खालील संकेतस्थळ निवडणूक आयोगाचे आहे. इथे आपल्याला आपले नाव मतदार यादीत आहे कि नाही व असल्यास आपला EPIC (Electoral Photo Identity Card) नंबर काय आहे ते पाहता येईल.
कसे शोधाल?
१. या वेबसाईटवर जा: https://electoralsearch.in/
२. नाम/Name मध्ये फक्त आपले नाव लिहा (उदाहरणार्थ Atul, Sandip etc) आणि
पिता / पति का नाम (Father's/Husband's Name) मध्ये आडनाव/वडिलांचे/पतीचे नाव लिहा
३. बाकीची आवश्यक माहिती (राज्य/State, जिला District, कोड / Code) भरा आणि खोजें/Search वर क्लिक करा.
2019 ची बहुचर्चित निवडणूक सुरू झाली आहे,
मतदानाची पहिली फेरी होऊनही गेली आहे,
अजूनही लोकमताचा स्पष्ट अंदाज येत नाहीये
2014 मध्ये जितकी निवडणूक एकांगी होती, तितकी तरी ही निश्चितच नाहीये,
न्यु झीलंडमधल्या ख्राइस्ट चर्च इथे झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याबद्दल आपण सगळ्यांनी ऐकलंच असेल. जगातला कोणताही देश अतिरेकी, द्वेषाधारित, विध्वंसक विचारसरणीपासून सुरक्षित राहिलेला नाही. या हल्ल्यानंतर न्युझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी देशाला उद्देशून केलेलं वक्तव्य अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आश्वासक वाटलं. त्यांच्या भाषणातला हा काही भाग. (स्वैर अनुवाद)
निवडणूक जवळ येऊ लागली तसे खंडाळा पंचक्रोशित विविध सामाजिक कार्यक्रमाचेही पडघम वाजू लागले. विरोधी पार्टीला शह देण्यासाठी संपतराव कसून कामाला लागलेले होते आणि ८ मार्चच्या दिवशी जिल्ह्यातील महिलाश्रमातील विवाहयोग्य अश्या सगळ्याजणींचा पार्टीतर्फे सामूहिक विवाह कार्यक्रम राबवला जाणार होता.
लग्न घटिका जवळ येवू लागली तशी पक्षीय जाहिरातबाजीला ऊत आला. साड़ी वाटप अन् टोप्या .... काहीकाही कसर शिल्लक ठेवली नाही. मांडवात सगळीकडे नात्याचा बाजार रंगला. सगळी तयारी पूर्ण झाली अन् लाउडस्पीकरवरील मंगलाष्टकाच्या आवाजालाही छेदत एक आरोळी मांडवात घुमली.
पुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.
सुजनहो,
लोकसभेच्या निवडणूका जवळ येत आहेत.
१ जानेवारी २०१९ रोजी जर तुम्ही १८ वर्षे वय पूर्ण केलेले असेल, तर मतदार म्हणून नोंदणी करून घेणे तुमचे कर्तव्य आहे.
हे करण्याचा सोप्पा ऑनलाईन मार्ग म्हणजे ही लिंक. https://nvsp.in/Forms/Forms/form6?lang=en-GB
तुम्ही जुने मतदार अस्लात अन उदा, एनाराय वगैरे, किंवा नोकरीधंद्या निमित्त इतर मतदारसंघात रहात असलात, तरी https://nvsp.in/ या लिंकवर जाऊन वेगवेगळे ऑप्शन्स वापरू शकता.
एक सामान्य नागरिक म्हणून माझ्या मुलभुत गरजा भागवण्यास जेव्हा कुठलीही सरकारी यंत्रणा अपयशी ठरते तेव्हा मनाचा क़ौल नक्कीच त्या पक्षाच्या विरोधात जात राहतो. माझ्या परिसरातील सरकारी यंत्रणेकड़ून स्वच्छ भारत अभियानाचे सोंग पांघरून राजरोस सुरु असलेली अस्वच्छता आणि तद्अनुषंगाने होणारे आरोग्य विषयक गंभीर दुष्परिणाम ह्याबद्दल मला आज बोलायचं आहे.
राजकारणात मायबोलीवरील कोणी सदस्य सक्रीय आहेत का?काही मार्गदर्शन करु शकाल का? राजकारणात कसे सक्रिय व्हावे, याबाबत मोलाचं मार्गदर्शन मिळू शकेल का?
काही वर्षापूर्वी मी माझी कार जवळच्या नात्यातील एका व्यक्तीस विकली. त्यानंतर गाडीची कागदपत्रे स्वत:च्या नावावर करून घेतो म्हणून ती व्यक्ती माझ्याकडून मूळ कागदपत्रे घेऊन गेली. तेंव्हा आमचे संबंध चांगले होते त्यामुळे मी सुद्धा फार काळजी न करता सगळी कागदे त्याच्या हातात दिली. पण गाडीची कागदोपत्री ट्रान्स्फरचे हे काम त्याने कधी केलेच नाही. जवळची व्यक्ती आणि संबंध चांगले होते म्हणून मी सुद्धा त्याबाबत त्याला फार तगादा लावला नाही. आता इतकी वर्षे झाली अद्याप गाडी माझ्याच नावावर आहे. पण गाडी आणि तिची मूळ कागदपत्रे मात्र त्याच्याकडे आहेत. मध्यंतरी ह्या व्यक्तीशी संबंध काही कारणांवरून खूप बिघडले.
या भग्न मंदिरात
मग्न होऊन आरती करतोय
भित्तीचित्र खुणावतायत
दाखवतायत क्षीण भग्नता
चक्रपाणी मोडके हात घेऊन उभा
कधी कोसळेल सांगता येणार नाही
असा गाभा
खांबावर डोलारा सारा
विदारक सारे, पण दैदीपयमान इतिहास सांगणारे
इतिहासातली प्रसन्नता त्या भग्नावस्थेतहि कायम
ती विचित्र निरव शांतता , जळमटं , वेली
यांनीच खांद्यावर पेललेली रखवाली
वृक्षांनी घातलेला घेराव
अथपासून इथपर्यंत केलेला अभेद्य बचाव
निसर्गाचे अनोखे कर्तृत्व पाहून स्तंभित झालो
भग्नावशेष मनात साठवून