पुण्यातील या शिक्षणसंस्थेतील पीडीत विद्यार्थ्यांसाठी काही करता येणे शक्य आहे का ?

Submitted by मधुरांबे on 4 July, 2018 - 12:48

पुण्यातील एका खासगी शाळेबाबतची बातमी भयंकर आहे. बातमी ज्या प्रमाणे विविध वाहीन्यांवरून समोर येतेय त्यावरून तरी प्रथमदर्शनी तुघलकी फर्मान काढून पालकांना आणि विद्यार्थ्यांना वेठीस धरल्याचे दिसून येत आहे. या अटी भयानक आहेत. आणि जर पाळल्या नाहीत तर पोलीसी कारवाई करण्याची धमकी दिलेली आहे.

खालील लिंकवर आपण पाहू शकता.
https://www.facebook.com/abpmajha/videos/10160779103170271/

जर कुणी प्रभावशाली व्यक्ती, संस्था यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचत असेल तर शासनाकडून, महापालिकेकडून अथवा अन्य काही यंत्रनांकडून चौकशी करता येईल का ? कारण ही संस्था आणि संस्थाचालक अत्यंत प्रभावशाली आहेत. आपण नेहमी अशा गोष्टी वाचतो. मत मांडतो आणि सोडून देतो. आपल्या या वैशिष्ट्यांचा विचार करता आपल्यालाही काही करता येईल अशी कल्पना आहे का काही ? जेणेकरून अशा संस्थांना मुजोर होण्यापासून चाप बसेल.

अर्थात नियम असे का बनवले आहेत आणि परदेशात असे नियम आहेत का याबद्दल पण प्रकाशाझोत टाकला तर बरेच होईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काहीही बोलतेय विश्वस्त बाई - अशी अंतवस्त्रे घालून मुलींना वळण लागत असते का? इत हप्पेन्स ओन्ली इन इंडिया भैया !!

अंतर्वस्त्राचे रन्ग, ०.३ से मी पेक्षा कमी असे कानातले... याचा आणि मुलीन्च्या सुरक्षेचा सम्बन्ध येतो कसा? नियम लिहीणारे मुर्ख आहेत आणि त्या नियमान्चा अम्मल करण्याचे सुचवणारे मॅनेजमेन्ट महामुर्ख आहेत.... सर्वान्ना घरी बसवा. यान्च्याशी चर्चा कसली करायची.

प्रयत्न केला पण त्या संतोषी काळे नावाच्या शिक्षिका आहेत त्यांची भाषा आणि विचार वाचून पुढे काही वाचायची इच्छाच उरली नाही
Sad

मेकअप, दागिने याबद्दल च्या अटी बऱ्याच ठिकाणी आहेत त्या बद्दल इतके रान उठवायची गरज नव्हती,
शाळाबाह्य उपक्रमात सहभाग आणि अंतरवस्त्रांचे रंग या 2 विचित्र अटी आहेत.
शाळा प्रशासनाने त्यावर काही स्पष्टीकरण दिले तर बरे होईल

हो. वाचल्या प्रतिक्रिया. आमची मुलं देखील केंद्रीय अभ्यासक्रम असलेल्या शाळेत आहेत. येथेही कडक शिस्त आहे. पण काहीच्या काही नियम नाहीत.

दुस-या वाहीनीवर सांगितले की टॉयलेट ला जायचे असल्यास शाळेने ठरवून दिलेल्या वेळेत जावे लागेल. युरिनल्स स्वच्छ नाहीत. एकच आहे. शाळेने वेळ खूप कमी दिला आहे. एव्हढ्या कमी वेळात एव्हढी मुलं - मुली कसं काय आटोपणार ?

या वेळे व्यतिरिक्त जर जायचे असेल तर दंड सांगितला आहे.

व्हिडिओ पाहता येणार नाही.बातमी काल वाचली. या गाईडलाईन्स मधला अती स्पष्ट पणा टाळता आला असता.(तरुण्/लहान म्हणजे अवयव वाढलेल्या पण मन आणि शरीर सेल्फ डिफेन्स ला तितके ट्रेन्ड नसलेल्या मुलींनी शाळेत जपून ड्रेसिंग करावे, बाहेरच्या नजरांना खाद्य देऊ नये हे मनातून पटले.अंतर्वस्त्र रंग वगैरे पर्यंत जायची गरज नव्हती.पारदर्शक नसलेला युनिफॉर्म शर्ट आणि गुडघ्यापर्यंत येणारा स्कर्ट, आत ब्लूमर/नी लेंथ सायकलिंग शॉर्ट इतपत ड्रेस कोड चालला असता.) पर्सनल पार्टी/बाहेर जाताना मुलींनी जे पाहिजे ते घालावे.पण शाळा ही एक इन्स्टिट्युशन म्हणून ड्रेस कोड योग्य वाटतो.(अंतर्वस्त्रांचे रंग पॉलीसी मध्ये सांगणे मात्र अक्सेप्टेड नाही.)
बाकी पालकांनी एकमेकांना भेटू नये वगैरे अटी काय च्या काय आहेत.

सायकल पार्किंग चे चार्जेस दीडशे रूपये महापालिकेने ठरवून दिलेले आहेत. त्यांनी १५०० रूपये केले. हेल्मेट सक्ती केली आहे. सुरक्षा म्हणून हे ठीक आहे. पण मुलांनी जड दप्तर सांभाळायचे की हेल्मेट ? १०० सायकली असतील तर दीड लाख रूपये फक्त पार्किंगचे ? किमान हेल्मेटचे स्टँड द्यायचे होते. तसेच या अटी त्याच संस्थेच्या त्याच प्रांगणातल्या सीबीएसई बोर्डाच्या शाळेला नाहीत हे अवघड आहे.

त्यातून त्या विश्वस्त बाई म्हणतात की पालकांनी आमच्याशी बोलायचे होते. पालक सांगताहेत की अर्ज घेऊन आलो तर आत सोडले नाही.
आंदोलन केले तर पोलीस कारवाई केली जाईल हा नियमही मुलभूत अधिकारांवर घाला घालणारा आहे. यातून मुलांना काय शिक्षण मिळेल ? चुकीचे असेल तरी ते सहन करावे ?

मला बरेचसे नियम जाचक वाटले नाहीत. काही नियमांचं ( innerware) वैषम्य आणि आश्चर्य वाटले. हे सांगायची वेळ शाळेवर यावी! प्रसंगानुरूप कपडे, वावर हवा हे बेसिक आहे. आमच्या शाळेत आई-वडिलांनी मुलांना सोडवायला, PTm ला येताना योग्य dress-up आणि presentable या असे circular होते. मला काही त्याच्यात गैर वाटले नाही. घरातल्या कपड्यावर सोडवायला आलेले, अंथरुणातून उठून वाईट पारोसे दिसणारे आई-वडील पाहिले आहेत. Ptm ला capri वर आलेले वडील पाहिलेत. पण मग शिक्षकांच्या dress-up मध्ये पण तारतम्य हवे. लिपस्टिक लावणारी, sleeve-less, मोठी पाठ दिसणारे blouse घालणारी शिक्षिका नको. अजून हा feedback इच्छा असून दिलेला नाहीये. अजून बुवे शिक्षक आलेले नाहीत त्यामुळे त्यांच्या कपड्यावर सध्यातरी no comment. हेड मास्तर इम्पेकॅबली dressed असतो आणि शाळा भरताना, सुटताना शाळेच्या गेटवर 20 मिनिटे तरी देखरेखिवर हजर असतो.
सायकल पार्किंग फी खूप आहे कारण त्यांना सगळ्यांनी school bus वापरावी अशी इच्छा असणार.
शाळाबाह्य परीक्षा का नाही ते काही कळाले नाही.

बाकी सहसा ह्या नियमावलीवर प्रवेश घेताना सही घेतात, पालकांना मुलांना अश्या शाळेत न घालण्याचा पर्याय आहे.

<< सायकल पार्किंग फी खूप आहे कारण त्यांना सगळ्यांनी school bus वापरावी अशी इच्छा असणार. >>
------- शारिराला व्यायाम देणार्‍या सायकलसाठी प्राधान्य/ प्रोत्साहन हवे... नपेक्षा शाळेची बस.

एमायटी कॉलेज हे पूर्वीपासून स्वच्छता व शिस्तीकरिता प्रसिद्ध आहेत. त्यांच्या स्वच्छतेचे कौतूकच आहे. नव्वदीच्या दशकातही आपल्या घरीदेखील इतकी स्वच्छ असणार नाहीत इतकी स्वच्छ त्यांची कॉमन टॉयलेट्स असत. तसेच कॉलेजच्या विद्यार्थ्यालाही शाळेपेक्षाही कडक शिस्तीत वागवत. उशिरा येणे, गैरहजर राहणे, लेक्चर बंक मारणे, वर्कशॉपमध्ये दिलेले जॉब्ज वेळेत पूर्ण न करणे या प्रत्येक चूकीकरिता पालकांना घरी रजिस्टर्ड पोस्टाने पत्र पाठविले जाई. सोबत भरमसाठ दंडही आकारला जाई. त्यामुळे शिस्तपालन होत असले तरीही कॉलेज लाईफ एंजॉय न करता आल्याने विद्यार्थी संस्थाचालकांच्या नावाने बोटे मोडत असत. अशाच एका घटनेची ही माहिती - पंचवीस वर्षांपूर्वी एमायटी इंजिनिअरिंग कॉलेजच्या कँटीनमध्ये एक विद्यार्थी उदासवाण्या चेहर्‍याने बसला होता. तिथे त्याचा दुसरा सहाध्यायी आला आणि त्याने पहिल्याला "कायरे? असा कराड (डॉ. विश्वनाथ कराड - एमायटीचे संस्थापक अध्यक्ष) मेल्यासारखा चेहरा करुन का बसलायस?" असे गंमतीत विचारले. निश्चितच ही भाषा योग्य नव्हे पण ज्यांनी इंजिनिअरिंग अथवा कुठल्याही कॉलेजमध्ये काही वर्षे घालविली आहेत त्यांना कॉलेज लाईफ मध्ये तरुण मुलांनी अशा भाषेत बोलणे हे फार कॉमन असल्याचे माहित असेल. असो. तर या विद्यार्थ्याच्या तोंडची भाषा आक्षेपार्ह होतीच. तसेच त्याच कँटीनमध्ये मागच्या बाकड्यावर बसलेल्या डॉ. विश्वनाथ कराड यांच्या सुपुत्राने ती भाषा ऐकल्यावर सख्ख्या बापाच्या मरणाविषयी कोणी बोलत असल्याबद्दल त्याला आलेला प्रचंड संतापही आपण समजू शकतो. पण या संतापाच्या भरात त्याने जे कृत्य केले ते मात्र अतिशय भयंकर होते. या पितृभक्ताने आपल्या दहा बारा मित्रांना हाताशी धरुन हॉकी स्टीक्सने त्या विद्यार्थ्याला त्याचे हात पाय डोके फुटेस्तोवर प्रचंड मारहाण केली. डॉ. कराड यांना या घटने बद्द्ल समजले असता त्यांनी त्या विद्यार्थ्याचा हॉस्पीटलचा खर्च + पुरेशी आर्थिक नुकसान भरपाई त्या विद्यार्थ्याच्या पालकांना दिली. सोबतच या प्रकाराबद्दल पोलिस / प्रसारमाध्यमांमध्ये न जाण्याची प्रेमळ विनंतीही केली. त्यामुळे कुठल्याही वर्तमानपत्रात ही बातमी तुम्हाला सापडणार नाही. अर्थात कोथरुड परिसरात राहत असल्याने त्याकाळी वॉट्सॅप / फेसबुक / ट्विटर नसतानाही कर्णोपकर्णी पसरलेली ही बातमी मला कळली होती. आज हा धागा वाचताना ती प्रकर्षाने आठवली.

पुण्यात लहान मुलांनी सायकल चालवणे (जिथे या शाळा असता तिथपर्यंत) हे खूप रिस्की आहे असं माझं मत.
स्टॉप पर्यंत थोडे अंतर चालवयाला हरकत नाही.

अशा गोष्टी शाळा सुरू होण्यापूर्वी सांगायच्या होत्या. आता शाळेची डायरी दिलेली आहे. तीत अ‍ॅफेडेव्हिट्स आहेत चार. त्यामधे हे नियम लिहीलेले आहेत. व आयपीसीच्या कुठल्या कलमान्वये शाळा कारवाई करेल हे पण लिहीलेले आहे.

सायकल वापरू नका हे तोंडी सांगता आले असते. बेकायदेशीर दंड आकारण्याचे स्वातंत्र्य शाळेला आहे का ? ठरबून दिलाय ना दीडशे रूपये चार्ज ? मग शाळा पालिकेच्या वर आहे का ? असे नियम मोडणारी शाळा विद्यार्थ्यांना कायदेपालनाचे महत्व समजावणार आहे का ?

या शाळेतल्या मुलांना मुलींकडे बघण्याच्या दृष्टीकोणाबाबत लैंगिक शिक्षण दिले जाते का ? तसे झाले तर शाळेचे कौतुकच व्हायला हवे. पण बंदी मुलींवरच लादलेली आहे असे दिसतेय. त्यापेक्षा डार्क रंगाचा युनिफॉर्म द्यावा. म्हणजे इनर्स दिसणारच नाहीत. बुरसटलेल्या विचारांना कशाला बढावा द्यायचा नियम बनवून. यामुळे चूक मुलींची आहे उमलत्या वयात पक्के नाही का होत ?

शाळा चालू होण्यापूर्वी/अ‍ॅडमिशन घेण्यापूर्वी सांगाव्या यावर सहमत.
तसेच मुलींना असलेला ड्रेस कोड थोडे बदल करुन मुलांनाही असावा.

नाहीत घेत. जानेवारी ते एप्रिल पर्यंत दुस-या शाळेशी संपर्क साधावा लागतो. जून महिन्यात सुद्धा घेत नाहीत मध्येच. आता तर जुलै चालू आहे. पहिल्या युनिटचा अभ्यासक्रम झालेला असणार. शिवाय प्रत्येक शाळेत पहिल्या सेम चे धडे क्रमानेच घेतात असे काही नाही.

शिस्तीच्या नावाखाली काय आता एकेका मुलींची अंतर्वस्त्र तपासणार का?
शी, नुसत्या कल्पनेनेच काटा आला अंगावर. एकेका शिक्षकाला म्हणावं, स्वत‌:वर अंमलबजावणी करा, मग कळेल दिवसाढवळ्या बलात्कार काय असतो तो

पालकांच्या लढ्याला यश मिळाले. अभिनंदन!!
मुलांवर या विजयामुळे सकारात्मक परिणाम होईल. अर्थात हा लढा योग्य कारणासाठी असल्याने. तरीही झुंडशाही आणि अशा लढ्यातील फरक समजावून सांगायला हवा.

रावपाटील आभार मानले असते पण.... असो. उगीचच धागा भरकटेल.

शाळेला या माजोरडेपणाचा निर्णय मागे घ्यावा लागला, हे चांगले झाले.
यावरून आठवले, की फार पूर्वी मी एम.आय.टी.मध्ये अ‍ॅडमिशन साठी गेलो होतो (आधी कुणीतरी श्री. श्रोत्री या प्राध्यापकांशी बोलणे झाले होते आणी ते खूप चांगली माहिती देत होते ), मग तेव्हा संचालक वि.दा.कराड (तेव्हा ते डॉ. न्हवते) यांच्याशी त्यांच्या ऑफिसमध्ये वडिलांबरोबर गेलो होतो. त्यांचे बोलणे साधरण उध्धटपणाकडे झुकणारे होते, असे वाटले. ३-४ मिनिटे झाली तरी उभे राहूनच बोलत होतो, म्हणून मी सरळ खुर्ची ओढून त्याच्यावर बसलो आणि शेजारी तुम्ही बसा, असे वडिलांनापण सांगितले. त्याच्यावर कराड म्हणाले की अंहं, विद्यार्थ्यांनी खुर्चीवर बसायचं नाही, पालकांनी बसा. त्यावर मी त्यांना सुनावलं की पहिली गोष्ट म्हणजे मी अजून तुमचा विद्यार्थी नाही, बाहेरची १ व्यक्ती आहे. पण समजा ते बरोबर आहे, तरी तुम्ही पालकांना स्वतःहून बसा हे सांगायला पाहिजे. ज्यांना स्वतःला हे तारतम्य नाही, त्यांच्या संस्थेत मला शिकायचे नाही असे म्हणून मी बाहेर पडलो. सहज आठवण झाली. त्यांच्या शाळेतून असे फर्मान आले होते, याचे आश्चर्य वाटले नाही.