पाककला

खड्ड्यातील कोंबडी अथवा डब्ब्यातील कोंबडी

Submitted by निरु on 12 November, 2018 - 12:46

खड्ड्यातील चिकन
खड्ड्यातील कोंबडी अथवा डब्ब्यातील कोंबडी

Dabba Chicken..

(पाककृती)

साहित्य: (५ कोंबड्यांसाठी)

दालचिनी पावडर : ६ चमचे
वेलची पावडर : १० ते १२ वेलच्यांची
खसखस : २ चमचे
कोथींबीर : ८ ते १० काड्या
आले -एक इंची : अदमासे १० नग
काळीमिरी पावडर : १ चमचा
लसूण : ४ ते ५ आख्खे कळे

वरील सर्व साहित्याचे वाटण करून घ्यावे

तापास प्रयत्न (Spanish Tapas Style Dishes)

Submitted by अमेय२८०८०७ on 26 October, 2018 - 09:26

स्पेनमध्ये जाऊन सग्रादा फॅमिलिया, बुलफाईट्स, पायेया किंवा सांग्रीया इतकेच 'तपस'चा अनुभव घेणे बंधनकारक आहे.संध्याकाळी तपस खिलवणाऱ्या जागी जाऊन उत्तमोत्तम वाईन किंवा अगदी बियरसोबत या वैविध्यपूर्ण पण थोड्याथोड्या डिशेस येत राहतात आणि गप्पा सरता संपत नाहीत. तपस कसे करायचे याचे काही कडक नियम नाहीत. तळून, भाजून, उकडून, कच्चे कशाही प्रकारे वेगवेगळ्या भाज्या आणि मांसाहारी, समुद्री पदार्थ वापरून पेश करायचे. आकर्षण वैविध्याचे आणि चवीसोबत दृश्यसुखाचेही. तपसच्या पारंपरिक सर्व्हिंग डिशेसही सुंदर असतात. टेराकोटाच्या या लाल गोल बाऊलना Cazuela म्हणतात.

विषय: 

रंगीबेरंगी पौष्टिक सॅलड -टोमॅटो कॅनपीज - मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 23 September, 2018 - 17:59

घटक 1. धान्य : मका
घटक 2. पालेभाजी : कोथिंबीर
घटक 3. कंदभाजी आणि फळभाजी : गाजर, आणि काकडी टोमॅटो, फुगी मिरची.
घटक 4. फळ : बदाम कापून ( जाडसर काप करावेत)

मीठ, मिरपूड, चवीसाठी.

टोमॅटो ला v कट देऊन त्याच्या कॅनपीज करून घ्याव्यात. आतील बिया काढून टोमॅटो आतून पोकळ करून घ्यावेत. टोमॅटो ला आतून थोडं मीठ मिरपूड चोळावी. काकडी, गाजर, फुगी मिरची ह्यांचे बारीक तुकडे करून घ्यावेत. त्यात बदामाचे तुकडे, मक्याचे दाणे, घालावेत. चवीसाठी मीठ, मिरपूड घालावी आणि ते मिश्रण टोमॅटो कॅनपीज मध्ये भरावे. वरून कोथिंबीर घालावी.

हा फोटो

विषय: 
शब्दखुणा: 

एकादशी दुप्पट खाशी - राजगिऱ्याच्या पाल्याचे सूप - मनस्विता

Submitted by मनस्विता on 23 September, 2018 - 12:03

मायबोलीवरच्या ह्या पाककृती स्पर्धेबाबत कळले आणि माझ्या मावशीला साकडे घातले. उपवासाचेच पदार्थ करून बघायचे असे माझे आधीच ठरले असल्याने मावशीला त्या पदार्थांची यादी पाठवून दिली. मग काय तिने सगळी यादी एका कागदावर उतरवून काढली आणि मला फोन केला. खरं तर तेव्हा मी पण ती यादी व्यवस्थित पहिली नव्हती. पण तिने काय जिन्नस चालणार आणि काय नाही हे व्यवस्थित बघून मला पदार्थ सुचवले. अश्या वेळेस आपण किती नशीबवान असे वाटून गेले. एक मेसेज फक्त व्हॉटसअँप वर पाठवला आणि तिने इतके कष्ट घेऊन एकापेक्षा जास्त पदार्थ सुचवले. पण माझ्याकडेच असलेला अपुरा वेळ ह्यामुळे मी त्यातला फक्त एकच करून पाहू शकले.

विषय: 

रंगीबेरंगी पौष्टिक सलाड - पनीर टिक्का -झटका सलाड - स्वप्नाली

Submitted by स्वप्नाली on 22 September, 2018 - 23:55

खर तर ही रेसेपी हळू-हळू निर्माण होत गेली आज. औफीसात काल सायेबाने काल त्यांच्या बागेतल्या वेग वेगळ्या टाईपच्या मिरच्या आणून दिल्या. बाहेर मस्त रिमझीम चालू पाहून मिरची-भजी करायचा विचार होता खरेतर पण आमचे धनी सध्या डाएट आहे. त्यामूळे ह्या रेसेपीचा जम्न झाला आज. असो:

विषय: 

रंगीबेरंगी पौष्टिक सलाड - (नियमानुसार) निर्मळ सॅलड - हह

Submitted by हह on 22 September, 2018 - 15:50

(नियमानुसार) निर्मळ सॅलड - (Clean Salad)

IMG_20180202_230032_804.jpg

घटक 1. धान्य : मका
घटक 2. पालेभाजी : पालक
घटक 3. कंदभाजी आणि फळभाजी : गाजर, मुळा आणि काकडी टोमॅटो
घटक 4. फळ : डाळिंब, ऑलिव्ह्ज

विषय: 

रंगीबेरंगी पौष्टिक सलाड - क्रंची प्राईड सलाड- सिम्बा

Submitted by सिम्बा on 22 September, 2018 - 08:26

गणेशोत्सावाच्या अवघ्या ७ दिवस आधी सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या ३७७ कलमामध्ये दुरुस्ती केली. न्यायालयाचा हा पुरोगामी निर्णय सगळी माध्यमे चढाओढीने साजरा करू लागली. जवळपास सगळ्या ब्रांडसनी आपआपले लोगो प्राईड flag च्या रंगात रंगवून या निर्णयाला आपला पाठींबा दर्शवला. यात अगदी आरोग्य, फूड इंडस्ट्री, गृहकर्ज, वाहतूक, विमान, टायर अशा सगळ्या क्षेत्रातल्या कम्पन्या होत्या हे विशेष.
त्यातलीच काही उदाहरणे पुढे देत आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

रंगीबेरंगी पौष्टिक सलाड - नटी-मिंटी घरगुती सॅलड! - मॅगी

Submitted by मॅगी on 19 September, 2018 - 13:54

डोक्यात भरपूर सॅलड रेसीपीजचे कडबोळे करून शेवटी शेतातून ताज्या आलेल्या शेंगा दिसल्यावर त्याच उचलल्या. स्पर्धेसाठी फारच लिंबूटिंबू (नाही नाही 'त्यांची' नाही, माझीच!) एन्ट्री आहे. तरी म्हटलं आपल्या देशी, घरगुती वस्तू वापरून काय तयार होतं पाहू. (तसेही सध्या स्वदेशी बाबा 'इन थिंग' आहेत!) नावात जरा घरगुती वगैरे शब्द टाकले की जरा दवणीय कामपण साधून जातं Proud

"एकादशी दुप्पट खाशी " - उपवासाची चंपाकली

Submitted by मनस्विता on 19 September, 2018 - 01:27

"एकादशी दुप्पट खाशी " - उपवासाची चंपाकली

मायबोलीवर पाककृती स्पर्धेची घोषणा झाली आणि त्यात भाग घेण्यासाठी डोक्यात विचारचक्र सुरु झाले. सर्वात आधी विचार आला की माझ्या मावशीला विचारावे. माझी मावशी अत्यंत प्रयोगशील त्यामुळे दिलेले जिन्नस वापरून ती नक्कीच नवीन काहीतरी पदार्थ सुचवेल ह्याची खात्री होती. पण पुन्हा मनात स्वतःचं असं स्वतंत्र विचारचक्र सुरु झालं.

विषय: 

रंगीबेरंगी पौष्टिक सलाड - चटपटीत साउथवेस्टर्न सॅलड - मैत्रेयी

Submitted by maitreyee on 18 September, 2018 - 22:46

चटपटीत साउथवेस्टर्न सॅलड

आमच्याकडे सॅलड खायची फ्याशन अज्जिबात नव्हती खरं तर. सॅलड म्हणजे काहीतरी बेचव, गारढोण प्रकार औषध घेतल्यासारखा खाणे ही अ‍ॅटिट्यूड! पण माझ्या आता टीनेजर असलेल्या लेकीने काही वर्षांपासून सॅलड्स आवडीने खायला सुरुवात केल्यावर मी रेसिप्या शोधून प्रयोग करायला सुरुवात केली. मग कुठे लक्षात आले की सॅलड्स पण मस्त चविष्ट करता येतात की! आता जो प्रकार लिहितेय तो मुलीच्या खास आवडीचा. एरवी सॅलडची रेसिपी वगैरे काय लिहायचीय असे वाटले असते पण गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुद्दाम फोटो काढून लिहिली गेली.
या सॅलडला लागणारे ड्रेसिंग पण मी घरीच बनवते.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - पाककला