
गोव्याच्या गावा जावे !
अननसाची भाजी :
साहित्य : अर्थातच अननस (अर्धा ),पिकलेला असावा. पाव वाटी हरभऱ्याची डाळ दोन तास भिजत घालावी. असल्यास हिरवे वाटाणे रात्रभर भिजलेले (ऑपशनल)
गोडा मसाला अर्धा ते पाऊण चमचा,लाल तिखट अर्धा ते पाऊण चमचा (मीठ आणि तिखट खरे तर आपापल्या चवीनुसार)
ओले खोबरे मिक्सिवर वाटून अर्ध्या नारळाचे खूप होते /पुरेसे होते .
कृती : स्स ण कनी नारळ फोडून अर्ध्या नारळाचे खोबरे तुकडे करून मिक्सित पाणी घालून वाटावे , साधारण एक कप पाणी घालावे. कूकरला डाळ,वाटाणे आणि अननसाच्या फोडी वाफवून घेणे. (एक शिट्टी द्यावी) आणि डाळीत ,वाटाण्यात आणि अननसाच्या फोडी शिजवताना त्यात थोडे पाणी घालून शिजवावे..
हे तिन्ही जिन्नस वाफवून झाले कि एकत्र करून टोपात घालावेत , त्यात मसाला,गूळ, तिखट, मीठ घालावे आणि अर्धा कप पाणी घालून ,त्यात वाटलेले ओले खोबरे घालून खदखद शिजवावे .
पाचेक मीनीट झाकण ठेवून शिजवावे . वरून हिंग मोहरी कडीपत्ता हळद अशी फोडणी द्यावी.
फोडणी हळुवार मिक्स करून घ्यावी भाजीत. वरून थोडी कोथिंबीर घालावी.
गरम पोळी, भात बरोबर स्वाहा करून टाकावी! खूप मस्त तिखट, आंबट , आणि गोड अशी मिक्स चवीची भाजी बनते . नक्की करून पहा. आवडेलच!
पारंपरिक पाककृती आहे, सासूबाईंनी शिकवली होती करायला. मला खूप आवडली , मग तुमच्याशी शेअर केली. आता थांबते. केलीत तर नक्की सांगा आवडली का ते ! मूळ कृतीत वाटाणे नव्हते, मी ऍड केले , छानच लागताहेत त्यात.
वाचतानाच तोंपासु. छान पदार्थ
वाचतानाच तोंपासु. छान पदार्थ वाटतोय. नवरात्रात बिना कांदालसूण भाजीची सोय केलीत. एक वेगळा भाजी प्रकार मिळाल्याने देवीलाही रुचिपालट.
धन्यवाद प्राचीन. नक्की करून
धन्यवाद प्राचीन. नक्की करून पाहा.
शीर्षक बदला
शीर्षक बदला
पाककृती स्पर्धा 3 - अननसाची भाजी - mrsbarve
अननसाची भाजी हे पदार्थाचे नाव येऊ द्या त्यात.
युनिक पदार्थ आहे
Thank you! Done!
Thank you! Done!
मस्त! करून बघायला हवी.
मस्त! करून बघायला हवी.
हे अननसाचे सांबारंच्या जवळ
हे अननसाचे सांबारंच्या जवळ जाणारं दिसतय.
तोंपासू एकदम
तोंपासू एकदम
मेरी गाडी लेट हो गयी
मी अननसाचाच तिखट पदार्थ करुन पोस्ट करणार होते उद्या किंवा परवा. लेकीच्या आवडता पदार्थ म्हणून तिलाही प्रॉमीस करुन खुश केले होते. अब मै क्या करु 
मेरी गाडी लेट हो गयी Sad Lol
मेरी गाडी लेट हो गयी Sad Lol मी अननसाचाच तिखट पदार्थ करुन पोस्ट करणार होते उद्या किंवा परवा. लेकीच्या आवडता पदार्थ म्हणून तिलाही प्रॉमीस करुन खुश केले होते. अब मै क्या करु Lol
नवीन Submitted by कविन on 2 September, 2025 - 10:21
अननसाचे लोणचे करा ना, हाकानाका
अ. बा. ते ही करेन पण लेकीला
अ. बा. ते ही करेन पण लेकीला प्रॉमीस केलेला पदार्थ केल्याशिवाय काही त्या अननसाला मुक्ती नाही
घेतीलच सगळे आंबट गोड मानून
इथे या भाजीची आत्ते बहिण म्हणून पोस्टेन आता
अननस , खोबरे आणि गूळ
अननस , खोबरे आणि गूळ म्हटल्यावर सासव आठवलं.
ही कृती छान वाटते आहे.
मस्त रेसिपी!
मस्त रेसिपी!
मी सासवच करणार होते, आता कॅन्सल
छान दिसतंय, वेगळी रेसिपी.
छान दिसतंय, वेगळी रेसिपी. मलाही सासव आठवलं. एका कारवारी लग्नात खाल्लेलं.
मस्त रेसिपी !
मस्त रेसिपी !
छान दिसते आहे ही भाजी. करून
छान दिसते आहे ही भाजी. करून बघणेत येईल.
मस्त आहे रेसिपी. कॅन्ड अननस
मस्त आहे रेसिपी. कॅन्ड अननस आणून ट्राय करायला आवडेल.
अननस , खोबरे आणि गूळ
अननस , खोबरे आणि गूळ म्हटल्यावर सासव आठवलं.
ही कृती छान वाटते आहे.....+१.
मस्तच आहे रेसिपी. सासव आठवलं
मस्तच आहे रेसिपी. सासव आठवलं+१
छान पाककृती.
छान पाककृती.
मी पण अननसाचीच कृती दिली आहे, पण वेगळी आहे. अननस आणला होता आणि तो प्रयोग करून बघायचा होता, म्हणून मग आधी मुद्दाम ही कृती वाचली नव्हती, नाव बघून सुद्धा.
पिझ्झ्यात अननस मला खूप आवडतात
पिझ्झ्यात अननस मला खूप आवडतात. अनेक लोकांना ती ब्लासफेमी वाटते. (जणू त्यांचा आज्जा नेपल्स का कुठे जन्मला आला होता आणि यांची उभी हयात अव्हनच्या धुरात खोकून खपली असावी तसे अंगावर येतात). का आवडत असावेत त्याचा उलगडा आज झाला. हे आंबड तिखट गोड कॉम्बोच भारी आहे त्यामुळे बहुतेक. त्यामुळे ही रेसिपी नक्कीच करून पाहणार!!!!!!
|\||