पाककृती स्पर्धा २: मधाळ बोल - mrsbarve
Submitted by mrsbarve on 1 September, 2025 - 15:27
साहित्य :
एक सफरचंद छोटे चौकोनी तुकडे करून , एक मोठे पीच चिरून तुकडे करून, एक माध्यम आकाराचे पेअर तुकडे करून, बदामाचे काप ,दोन चमचे मध, फेटा चीझ १ चमचा, मीठ, चिरलेला पुदिना दोन चमचे, काली मिरी पूड, अर्धा लिंबू, द्राक्षे
कृती :
मधाळ बोल बनवताना वरील साहित्यातील फळे चिरून एका बोल मध्ये घ्यावीत , त्यावर मीठ मीर पूड स्प्रिंकल करावे . त्यावर दोन चमचे मध पसरून त्यावर बदामाचे काप घालावे , चिरलेला पुदिना घालावा , लिंबू पिळून सगळे मिक्स करून घ्यावे. वरून फेटा चीझ पसरावे. मधाळ बोल तयार!
विषय:
शब्दखुणा: