेचा धागा मांडला. माझ्या मुळ लेखात केवळ पहिल्या परिच्छेदात मी मुळ बातमीचा संदर्भ घेतला आहे.

संगणकावर तयार केलेल्या अक्षरांच्या लिपीतील वाक्यांमध्ये हे नविन चिन्ह खरोखर धेडगुजरी दिसते. ह्या नविन चिन्हाचे संगणकीय फॉन्ट फॅमेलीज मध्ये रूपांतर अजूनही योग्य पद्धतीने न केल्याने केवळ एकाच फॉन्ट फॅमेलीमधील चिन्हाचा उपयोग संगणकीय वाक्य लिहीतांना होत असल्याने त्या वाक्यात या चिन्हाची सलगता आढळून येत नाही. श्री. अभ्या... यांनी या मुद्याबाबत चांगले विवेचन केले आहे.

दुसरा मुद्दा असा की रूपयाचे नविन चिन्हामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत फार काही क्रांतीकारक बदल घडून येणार नव्हता. अंकशास्त्र किंवा इतर तत्सम शास्त्रांच्या तत्वाचा व नविन चिन्हामुळे अर्थव्यवस्थेच्या घसरणे/ चढणे यांचा काही संबंध नाही ही बाजू मांडण्यासाठी मी "चिन्हात बदल केल्याने ज्या गोष्टी रूपया किंबहूना भारतीय चलनासोबत होत होत्या व भविष्यातही होत राहतील त्यात काही बदल होणार नाही" असे म्हटलेही आहे.

रूपयाचे नविन चिन्ह लागू करण्याआधीपासून देवनागरी वर्णमालेत रूपया हे चिन्ह "रू" अक्षराने आधीच परिपूर्णरित्या लिहीता येत होतेच. हे देवनागरी चिन्ह रूपया हे चलन वापरणार्‍या कोणत्याही देशांत (पाकीस्तान, श्रीलंका व इतर) वापरत नसतांना त्याचे वेगळेपण सिद्ध करीतच होते. त्याचमुळे रूपयाचे अगदीच वेगळे असे धेडगुजरी चिन्ह वापरात आणण्याची काहीच गरज नव्हती.

हे चिन्ह स्पर्धेद्वारे निवडल्या जाणार्‍या प्रक्रियेत असंसदीय पद्धत अवलंबली गेली. काही सामाजीक संघटना याविरूद्ध कायद्याची लढाई देत आहेत. ही बाबदेखील रूपयाच्या नविन चिन्हाकडे दुर्लक्षून चालणार नाही.

राहता राहीला नोटांवर असणार्‍या गांधीजींच्या प्रतिमेचा मुद्दा. भारतात इतरही अनेक महान व्यक्ती जन्माला आल्या. त्यांच्या प्रतिमाही नोटांवर छापण्यायोग्य आहेत. जर सरकारला त्यात राजकारण होते आहे असे वाटत असेल तर आपल्याकडे अनेक विषय आहेत जे नोटांवर भारतीय अस्मिता म्हणून छापले जावू शकतात जसे एखादा धबधबा, प्राणी, एखादे उत्कॄष्ट चित्र आदी. आपल्याकडेही जुन्या नोटेवर वाघाचे चित्र, भाक्रा नांगल धरणाचे चित्र होते हे चांगलेच आठवते.

गांधीजींचे चित्र नोटांवर आताच्या नकली नोटांच्या प्रश्नामुळे कसे अयोग्य आहे याबद्दल एक विनोदी विचार माझ्या मनात आहे. गांधीजींच्या डोक्यावर केस कमी होते. त्या डोक्याची प्रतिमा/चित्र नकली नोट बनवणार्‍यांना कमी श्रमात बनवता येणे लवकर शक्य होते. तेच चित्र जर एखाद्या भरघोस नेत्याचे असेल तर संगणकावरही जुळणी करतांना अवघड गोष्ट होते. तसली जुळणी करतांना त्या ऑपरेटरच्या डोक्याचे केस उडून जावू शकतील अशा भरघोस डोक्यावरचे केस असणार्‍या नेत्याचे चित्र नोटांवर असायला हवे. असो.

रूपयाच्या नविन चिन्हामुळे सामान्यमाणसाच्या अन भारताच्या आर्थिक बाबतीत असणारे प्रश्न सुटणार नाहीत तसेच नविन चिन्ह नाकारले जावून इतर चिन्ह स्विकारले जाणे हेही शक्य नाही. भारताचे आर्थिक बाबतीत अनेक प्रश्न विलंबीत असतांना केवळ चिन्ह बदल करणे ही गोष्ट म्हणजे फार काही मोठी गोष्ट करतो आहे हे सिद्ध करण्यासाठी हे नविन चिन्ह स्विकारले गेले अशी माझी भावना आहे.

या चर्चेत भाग घेणार्‍यांचे व सर्व वाचकांचे आभार मानून या चर्चेचा समारोप करतो.