Submitted by आ.रा.रा. on 25 January, 2019 - 11:13
सुजनहो,
लोकसभेच्या निवडणूका जवळ येत आहेत.
१ जानेवारी २०१९ रोजी जर तुम्ही १८ वर्षे वय पूर्ण केलेले असेल, तर मतदार म्हणून नोंदणी करून घेणे तुमचे कर्तव्य आहे.
हे करण्याचा सोप्पा ऑनलाईन मार्ग म्हणजे ही लिंक. https://nvsp.in/Forms/Forms/form6?lang=en-GB
तुम्ही जुने मतदार अस्लात अन उदा, एनाराय वगैरे, किंवा नोकरीधंद्या निमित्त इतर मतदारसंघात रहात असलात, तरी https://nvsp.in/ या लिंकवर जाऊन वेगवेगळे ऑप्शन्स वापरू शकता.
मायबोलीवरील सूज्ञ वाचकांसाठी, ऑनलाईन नोंदणी कठीण नसावी. कृपया आपल्या आसपासच्या नवसज्ञान नागरिकांना नोंदणीसाठी प्रवृत्त करा.
बाकी तुम्ही कुणाला मतदान करावे हा सर्वस्वी तुमचा स्वतःचा निर्णय आहे. 'स्वतःची' इच्छा, बुद्धी, व आजूबाजूला जे दिसतंय ते पाहून निर्णय घ्या. आपलं अन आपल्या देशाचं भविष्य या मतदानातून ठरणार आहे.
ऑल द बेस्ट!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी आत्तापर्यंत 3 वेळा नाव
मी आत्तापर्यंत 3 वेळा नाव नोंदणी करून सुद्धा माझे नाव मतदार यादीत आलेले नाही.
सांगण्यास अत्यंत खेद वाटतो की मी आजतागायत एकदाही मतदान केले नाहीये.
आता ऑनलाईन ट्राय करून पहा.
आता ऑनलाईन ट्राय करून पहा. जमेल कदाचित.
रच्याकने,
रच्याकने,
मला चालू घडामोडी ग्रूपात धागा काढता येत नाहिये. म्हणून मदत हवी आहे मधे काढलेला आहे.
धन्यवाद आरारा. योग्य धागा.
धन्यवाद राजर्षी. योग्य धागा.
धन्यवाद. माझी पण स्थिती
धन्यवाद. माझी पण स्थिती दक्षिणा यांच्यासारखीच आहे. ऑनलाइन करून बघते होते का रजिस्ट्रेशन.
सेम केस विथ मी... कितिंदा तरी
सेम केस विथ मी... कितिंदा तरी ट्राय करून पाहीलंय. असो; आता ऑनलाईन रिक्वेस्ट टाकलीय... पाहूयात.
दक्षिणा +१
दक्षिणा +१
आता ऑनलाइन प्रयत्न करून बघते.
खूप आभार या धाग्याबद्दल.
या धाग्या करता मनापासून
या धाग्या करता मनापासून धन्यवाद
मी अठरा वर्षे पूर्ण केली त्याच सुमारास अठरा वर्षाच्या वरील लोकांना मतदानाचा अधिकार मिळाला तेव्हापासून आजतागायत कायम मतदान करत आलेलो आहे.
त्यातले बरेच वर्ष पुण्याबाहेर राहत होतो जिथे होतो तिकडून येऊन मतदान करायचो एकदा तर माझं म्हणजे माझ्या नावचं मतदान कोणीतरी आधीच करून गेलं होतं मग मी माझं बोट त्याच्यावर शाई नाहीये असे दाखवून तिथे हुज्जत घातली आणि सांगितले की मी तक्रार करीन आणि मग मलाही मतदान करायला दिले. फक्त एकदाच पालिका निवडणुकीत मतदान हुकलं
मतदान माझा हक्क मतदान माझा अधिकार
माझ्या निवडणूकपत्रावर ऍड्रेस
माझ्या निवडणूकपत्रावर ऍड्रेस थोडा चुकीचा आहे .पूर्ण नाही.
माझ्या शेजारच्याबाबतीत पण असच झालेलं.त्याने दुरुस्तीसाठी अर्ज केला तर पुढच्या यादीत नावच नव्हतं . त्यामुळे मी काही दुरुस्तीसाठी apply करणार नाही. आहे ते पण नाव जायचं . तसेही निवडणूक असली की बरोबर निवडणूकरिसीट येते
या लिंकसाठी धन्यवाद . फॉरवर्ड केलेली आहे.
सध्या तिथे नोंदवलेल्या
सध्या तिथे नोंदवलेल्या अर्जांची प्रक्रिया स्थगीत आहे असे समजते. मदत संपर्क क्रमांक सतत व्यग्र असतो. नजिकच्या निवडणूक कार्यालयात गेल्यास ऑक्टो. २०१८ अखेरीपर्यंत आलेल्या अर्जांवर काम चालू आहे, ते होऊन त्यांची यादी प्रकाशित झाल्यानंतर निवडणूकीपूर्वी वेळ असल्यास पुन्हा अर्ज स्वीकारण्यात येतील असे सांगण्यात आले.
यादीत नाव तपासले. अजून तरी
यादीत नाव तपासले. अजून तरी आहे.
पत्नीचे नाव नाही. त्यासाठी अर्ज केला आहे. प्रोसेसमध्ये आहे.