पाककृती स्पर्धा १ - शिरा- निल्स_23

Submitted by निल्स_23 on 29 August, 2025 - 13:50

तर.......वरणभाताला फारच ग्लॅमर प्राप्त झाले आहे . Lol Lol Lol Lol
आणी शिरा बिचारा उपेक्षित राहिला. इतका की अगदी मीम्स मटेरियल झाला. कुठे विचारताय...
इथे बघा.
https://www.maayboli.com/node/87033?page=9#new

तर.....अजून फार मीम्स येण्याच्या आत, झटपट शिर्याची
सजावट बघा आणी सांगा कशी झाली आहे. हा रव्याचाच पण वेगळ्या पद्धतीने बनवलेला माखंडी शिरा आहे.

रेसिपी:
साहित्य
१ वाटी रवा
२ वाटी दूध
१ वाटी साखर
१ वाटी साजूक तूप
वेलची पूड
हवा तेवढा सुका मेवा

रवा दुधात भिजत घातला. साधारण तासभर. आवडत असेल तर कढईत तूप गरम करून त्यात सुकामेवा तळून घ्यावा . तो काढून बाजूला ठेवावा . आता महत्त्वाची स्टेप.
गरम तूपात साखर घालावी कॅरॅमलाईज करून घ्यावी. जास्त केल्यास कडू होईल . त्यात भिजवलेला रवा घातला. छान मिक्स करून घ्यावा . छान वाफ द्यावी . नंतर त्यात सुकामेवा व वेलची पूड घालावी . शिरा तयार आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बेस्ट सादरीकरण

वरणभाताला फारच ग्लॅमर प्राप्त झाले आहे >>> हा शिरा पण त्याच तोडीचा आहे.

भारी सजावट.
शिऱ्याला ग्लॅमर प्राप्त करून दिले.
ही सजावट पण मिशेलिन स्टार रेस्टॉरंट मध्ये वाढता येईल अशी झाली आहे.

बेस्ट शिरा!
शिरा कधीही खात नाही मी..पण हा फारच आकर्षक आहे!
त्या काड्या पण एडिबल आहेत का?

सुंदर दिसतोय. त्या पांढर्या पाकळ्या कसल्या लावल्या आहेत?

शिऱ्याच्या मिम्सना वेळीच आळा घालणाऱ्या आणि वरण भाताला टक्कर देऊन इकडे पारडे जड़ करणाऱ्या नितांत सुंदर मांडणीचे कौतुक.

छान.कल्पक.
रंगावरून कणकेचा शिरा वाटला होता.मग कृती वाचल्यावर कळले की हा माखंडी शिरा.

Pages