खडीसाखर

बोअरिंग गावातला एक हॅपनिंग दिवस!!

Submitted by maitreyee on 24 April, 2018 - 11:39

हल्लीचीच गोष्ट . सकाळी आठ ची वेळ. न्यू जर्सीतले एक शांत सबर्ब. मिडलस्कूल च्या मुलांना शाळेत सोडून ड्रायव्हर रॉबर्ट टली ने डेपो मध्ये बस घेऊन जायच्या आधी नेहमीप्रमाणे बस चेक केली. कोणी काही विसरले का? एखादे मूल चुकून बस मध्येच झोपले तर नाही ना? सगळ्या सीट्स चेक करता करता एका सीट वर त्याला काहीतरी दिसले. चमकून त्याने ते नीट वाकून पाहिले. ही वस्तू टीनेजर्स कडे सापडणे अगदीच अशक्य होते असे नव्हे पण या शांत गावातल्या, रेप्युटेड स्कूल च्या बस मध्ये नक्कीच अपेक्षित नव्हते. रॉबर्ट ने वेळ न दवडता पोलिसांना आणि त्याच्या सुपरवायजर्स ना कळवण्याचा निर्णय घेतला. पोलिस ५ मिनिटात आलेच.

Subscribe to RSS - खडीसाखर