पाककला

आंबट चुका चटणी

Submitted by Rupali Akole on 11 June, 2017 - 08:46

*आंबट चुका* चटणी
आंबट चुका (पालेभाजी) एक वाटी
पाव वाटी शेंगदाणे
2/3 हिरवी मिरच्या
जीरे अर्धा चमचा
चवीसाठी मीठ व गुळ
हे सर्व खलबत्यात कुटावे.
सरबरीत चटणी असावी, जीरे मोहरीचा तडका ध्यावा. भाकरी बरोबर मस्तच लागते.

माहिती स्तोत्र :
shilpa kulkarni

विषय: 

हळदी चे पान

Submitted by Rupali Akole on 7 June, 2017 - 08:37

हळदी ची कुंडीत लागवड,त्याच्या पानांन ची पाककृती,आयुर्वेदिक महत्व इत्यादि ची माहिती हवी आहे.

दिनेशदांच्या पाककृती कुठे गेल्या ?

Submitted by धनि on 8 May, 2017 - 19:29

आजच चटनी वाले आलू करण्याकरता पाककृती शोधत होतो. दिनेशदांची एक आहे हे आठवले त्यामुळे शोधले तर पाककृती आली पण आतमध्ये नुसते क्ष क्ष क्ष दिसत होते. त्यामुळे मी त्यांच्या इतरही पाककृती पाहिल्या तर सगळीकडे क्ष क्ष क्ष दिसत आहे. त्या पाककृती कुठे गेल्या?

विषय: 

माझा मराठी बाण (बाणा)

Submitted by विद्या भुतकर on 27 April, 2017 - 18:30

डिस्क्लेमर:
या पोस्टमधील सर्वच पात्रे काल्पनिक नसली तरी प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत आणि जे काही साधर्म्य तुम्हाला वाटत असेल ते केवळ योगायोग समजावे.
(हे असले फुसके डिस्क्लेमर देऊनच मराठी बाण्याचे आपण बारा वाजवत आहोत असे वाटते. मराठी माणसाने कसं ताठ मानेनं लिहावं. एखादा नवीन डिस्क्लेमर शोधला पाहिजे खास मराठी माणसासाठी. असो..त्यावर पुन्हा कधीतरी. )

बाकी विनोदी पोस्ट बद्दलचे डिस्क्लेमर आहेतच. आपापल्या विनोदबुद्धी नुसार ही पोस्ट समजून घ्यावी.
-------------------------------------------------------------------------------------------

कथा - व्यथा कढीपत्त्याची

Submitted by विद्या भुतकर on 24 April, 2017 - 20:59

मला आमच्या जवळच्या इंडियन स्टोअर मध्ये मिळणारी एका ठराविक ब्रँडची (डाएट) भेळ मिक्स आवडते. डाएट हे फक्त नावाला लिहिलेलं असावं कारण शेव वगैरे भरपूर असते. पण नेहमीच्या चिरमुऱ्यांपेक्षा ते जास्त कुरकुरीत लागतात त्यामुळे मी तेच पाकीट हट्टाने आणते. ते खरेतर फक्त फोडणी टाकलेले चिरमुरे, शेव आणि फरसाणअसतात. घरी आणून त्यात मग कांदा, टोमॅटो, कैरी, गोड चिंचेची चटणी मिक्स करून मस्त भेळ बनते. आठवड्यातून २-३ वेळा तरी एक वाटीभर खाल्ले जाते. परवा असाच खाऊन झाले आणि थोड्या वेळाने बहुदा ओठांवर त्यातला एक कढीपत्त्याच्या कण तसाच राहिला असावा, तो तोंडात आला आणि बराच वेळ कढीपत्त्याची चव रेंगाळत राहिली.

विषय: 

उन्हाळा स्पेशल प्रयोग आंबा लस्सी विथ व्हॅनिला आईसक्रीम!

Submitted by कृष्णा on 20 April, 2017 - 05:06

काल उन्हाळा स्पेशल प्रयोगात हा एक सफल प्रयोग झाला म्हणून सर्वांसाठी देतोय!

आंबा लस्सी विथ व्हॅनिला आईस्क्रीम!

लहाणपणी नगरला असताना आईस्क्रीम लस्सी बर्‍याचदा प्यायलेली ती आठवली मग ह्यातुन हा माझा प्रयोग!

साहित्य :

१. ताजे दही १ लिटर
२. एक मध्यम हापूस आंबा
३. व्हनिला आईस्क्रीम
४ साखर.

कृती :

विषय: 

खास तळपत्या उन्हाळ्यात! काला खट्टा सरबत!

Submitted by कृष्णा on 10 April, 2017 - 03:49

काला खट्टा सरबत.

उन्हाच्या झळाळत्या झळ्यात थंडगार सरबत घश्यालाच पोटालाच नाही तर मनालाही गारवा आणते....
बर्फगोळा खाण्याची आवड असणार्‍यांना तर कालाखट्टा चा बर्फ गोळा मिटक्या मारत खाण्यातील गोडी सांगायलाच नको.. त्या गोळ्याची आंबट गोड घरच्या घरी अनुभवण्यासाठी बर्फ नाही पण सरबताचा हा खटाटोप काल केला आणि यशस्वी देखिल झाला मग सर्वांसोबत तो का न शेअर करावा म्हणून हा अजून एक खटाटोप... गोड... आंबटगोड... चिभेला मिटक्या मारायला लावणारा काळ्या लवणाचा खरटपणा!

साहित्य ३ ग्लास सरबतासाठी मी जे वापरले ते!

विषय: 

उन्हाळ्यात खाता येतील अश्या पदार्थांच्या पाककृती मिळतील का?

Submitted by स्वप्ना_राज on 7 April, 2017 - 03:53

दरवर्षीप्रमाणे 'ह्या वर्षी उन्हाळा फार कडक आहे' असं सगळे म्हणायला लागलेत. मसाल्याच्या भाज्या किंवा आमट्या घशाखाली उतरेनाश्या झाल्या आहेत. 'तेच तेच आणि तेच' खाऊन कंटाळा आलाय. पण नुसतं सॅलड/सूप्स/फळं खाऊन अख्खा दिवस निभावणार नाही हेही ठाऊक आहे.

तुमच्यापैकी कोणाकडे खास उन्हाळ्यात लंच/डिनरला खाता येतील अश्या काही पदार्थांच्या - मग ते महाराष्ट्रीयन, बंगाली, पंजाबी, दाक्षिणात्य, गुजराती, परदेशी काहीही असोत - पाककृती आहेत का? असल्यास प्लीज प्लीज इथे पोस्ट करा. हा माझा SOS आहे Sad

विषय: 

Pages

Subscribe to RSS - पाककला