पाककला

अमृताहूनी गोड >> हेल्दी फ्रुट पिझ्झा >> जाई.

Submitted by जाई. on 5 September, 2017 - 10:52

गणेशोत्सवातच नव्हे तर मायबोलीवरही पाककृती लिहायची ही पहिलीच वेळ आहे . त्यामुळे अस्मादिकास सांभाळून घ्यावे ही नम्र विनंती.

तर आधीचे दोन प्रयोग फसल्यावर जाऊ दे आता म्हणून आधीच शस्त्र टाकून झाली होती.पण डोक्यातला किडा काही स्वस्थ बसवू देईना. त्यामुळे डोकं शिणवत असताना ही रेसिपी आठवली . आधीचे प्रयोग फसल्यावर (पक्षी -किचन मध्ये सांडलवंड केल्यावर ) आता मातेकडून हे शेवटचं असा अल्टिमेटम मिळाला होता .पण god help to them, those help themselves . तर आता बघूयात रेसिपी .

साहित्य

उपकरणं शरणं गच्छामि -गोडाच्या शेवया - साक्षी

Submitted by साक्षी on 5 September, 2017 - 09:21

लागणारा वेळ : ४० ते ४५ मिनिटे
वापरलेली उपकरणे :
अ) यादी १ मधील ढोकळा स्टॅन्ड किंवा इडली स्टँड
आ) यादी २ मधील सोर्‍या
1Upakarane.jpg
साहित्य :
उकडीसाठी :
१) तांदूळ पिठी - १ भांडं भरून (मी अग्रजची वापरली)
२) पिठीइतकेच पाणी
३) साजूक तूप - १ ते १.५ चमचा
४) मीठ - चिमूटभर
रसासाठी :
५) नारळाचं दाट दूध - १ मोठ्ठं भांडं भरून
६) गूळ - १.५ वाटी (गोडाच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करावा. पण रस थोडा गोडंच करावा. म्हणजे शेवया घातल्यावर योग्य गोड होते.

विषय: 

ज्युनिअर मास्टर शेफ - सना ४.वर्षे ३ महिने - जुजुब

Submitted by नानबा on 5 September, 2017 - 01:11

साहित्य -
जिलेटीन २ चमचे
साखर २ वाटया
पाणी १.२५ वाटी
खादय रंग
इसेन्स

KRutee:
१/२ कप पाण्यात जिलेटीन विरघळून घेतल.
उरलेलया पाण्यात २ वाटया/कप साखर घालून गैस वर, मंद आचेवर १० मिनिटे ढवळले.
तयात जिलेटीन चे मिश्रण मिसळले.
अजून २० मिनिटे गैस वर ठेवले.
इसेन्स , रंग घालून , ग्लास मोल्ड मधे घालून फ्रिज मध्ये ठेवले.
निम्मा भाग तासाने काढून वड्या पाडल्या. निम्म्या जास्त वेळाने (दुसर्‍या दिवशी). दुसर्‍या दिवशीपर्यंतच्या वड्या जास्त खुट्खुटीत झाल्यात. काढून झाल्यावर वड्या साखरेत रोल केल्या.

विषय: 

ज्युनियर मास्टरशेफ - झटपट ब्रेडची रसमलाई- श्रावणी - वय ११ वर्षे.

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 September, 2017 - 15:11

आई आणि किचन हे समिकरण श्रावणीला समजू लागल्यापासून कळू लागल होत. आईची जागेपणीची जास्तीत जास्त सोबत किचन मधेच. बाळ असताना जेवण करताना घरातली चमचे, वाटी, बशी देउन किचन मधेच खेळात गुंग असलेल बाळ कधी आईच अनुकरण करू लागल ते कळलही नाही. खेळण्यातल्या चपात्या करता करता आई शेवटची चपाती मी करते अस करत करत श्रावणी आता बरेचसे खाद्य पदार्थ बनवू लागली आहे. चहा, गरज पडल्यास वरण-भात , पिझ्झा, ऑमलेट, कांदेपोहे, बिस्कीट केक, सॅडविच असे अनेक पदार्थ त्ती बनवतेच पण आता यूट्युबवरच्या तिला झेपतील अशा पाकक्रियेच्या विविध रेसिपीजही ती ट्राय करते. बनवलेले पदार्थ बहुतांशी चविष्टच असतात.

विषय: 
शब्दखुणा: 

साक्षी - ज्युनियर मास्टरशेफ - लिंबोटी - वेद - वय ९ वर्षे

Submitted by साक्षी on 4 September, 2017 - 08:06

मी केलेली मदत : गॅसवर ठेवायला, उतरायला , फोटो काढायला आणि इथे लिहायला मी मदत केली.
बशीत काढून घेणे इ. त्याने केले आहे, त्यामुळे इथला प्रमाण आणि फोटो यांची सांगड घालू नका. Wink

लागणारा वेळ : १० ते १५ मिनिटे
साहित्य : लिंबू - १/२
जिरेपूड : १/४ चमचा
काळं मीठ(नसेल तर साधं मीठ चालेल) : १/४ चमचा
साखर : १/४ चमचा

विषय: 

अमॄताहुनी गोड - मँगो मलई डबलडेकर फज - आशिका

Submitted by आशिका on 2 September, 2017 - 00:46

नमस्कार मंडळी. मायबोली २०१७ च्या गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या पाककॄती स्पर्धेच्या निमित्ताने यावर्षीच्या नियमांनुसार पाककॄतीचा विचार करत असतांना ही फज बनवण्याची कल्पना सुचली. गोड पदार्थ तर बनवायचाय पण साखर, गुळ यांशिवाय त्यामुळे जरा विचार करावा लागलाच उपलब्ध पर्यायांचा. मध आणि फळांचे रस चालू शकतील हे वाचून जरा हायसे वाटले. मग वाटलं की बाप्पाच्या नैवेद्यासाठी लाडू, पेढे, बर्फी हे नेहमीच केले जाते. तर यावर्षी काही वेगळा पर्याय विचारात घेऊ आणि 'फज'बनवायचे फायनल केले.

विषय: 

संपदा- ज्युनिअर मास्टर शेफ- पास्ता सॅलड- मैत्रेयी- वय १३ वर्षे

Submitted by संपदा on 1 September, 2017 - 10:35

गणेशोत्सव आला की मायबोलीचे उपक्रम जाहीर होतात हे आमच्या पाल्याला आता व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळे लगेचच विचारणा झाली आणि सॅलड आवडत असल्याने ह्या पाककृतीवर पटकन एकमत झाले. मूळ कृती जेमी ऑलिव्हरची आहे. त्यात थोडे फेरफार करून आमच्या घरी हे सॅलड नेहमीच बनत असते. आज मैत्रेयीने ते बनवले आहे. फोटो काढून इथे अपलोड करण्याचे आणि सर्व स्टेप्स लिहिण्याचा आग्रह केल्याने पूर्ण पाककृती लिहिण्याचे काम मी केले आहे Happy

लागणारा वेळ- १/२ तास

विषय: 
शब्दखुणा: 

अमृताहूनी गोड >> हेल्दी फ्रुट डेझर्ट >> मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 29 August, 2017 - 14:05

आपल्या परंपरेला जागून माबो ने आपली ह्या वर्षीची पाकृ स्पर्धा ही कठीणच ठेवली आहे. साखर, गूळ, मिल्कमेड वैगेरे काही ही न वापरता गोड पदार्थ बनवणे खूपच कठीण आहे. खूप विचार करून ही माझी गाडी खजुराचे लाडू किंवा खजूर रोल्स यापुढे जात नव्हती. तरी ही हा मी केलेला पदार्थ कसा वाटतोय ते सांगा.
साहित्य:
आटवलेलं दूध ( अर्धा लिटर होल मिल्क आटवून निम्मं करून घ्यावे. )
काळ्या बिन बियाच्या खजुराचे छोटे तुकडे , थोडा खजूर बारीक वाटून , थोडा मध
केळं, चिकू, द्राक्ष, किवी, सफरचंद, याचे छोटे छोटे तुकडे डाळिंबाचे, दाणे,
थोडा सुका मेवा आणि वासासाठी वेलची पावडर.

कृती

विषय: 

दोडक्याचे नाचोच्

Submitted by friend१६ on 28 August, 2017 - 11:20

दोडक्याचे साल हलके साफ करून किसुन घेतला

मग त्यात दीड वाटी गव्हाचे पीठ व पाऊण वाटी बेसन पीठ टाकुन हिरवी मिरची ,आलं-लसुण पेस्ट, ओवा, जीरे पावडर, मीरे पुड,कलौजी व तीन टाकुन घट्ट पीठ मळुन 10मिनिटांसाठी झाकुन ठेवले.

नंतर त्या भीजवलेल्या पीठाच्या पोळीसारख्या पोळ्या लाटुन तव्यावर अर्धवट भाजुन घेतल्या व गरम तेलात कुरकरीत होईपर्यंत तळुन घेतल्या.

पूर्ण गार झाल्यावर बंद डब्ब्यात ठेवुन दिले तरी चालते,8दिवस ही कुरकरीत राहतात.

दोडक्याप्रमाणे इतरही भाज्यांपासुन इसे नाचोज् बनवता येतात, शिवाय मैदाचा वापर नाही ना?

विषय: 

"अमृताहुनी गोड - <<<खजुराचे लाडू >>> - <<< दीपा जोशी >>>’’

Submitted by दीपा जोशी on 27 August, 2017 - 12:00

reduced khajur ladu.jpegखजुराचे लाडू
१) प्रकार पहिला - साधे लाडू

लागणारा वेळ- एक तास

साहित्य :
१. बिनबियांच्या खजूराचे बारीक केलेले तुकडे - एक मोठी वाटी दाबून भरून
२. बेदाणे - पाव वाटी
३. सुक्या खोबऱ्याचे बारीक तुकडे - एक मोठी वाटी गच्चं भरून
४. खसखस - पाव वाटी
५. भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट -पाव वाटी
६. वेलदोडे - ३/४

विषय: 

Pages

Subscribe to RSS - पाककला