पाककला

आहारानुरूप आचारसंहिता, व्यवस्था आणि आहारसवयींचे मुद्रांकन

Submitted by भरत. on 17 January, 2018 - 00:20

मुंबईच्या आय आय टी नामक कुठल्याश्या संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आहाराची सोय करून दिली. त्यांच्या आवडीचा आहार करायचे स्वातंत्र्य दिले. इतकेच नव्हे, तर त्यांच्या आहारानुरूप ताटवाट्या इत्यादीचीही व्यवस्था केली. "आय आय टीच्या संकुलातील सर्व भोजनगृहांत देण्यत येणारे मुख्य जेवण हे शाकाहारी असून ते मोठ्या ताटामध्येच देण्यात येते. या व्यतिरिक्त ज्यांना मटण, अंडे यांसारखे मांसाहारी जेवण हवे असल्यास ते बाजूला वेगळ्या ताटामध्ये दिले जाते. मात्र विद्यार्थी मुख्य ताटामध्येच मांसाहारी जेवण घेत असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी भोजनगृहाला केली.

स्मूदी फॅन क्लब

Submitted by मेधा on 9 January, 2018 - 11:20

वेग वेगळ्या भाज्या, फळे यांचा आहारात समावेश असावा म्हणून, सोपे , सहज जमणारे प्रकार म्हणून, व्यायामशाळेत जाताना हातात स्मूदीचा प्याला दिसला तर जास्त भाव मिळतो म्हणून, अशा अनेकविध कारणांनी अनेक जण स्मूदीचे फॅन आहेत. आंतरजालावर वजन वाढवणे, वजन कमी करणे, इथपासून प्रत्येक प्रकारच्या व्याधी साठी स्मूदी च्या कृती सापडतात. तरिही, मायबोलीकरांच्या ट्राईड अ‍ॅण्ड टेस्टेड स्मूदी पाककृतींकरता हा धागा.

दादर पश्चिम, शिवाजीपार्क ह्य भागात विकेंड्ला कुकिंगचे क्लासेस आहेत का?

Submitted by स्वप्ना_राज on 26 December, 2017 - 07:29

दादर पश्चिम, शिवाजी पार्क ह्या भागात विकेंडला कुकिंगचे क्लासेस आहेत का? चायनीज, थाय, मेक्सिकन, बेकिंग ह्यापैकी एक शिकायची इच्छा आहे. असा काही क्लास केला असेल किंवा माहित असेल तर सांगा प्लीज. धन्यवाद!

जिव्हाळ्याच्या गोष्टी

Submitted by विद्या भुतकर on 28 November, 2017 - 23:15

आज पिठलं बनवत होते, गाठीचं, म्हणजे ज्यात बारीक बारीक गाठी दिसतात असं. मला ते घोटलेलं आवडत नाही. असो. तर ते बनवताना त्यात मी भरडलेले शेंगदाणे टाकते. ते माझ्याकडे असलेल्या कुटामधून निवडून टाकत होते. त्यावरून पुढे मग बरंच काही आठवलं. आणि वाटलं 'शेंगदाणे' या जिव्हाळ्याच्या विषयावर आपण अजून लिहिलं कसं नाहीये? म्हणून सुरुवातीपासून सुरवात करतेय.

इडली चिली

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 27 November, 2017 - 01:41

बर्‍याचदा आपल्या घरी केलेल्या ईडल्या उरतात. सारख्या त्याच खायला कंटाळा येतो (सगळ्यांनाच येतो असे नाही) म्हणून थोड्या वेगळेपणाने त्यांना संपविण्याचा एक चायनीज मार्ग.

इडलीचे तुकडे कापून
कांदा जरा जाडाच कापून घ्या
सिमला मिरचीचे तुकडे
आल-लसूण बारीक कापून

विषय: 
शब्दखुणा: 

सांभाराची (कोथिंबीरची) चटणी

Submitted by टीना on 25 November, 2017 - 04:56

नमस्कार लोक्स _/\_
बरेच दिवस झाले इथे काही लिहून.. काही पाकृ, काही आर्टवर्कचे धागे अस बरच काही खोळंबलय वेळ आणि मुडअभावी..

विषय: 
शब्दखुणा: 

आजारपणात खायचे पदार्थ

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 November, 2017 - 16:35

आजारपणात काय खावे आणि आणि काय नको हा प्रश्न नेहमीच पडतो. काय खाल्ले की त्रास होतो, काय खाणे चांगले, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तोंडाला चव नसताना काय घश्याखाली उतरू शकते. शेवटी अपराधी पोटाची भूक तर भागवलीच पाहिजे. पण काही पदार्थ ईतरवेळी अत्यंत आवडीचे असूनही आजारपणात तोंडाला चव नसल्याने खावेसे वाटत नाहीत, किंवा खावेसे वाटले तरी सर्दी ताप खोकल्यात चालत नाहीत. त्यामुळे प्रत्येकाचे आजारपणात खायचे पदार्थ ठरलेले असतात. तेच या धाग्यावर लिहायचे आहेत. कदाचित हे पदार्थ व्यक्तीपरत्वे बदलतील. एकाचे दुसर्‍याला चालणार नाहीत. पण चालले तर लोकांना चार अतिरीक्त पर्याय मिळतील.

विषय: 
शब्दखुणा: 

मुंग्या झालेल्या तुपाचा पुनर्वापर करता येईल का?

Submitted by राहुल बावणकुळे on 11 November, 2017 - 09:56

आम्ही गावाला गेलो असताना, साजूक तुपाला मुंग्या लागल्या आहेत. थोडथोडक तूप नसून ८००-९०० ग्राम तरी असावे, त्यामुळे फेकण्याची मुळीच इच्छा नाही. तर, तुपाला पुन्हा वापरण्यासाठी कुठले संस्कार करता येतील का? कृपया जाणकारांनी आपला सल्ला द्यावा. उत्तराच्या अपेक्षेत व तसदीबद्दल क्षमस्व!

राष्ट्रीय डिश "खिचडी" पाककृती आणि सन्मानसंहिता

Submitted by सिम्बा on 3 November, 2017 - 01:18

४ नोव्हेंबर ला भारताचे कनवाळू सरकार खिचडी प्रकाराला राष्ट्रीय अन्न म्हणून घोषित करणार आहे.
खिचडी प्रकार आसिंधु-सिंधू आणि अहद राजकोट तहद बंगाल वेगवेगळ्या प्रकाराने खाल्ला जातो. फक्त बरोबरचे तोंडीलावणे दही, चुंदा, टोमातोची चटणी, ते तळलेले मासे असे बदलत जाते, पण सगळ्याच ठिकाणे याच्याकडे कम्फर्ट फूड म्हणून पाहतात.
हेक्टिक दिवसानंतर रात्री समोर आलेली गरम गरम खिचडी , वर तुपाची धार, सोबत पापड कुरडया म्हणजे मला तरी स्वर्ग्प्रप्तीचा आनंद मिळतो.

शब्दखुणा: 

पुराणासाठी वांगी - (विनोदी धागा)

Submitted by नानाकळा on 26 October, 2017 - 11:13

प्रस्तुत लेखन कोणे एकेकाळी सोमरसाच्या अतिशुद्ध मुग्धतेत रातराणीच्या सुगंधासारखे अवचित अवतरलेले, फार किस पाडू नये. Happy

Pages

Subscribe to RSS - पाककला