पाककृती स्पर्धा ३: फ्रूट भेळ- सायो

Submitted by सायो on 1 September, 2025 - 20:33

आता भेळेची कृती ती काय द्यायची पण फळं ५०% असावीत म्हणून फोटोसकट दाखवणं भाग आहे.
तर ह्यात द्राक्षं आणि कच्ची कैरी अशी दोन फळं वापरली आहेत. बाकी चुरमुरे, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, शेव, पुर्‍या, गोड आणि तिखट चटणी वगैरेही आहेतच.
सगळं चिरुन झाल्यावर मोठ्या बोलमध्ये एकत्र करुन फोटोपुरती मूद पाडायचे सोपस्कार करुन मग काला करुन खाण्यात आला आहे.

b86aa336-d441-474d-bb8f-3ec6e4a84e07.jpeg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कैरी घातलेली खाल्ली होती, द्राक्षांची आयडिया मस्त आहे!
फोटोही मस्त!

(भेळेची मूद?! भेळेला मिनिस्कर्टवर साडी नेसवून 'दाखवायला' उभी केल्यासारखं वाटतंय! Proud )

छान आहे आयडिया भेळेत आंबट गोड द्राक्षं घालण्याची . फोटो छान दिसतोय ...
भेळेची मुद ही आयडिया भारी आहे.
स्वाती मिनिस्कर्ट वर साडी Happy

मस्तच.
यात डाळिंब, चंदू .. Rofl इ. घालून ही छान लागेल.

अमित, डाळींब तर आहेच स्टँडर्ड. पण मी चंदू आणलं होतं घालायला. पण कैरीही आहे हे लक्षात आल्याने चंदू स्कीप केलं.
मुलुंड वेस्टला अशी गारेगार फळं घातलेली भेळ मिळते. मला त्यात अननस असल्याचंही लक्षात आहे. ह्यात क्वांटिटीची अट असल्यामुळे बरंच घालता नाही आलं.