पुलवामा हल्ला आणि भारत पाकिस्तान संबंध

Submitted by हेला on 27 February, 2019 - 10:27

पुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.

ह्या सर्व प्रश्नांवर एकत्रित एका ठिकाणी चर्चा करायला हा धागा काढत आहे. मायबोलीच्या नियमात राहून चर्चा करा हि विनंती... वेबमास्टर ह्या धाग्याला कुलूप घालणार नाहीत अशी अपेक्षाही आहेच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

भरतीय फौजेला एका ठिकाणाहुन दुसर्‍या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने नेत असताना थोडी जास्त काळजी घेतली असती तर त्या ४४ जवानांचे प्राण तर वाचलेच असते शिवाय आज जी युद्धजन्य परिस्थिती तयार झाली आहे ते झालीच नसती. केवळ सरकारच्या अक्षम्य चुकीमुळे ४४ जवानांचे प्राण गेले असुन झालेली हानी कुठल्याही परिथितीत भरुन निघणारी नाही.

भाजपे कितीही नाचकाम करू देत , सत्य हेच आहे ....

काँग्रेसने मसूदला पकडले , भाजपेयींने सोडले,

भाजपेयींने अफजलला पकडले, काँग्रेसने फाशी दिली.

काँग्रेसने कसाबला पकडले , काँग्रेसने फाशी दिली.

निवडणुका गेल्या खड्ड्यात. ज्यांचे प्राण गेले त्याचा विचार आधी व्हायला पाहिजे. भारताने पाकिस्तानवर हल्ला करून चुणूक दाखवली आहे. त्यांच्यावर अजून आंतरराष्ट्रीय दबावपण आणला पाहिजे.

मघाचि पोस्ट इथे चुकून पडली.. माफ करा। योग्य जागी हलवली आहे. ..

एक विंग कमांडर पकडून नेला आपला, नाचक्की झाली सगळ्या जगात. भक्तांचे झाकाझाकी करायचे मेसेज येत आहेत, या घटनेबद्दल काही फॉरवर्ड करू नका, आमच्या फेकूच्या व्होट बँकेवर परिणाम होईल.

एक विंग कमांडर पकडून नेला आपला, नाचक्की झाली सगळ्या जगात. भक्तांचे झाकाझाकी करायचे मेसेज येत आहेत, या घटनेबद्दल काही फॉरवर्ड करू नका, आमच्या फेकूच्या व्होट बँकेवर परिणाम होईल.
Submitted by बोकलत on 28 February, 2019 - 08:06
<<

अश्या प्रतिक्रिया देणार्‍या लोकांच्या बुद्धीची किव करावीशी असे देखिल वाटत नाही.

अफगाणिस्तान, सिरिया व इतर शांताताप्रिय लोकांच्या देशात युद्ध करताना तिथल्या शांताताप्रिय तालिबान्यांनी अमेरिकन सैनिकांच्या अगदी हाल-हाल करुन हत्या केल्या मात्र तेंव्हा देखील एकाही मृत अथवा जखमी सैनिकाचे फोटो अमेरिकेने सोशल मिडीयावर फिरु दिले नव्हते (अर्थात शांताताप्रिय तालिबान्यांनी ते केले जसे आता पाकिस्तानी शांताताप्रिय लोकांनी केले) आता असे करण्यापाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना व्होट बँकेची चिंता होती की काय ?

भक्तांचे झाकाझाकी करायचे मेसेज येत आहेत >> पुलवामाच्या वेळेस देखिल होते , आणि तेदेखिल आर्मीने सांगितलं असं सांन्गुन. पण हेच भक्त २६/११ चे फोटो मात्र बिनदिक्कत टाकुन तेव्हाच्या सरकारवर टिका करत असतात

मात्र तेंव्हा देखील एकाही मृत अथवा जखमी सैनिकाचे फोटो अमेरिकेने सोशल मिडीयावर फिरु दिले नव्हते >>>>>>

तुम्ही तेव्हा अमेरिकेत होतात का? कि whtsapp / FB चे मोडेरेतर होतात? एक एक फोरवर्ड चेक करून डिलीट करायला?
नेहमीसारखे ठोकून देतो ऐसा जे

एक विंग कमांडर पकडून नेला आपला, नाचक्की झाली सगळ्या जगात
>>

हो नं. पुर्वीसारखं निषेध नोंदवुन इतर काहि मार्ग निघायची वाट बघायला हवी होति.

पुलवामा हल्ल्याबाबत एका कर्नलने लिहीलेले हे पत्र सध्या सोशल मीडीयात आहे. (सोबत दिलेला व्हिडीओ आधी पहावा मग पत्र वाचावे).

ई-मेल: yatenkr@gmail.com H.No. B २६०

सेक्टर गॅमा

ग्रेटर नोएडा

गौतम बुद्ध नगर

पिन: २०१३१०

१९ फेब्रुवारी,२०१९

प्रति

मा. पंतप्रधान

पंतप्रधान कार्यालय

साऊथ ब्लॉक, रायसिना हिल्स,

नवी दिल्ली-११००११

माननीय पंतप्रधान,

दिनांक १४ फेब्रुवारी, २०१९ रोजी आपल्या देशात काश्मीरमधील आजवरचा सर्वात भयंकर आत्मघाती अतिरेकी हल्ला , जो पाकिस्तानातील ISI नियंत्रित जैश ए मोहम्मद या संघटनेच्या स्थानिक अतिरेक्याने तब्बल २५०किलो स्फोटकं भरलेल्या स्कॉर्पिओ वाहनांची धडक जवानांच्या बसला देऊन केला गेला. यात ४२ जवानांना त्यांच्या प्राणांची आहुती द्यावी लागली. साहजिकच अपेक्षेप्रमाणे देशभरात या अत्यंत निर्घृण हल्ल्याबद्दल अत्यंत तीव्र संतापाची लाट उसळली.
प्राथमिक विश्लेषणातून हे लक्षात येते कि, जवानांच्या काफिल्याची वाहतूक सुरु असताना त्याच मार्गावरून त्याच वेळी नागरी वाहतूक सुरु ठेवण्याची परवानगी देणे हे अत्यंत घातक आणि जीवघेणे ठरले आहे. यावेळी मला ३ नोव्हेम्बर, २०१४ ची घटना आठवते जेव्हा काश्मीरमधील बडगाम येथे एका आर्मी चेक पॉईंट वरील जवानांना, तीन चेक पॉईंट्स वर थांबायला सांगूनही न थांबलेल्या एका भरधाव मारुती कार वर नाईलाजाने गोळीबार करावा लागला होता आणि त्यात दोन तरुण मुलांचा मृत्यू झाला होता.
या प्रसंगानंतर घडलेल्या गोष्टींबद्दल बोलण्याआधी मला या संबंधातील काही महत्वाच्या विषयांबद्दल थोडक्यात बोलायचे आहे. पंतप्रधान जी, गेल्या काही दशकात जम्मू-काश्मीर हि एक युद्धभूमी बनली आहे हे वेगळ्याने सांगण्याची काही गरज नाही. तिथे असलेले अतिरेकी हे काही साधे सुधे गुन्हेगार नाहीत तर अत्यंत उत्तमरीत्या प्रशिक्षित आणि शस्त्रसज्ज आहेत. नेहेमीच अतिरेकी आणि जवान यांच्यातील चकमकींमध्ये हे लक्षात आलय कि जीव वाचण्याची शक्यता हि बऱ्याचदा पहिले कोण गोळी चालवतो यावर अवलंबून असतं. अशा परिस्थितींमध्ये जवानांजवळ विश्लेषण करत बसण्याचा अवधी नसतो. अशा परिस्थितीला परिणामकारकरीत्या हाताळता यावं यासाठी लष्कराने एक स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) बनवलेली आहे. बडगाम मधील चेक पोस्ट वरील जवान ३ नोव्हेंबर २०१४ रोजी त्या SOP चेच पालन करत होते.
हा प्रसंग आणि नंतरच्या घटनांबद्दल तुम्हाला लिहिलेल्या माझ्या एका पत्रात मी लिहिले आहेच. दि. १३ फेब्रुवारी, २०१८ चे ते पत्रं मी सोबत जोडले आहेच. पण तरीही, तुमच्या सोयीसाठी मी त्यातील एक उतारा इथे पुन्हा लिहीत आहे. कोट “४. तरीही, बडगाम च्या घटनेबद्दल तुमची वैयक्तिक भूमिका जास्त चिंताजनक वाटते जी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकांदरम्यान तुम्ही जाहीर व्यक्त केली. तुमच्या पक्षाच्या प्रचारादरम्यान एका जाहीर सभेत तुम्ही लष्कराच्या त्या जवानांवर केलेल्या कारवाईचे जाहीररीत्या श्रेय घेतले होते. लष्कराच्या मनोधैर्यावर त्याचा काय परिणाम होईल याची पर्वा न करता तुम्ही ते बोलला होता. माझ्या माहितीप्रमाणे पंतप्रधानाने लष्करी जवानांवरील कारवाईचे श्रेय घेण्याचा तो पहिलाच प्रसंग असेल.
वर म्हटल्याप्रमाणे, तेव्हा जम्मू-काश्मीर मधील विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरु होता. साहजिकच, निवडणुकांच्या राजकारणासाठी आणि काश्मीरमधील जनतेला खुश करण्यासाठी लष्कराच्या Northern Command च्या मुख्य अधिकाऱ्याला त्या घटनेबद्दल जाहीररीत्या माफी मागायला भाग पाडलं गेलं होत. सोबत जोडलेल्या २७ नोव्हेम्बर, २०१४ च्या NDTV च्या रिपोर्टनुसार “जम्मू काश्मीर मधील सर्वोच्च दर्जावरील लष्करी अधिकाऱ्याला नवी दिल्लीतील राजकीय नेतृत्वाने त्या दोन तरुणांच्या घरी जाऊन माफी मागून नुकसानभरपाई देण्याबद्दल सांगितले गेले.” त्याच वृत्तात पुढे म्हटलं आहे कि “आजवरच्या सर्वात कमी वेळेत झालेल्या चौकशीनुसार (अर्थातच राजकीय दबावाखाली) त्या दोन तरुणांच्या मृत्यूबद्दल लष्कराने ९ जवानांना दोषी ठरवले आहे. ३ नोव्हेम्बर रोजी त्यांनी केलेल्या गोळीबारात हे दोन तरुण मृत्युमुखी पडले होते.”
श्रीनगरमधील एका जाहीर सभेतील तुमच्याच एका भाषणावरून हे सुस्पष्ट होते कि हे सर्व कोणाच्या सांगण्यावरून केलं गेलं. तुमच्या त्या भाषणाची विडिओ क्लिप, जी NDTV वर दाखवली गेली होती, सध्या सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध झाली आहे. तुमच्या सोयीसाठी तुमच्याच भाषणातील एक भाग मी इथे देत आहे. तुमच्या नेहेमीच्याच थाटात तुम्ही बोलला होतात कि “पहिली बार, तीस साल में पहिली बार, ये मोदी सरकार कि कमाल देखिये. पहिली बार सेना ने प्रेस कॉन्फरेन्स लेके कहां कि जो दो नौजवान मारे गये थे, ये सेना कि गलती थी … और सेना ने अपनी गलती मानी, inquiry commission बैठा और जीन लोगोने गोली चालावी थी उनपर केस दर्ज किया गया है… ये मेरे नेक इरादोका सबूत है भाईओ बहनो … तीस साल मी नही हुआ है… तीस साल नहीं हुआ है… और इसलिये काश्मीर के मेरे भाईओ बहनो मैं आपको न्याय दिलाने के लिए आया हूं..”
तुम्ही अगदी खरं बोललात पंतप्रधान जी, जेव्हा तुम्ही म्हणालात कि “तीस साल में नहीं हुआ है….” कारण यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानाने लष्कराच्या प्रमुख अधिकाऱ्याला त्याच्या जवानांनी केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे कर्तव्य बजावल्याबद्दल जाहीर रित्या माफी मागायला भाग पाडले नव्हते. यामुळे लष्करातील जवान निराश आणि अपमानित झाला. त्यांचं काहीही व्यक्तिगत वैर नव्हतं. गेली काही दशकं या अघोषित युद्धात, जवान रोज त्यांचं रक्त सांडत आहेत, प्राण अर्पण करत आहेत आणि ते फक्त या देशाची अखंडता कायम राहावी आणि देशाचा तिरंगा ध्वज उंच फडकत राहावा म्हणून. आत्ता मी हे पत्रं लिहीत असताना सर्वच माध्यमांवर पुलावामाचा बदला घेताना चार जवान आणि एक पोलीस कर्मचारी बळी पडल्याची बातमी येत आहे.
हे वेगळ्याने सांगण्याची काही आवश्यकता नाही कि आपल्या कृत्यांमुळे सैनिक अत्यंत निराश झाले आहेत. तरीही, तुमच्या कृत्यांचा दुर्दैवी दूरगामी परिणाम म्हणजे “वाहनावर बसवलेल Improvised explosive devise” हे आहे आणि त्यामुळे आज देश युद्धाच्या सीमेवर येऊन ठेपला आहे. मुफ्ती मोहमद सैद यांच्या सरकारच्या काळात लष्कराच्या काफिल्यांच्या वाहतुकीच्या वेळेच्या नियमात शिथिलता आली होती. बडगामच्या घटनेनंतर त्यात आणि चेक पोस्ट्स मध्ये अधिकच कमी केली गेली. मला हे स्पष्टपणे सांगण्यात काहीच हरकत वाटत नाही कि लष्कराच्या कारभारात राजकीय हस्तक्षेपामुळे पुलवामा सारखी घटना घडणारच होती. पंतप्रधानजी, जर आपली इच्छा असेल तर गेल्या काळातील घटनांच्या मालिकेचा विचार केलात तर त्याचे पडसाद आपल्याला पुलावामाच्या घटनेत दिसून येतील. जर आपली इच्छा असेल तर…

जय हिंद !

आपला नम्र,

कर्नल (निवृत्त) यतेंद्रकुमार यादव

हाच तो व्हिडीओ
https://www.facebook.com/mmgupte/videos/10162220052765725/

यतेंद्रकुमार यादवाना बागलकोट येथे पाठवायला हवं. एका देशभक्त प्रधान्सेवकावर चिखलफेक करतात म्हणजे काय?

काँग्रेसने कसाबला पकडले , काँग्रेसने फाशी दिली.
>>>>>>>

जनाची नाहीच आहे, मनाची तरी लाज बाळगा.
कसाबला जिवंत पकडण्यासाठी स्वत:चा जीव गमावणारे तुकाराम ओंबाळे काँग्रेसचे सदस्य होते का?

ते चिव्हिलियन ट्रॅफिक बंद करतात म्हणजे गाड्या थांबवुन ठेवतात का? आपल्या मुंबे पुणे एक्स्प्रेसवे सारखा कुंपण बंद असतो का हा रोड? नै म्हणजे चिव्हिलियन ट्रॅफिक थाम्बवुन ठेवले असते म्हणजे निर्धोक काफिला गेला असता अस म्हणताहेत म्हणुन विचारल.

Submitted by केदार जाधव on 28 February, 2019 - 10:29
सैनिकांच्या पराक्रमाचे पोवाडे जनतेला जोश वाटावा म्हणून गायले जातात आणि दुश्मन किती क्रूर आहे सांगण्या पाठीमागे जनतेत राग निर्माण होवून सरकारला पाठिंबा मिळावा हा हेतू असतो .किती ही कडू आसल तरी काश्मीर हा आता काश्मिरी तेशी संबंधित विषय राहिला नसून खूप जटिल झाला आहे .
दोन्ही देशात जसे भारतात काश्मीर प्रश्ना वरून आक्रमक भूमिका घेतली की निवडणुका जिंकता येतात तसेच पाकिस्तान मध्ये सुधा भारता विरुद्ध कडक भूमिका घेतली की निवडणुका जिंकता येतात त्याला हिंदू आणि मुस्लिम ह्यांचा ऐकमेकवर असलेला अविश्वास आणि दोन्ही धर्मात खूप वर्षा पासून असलेला रक्तरंजित संघर्ष ही कारण आहेत .
भले आपण स्वतःला कितीही धर्मनिरपेक्ष देश समजत आसलो तरी पाकिस्तान भारताला हिंदू बहुसंख्य देश किंवा हिंदू राष्ट्र च समजते त्या मुळे काश्मीर प्रश्न धार्मिक ज्वर दोन्ही देशात वाढवतो आणि बहुसंख्य जनतेची मते आक्रमक भूमिका घेणाऱ्या पार्टी ला मिळतात .
दुसरं हा प्रश्न sutuch नये आसा दोन्ही देशातील मवाळ आणि जहाल दोन्ही पक्षांना वाटत कारण ह्या दोन्ही देशात असलेली प्रचंड आर्थिक विषमता,सामाजिक विषमता,भाषिक वाद , असे खूप सारे प्रश्न ह्या दोन्ही देशाचे अस्तित्व धोक्यात आणू शकतात .बांगला देश निर्मिती त्याचाच बाळ आहे .
आणि हे सर्व प्रश्न सोडवायचे म्हणजे खूप कष्टाचे काम आहे आणि काही शतक निःपक्ष पने कठोर नियोजन करावे लागेल ते खूप कष्टाचे आहे .
त्या पेक्षा काश्मीर मध्ये हिंसक कारवाई च भांडवल केले की जनता सर्व अन्याय विसरून देश म्हणून ऐक होते हा पण प्लस पॉइंट आहे .आणि सर्वात सोपा उपाय सुधा .
पण आता परिस्थिती बदली आहे science खूप प्रगत झाल्या मुळे शस्त्र आणि अस्त्रची विनाशक क्षमता खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्या मुळे युद्ध झाले तर त्याचे परिणाम फक्त सैनिक पर्यंत मर्यादित राहत नाहीत तर खूप मोठ्या प्रमाणात जीवित हानी होवू शकते ,अणुबॉम्ब किंवा रासायनिक शस्त्र मनुष्य हानी बरोबर पर्यावरणाची सुधा प्रचंड हानी करू शकतो त्या मुळे कितीही वाटलं तरी युध्य हा पर्याय न निवडणे शाहणपण आहे .
युद्ध मुळे अगोदरच कमकुवत असलेली अर्थव्यवस्था अजुन कमजोर होईल आणि बेरोजगारी वाढेल .
नवीन येणाऱ्या रोबोट नी अगोदरच रोजगार प्रश्न भीषण बनवला आहे .त्यात ही भर नको .
त्या मुळे मध्य युगिन काळात जे घडलं ते सर्व विसरून आधुनिक जगाच्य विचारातून प्रश्न मिटला पाहिजे हीच भूमिका जनतेला पटविणे हे नेत्यांचं काम आहे .
ऐकमेका विरुद्ध तिरस्कार निर्माण होईल आशा पोष्ट त्या साठी टाळणे हेच देशप्रेमी (दोन्ही देशातील) लोकांचं कर्तव्य आहे आस मला वाटतं

नै होत हो युद्ध बिद्ध. झाल तरी ८ १० दिवस होइल फार्फार त. ते रणगाडे पळवायला अन विमानं उडवायला लागणारं तेल कुठाय आपल्याकड?

Tas Nahi युद्ध करण्यासाठी भारत सक्षम आहे .प्रश्न युद्ध साहित्याचा नाही विकणारे तयार आहेत विकायला फक्त ऑर्डर मिळाली पाहिजे

गार्डियन आणि इम्रान खान यांच्यात चांगले संबंध नाहीत. तरीही ही बातमी वाचली तर भारत सरकारचे दावे अगदीच चुकीचे आहेत असे वाटत नाही.

https://www.theguardian.com/world/2019/feb/27/pakistan-pm-imran-khan-app...

@बोकलत,

एक विंग कमांडर पकडून नेला आपला, नाचक्की झाली सगळ्या जगात. भक्तांचे झाकाझाकी करायचे मेसेज येत आहेत, या घटनेबद्दल काही फॉरवर्ड करू नका, आमच्या फेकूच्या व्होट बँकेवर परिणाम होईल. >>

विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्यानंतर त्यांना पाकिस्तानी लोक मारहाण करतानाचे व्हिडीओ पाकिस्तानने सगळीकडे प्रसृत केले, ते व्हिडीओ पाहून तुम्हाला आनंद झाला कि वाईट वाटलं?

त्यावर भारत सरकारने त्यांना सन्मानाने वागवून कुठल्याही तडजोडीशिवाय भारताच्या सुपूर्द करावे हि धमकीवजा मागणी पाकिस्तानकडे केल्यानंतर पाकिस्तान त्यांना शुक्रवारी (म्हणजे जिनिव्हा कराराप्रमाणे ८ दिवस होण्यापूर्वीच) भारताच्या सुपूर्द करतोय, हि गोष्ट समजल्यावर तुम्हाला आनंद झाला कि वाईट वाटलं?

दोन दिवसांपूर्वी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र सभा घेऊन या सर्व घडामोडींचा निवडणुकांवर परिणाम होणार या गोष्टीवर चिंता व्यक्त केली आणि आता काहीही त्याबाबत बोललं तर आपल्या मतांवर परिणाम होईल म्हणून सध्या गप्प राहावं असं त्यांच्यात एकमत झालं. हि गोष्ट समजल्यावर तुम्हाला आनंद झाला कि वाईट वाटलं?

काल येडियुरप्पा नावाच्या नेत्याने सर्जिकल स्ट्राईकमुळे भाजपाला जास्त जागा मिळतील असं वक्तव्य केलं. हि गोष्ट समजल्यावर तुम्हाला आनंद झाला कि वाईट वाटलं?

या सगळ्यात काश्मैर प्रश्नात अमेरिकेने शिरकाव करुन घेतला >>

माझ्या मते अमेरिकेनेच जैशच्या तळांबाबत उपग्रहांमार्फत मिळवलेली माहिती हल्ल्याच्या तयारीसाठी भारत सरकारला दिली असावी

>>>>>त्यांना पाकिस्तानी लोक मारहाण करतानाचे व्हिडीओ पाकिस्तानने सगळीकडे प्रसृत केले>>>>>
पाकिस्तान ने प्रसृत केला?? की मारहाण करणाऱ्या अतिउत्साही लोकांनी सायबर स्पेस मध्ये आणला तो व्हिडीओ?त्या व्हिडीओ मध्ये पाक सैनिक (सरकारी प्रतिनिधी) अभिनंदन ला सोडवताना दिसत आहेत.

>>>>>>वसांपूर्वी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र सभा घेऊन या सर्व घडामोडींचा निवडणुकांवर परिणाम होणार या गोष्टीवर चिंता व्यक्त केली आणि आता काहीही त्याबाबत बोललं तर आपल्या मतांवर परिणाम होईल म्हणून सध्या गप्प राहावं असं त्यांच्यात एकमत झालं. >>>>>
याला आधार म्हणून काही बातमी/स्टेटमेंट वगैरे? की कुजबज ब्रिगेड @वर्क ?

अमेरिकेनेच जैशच्या तळांबाबत उपग्रहांमार्फत मिळवलेली माहिती हल्ल्याच्या तयारीसाठी भारत सरकारला दिली असावी>>>>
परत एकदा मनाचे श्लोक म्हणायला कोणाची परवानगी लागत नाही, वाटते तर वाटू द्या Happy

इम्रान खानच्या ट्विट ला "the skin doctor" नावाचं एक ट्विटर अकाउंट हल्ल्याच्या काही तास आधीच तशी माहिती देतो.शिवाय विशेष म्हणजे या अकाउंट ला स्वतः मोदीशेठ फॉलो करत असतात.माध्यमात या बातम्या आल्यावर त्यांनी the skin doctor ला unfollow केलाय.

हे चाललंय काय नेमकं..?
अश्या गुप्त हल्ल्यांची माहिती आधीच Bjp IT cell वाल्यांना असते का..? असेल तर तो आपल्या जवानांच्या जीवाशी खेळ नाही का..? एखादा IT cell वाला फुटला आणि एखाद्या गुप्त कारवाईच्या आधीच त्याने पैश्याच्या लालसेपाई पाकिस्तानला त्याची माहिती दिली तर..?

हा सैनिकांच्या जीवाशी खेळ नाही का..?

@सिम्बा, ते बोकलत म्हणजे तुम्हीच का? माझ्या मनाचे श्लोक फारच वर्मी लागलेत तुमच्या... एव्हढं पर्सनली घेऊ नका..मलाही तुमच्यासारखेच मनाचे श्लोक लिहिण्याचा हक्क आहे साहेब. पण काहीही असो, मला तुम्ही भक्त म्हटले म्हणून मी तुम्हाला गांधीचाटू म्हणणार नाही.

"कुजबज ब्रिगेड @वर्क" असली मखलाशी करण्यापेक्षा जमतील तेव्हढी वृत्तपत्रे वाचत जा. तुम्ही जिथे राहता तिथे मिळत नसतील तर ऑनलाईन वाचा हि नम्र विनंती.

इस्लामिक देशांच्या (ओआयसी) बैठकीत सहभागी झालेल्या भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अपेक्षेप्रमाणे दहशतवादावर भाष्य केले आहे. भारतात हिंदू आणि मुस्लिम सौहार्दाने राहतात. पण खूप कमी लोक कट्टरवाद्यांच्या कचाट्यात सापडले आहेत. दहशतवाद केवळ धर्माला संपवण्याचे काम करतो. दहशतवादविरोधातील लढाई कोणत्याही विशिष्ठ धर्माच्या विरोधात नाही. इस्लामचा अर्थ शांतता आहे. अल्लाहच्या ९९ नावातही हिंसाचार नाही, असे स्पष्ट मत सुषमा स्वराज यांनी व्यवक्त केले.

-- काय हे स्वराज यांचे बरोबर आहे का? मुस्लीम धर्म आतंकवादी आहे असे ह्यांची अख्खी संघी पलटण गेल्या शंभर वर्षापासून बोंबलत असतांना स्वराज ह्यांनी हेच सत्य ओआयसी बैठकीत बोलावे तर खोटे का बोलल्या?

काहिही म्हणा.. सुषमाने इस्लामिक देशांच्या (ओआयसी) बैठकीत समस्त संघींची पाटलुन उपसली..!! Proud

-- काय हे स्वराज यांचे बरोबर आहे का? मुस्लीम धर्म आतंकवादी आहे असे ह्यांची अख्खी संघी पलटण गेल्या शंभर वर्षापासून बोंबलत असतांना स्वराज ह्यांनी हेच सत्य ओआयसी बैठकीत बोलावे तर खोटे का बोलल्या? >>>

-- तिथे बसलेल्या सर्व लोकांना तो खास शालजोडीतला टोमणा असेल. कारण वस्तुस्थिति काय आहे हे सगळ्याना माहीत आहे.

Pages