काहीतरी आणि गझल २

Submitted by अजिंक्यराव पाटील on 7 January, 2020 - 12:52

काहीतरी आणि गझल -२

कोणत्यातरी इंग्रजी गाण्यावर त्या डान्स फ्लोअरने ठेका धरलेला. बँगलोरमधल्या आयटी क्रावूडच्या आवडत्या अड्डयांपैकी हा एक पब. त्यात बेधुंद नाचणारी ही कमावती तरुणाई. नाचता नाचता अविनाश बार काउंटर कडे गेला. बारटेंडर त्याचं ड्रिंक बनवत असताना अविनाशने फ्लोअर वर नजर फिरवली. त्याला दिसली ती त्याच्यासारखीच उदास, मेलेली नजर असलेली पोरं पोरी. च्यायला, या जगात सुखी नाहीच का कुणी? इथं तरी का येतात हे लोक, कारण त्यांना सुटका हवी असते, रोजच्या धबडग्यातुन, मुर्दाड आयुष्यातून.. असं वाटतं की ही दारू, नशा सोडवेल, पण त्याचा परिणाम उलटाच. विचार कमी होण्याऐवजी loop मध्ये अडकल्यासारखे तेच विचार पुन्हा येत राहतात.
एव्हाना रंग गडद व्हायला लागले होते. गर्दीतली एक नजर अविच्या नजरेत गुंफली होती. ग्लास उंचावून इशारा झाला आणि दोघे सोबत नाचायला देखील लागले. गर्दीत नाचताना एकमेकांच्या शरीरावरुन फिरणारे हात, वाढणारे श्वास, आणि नजरेतली आव्हाने..
तिने त्याचा हात धरून एक कोपरा जवळ केला, पण हळू हळू त्याचा हात सैल पडत होता. त्याच्या नजरेतून ती मुलगी केव्हाच हरवली होती आणि एक पाश्चात्तापाची रेष उमटायला लागलेली. तिचा हात सोडत अवि त्या मुलीला सॉरी म्हणत तिथून निघाला.
रूमवर पोचताच त्याने आपली डायरी जवळ केली, आणि त्याच्याही नकळत गझल चितारत गेली..

रंग
अबतक चौखट से तेरा, सवाल नहीं जा रहा,
देख ना मेरे मन से तेरा, गुलाल नहीं जा रहा

शायद इस बला को भी है इंतजार बस तेरा,
सालो से ये निशान ए विसाल नहीं जा रहा..

क्या हुआ?, क्यू हुआ? पुछते रहते है खुदसे
जवाब लाखो मिले मगर बवाल नहीं जा रहा..

अबतक नजरो में कैद है वो, हसीन अनछुए पल,
कैसे जादुगर थे तुम के ये कमाल नहीं जा रहा..

कोशिशे लाख की प्यार जतानेवालो ने कई बार,
जो तुमने रखा था कभी, वो मिसाल नहीं जा रहा..

सुना सुना सा है तुमबिन, अनलिखा एक खत
आ जाओ के ये दिल का बुरा हाल नहीं जा रहा...

अजिंक्य"राव पाटील"
3 मार्च 2018

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

त्यात काय एवढं विशेष.. मला पण गालिबच्या पुढच्या शेर मधून हा शब्द समजला होता, आणि काही ठिकाणी विसालचा अर्थ दर्शन असाही येऊ शकतो.

ये ना थी हमारी किस्मत के विसाल ए यार होता,
अगर और जिते रहते यही इंतजार होता..

तर ते असो, माझी गझल आणि लिखाण कसं वाटलं ते जरूर कळवा..

_/\_

खरं तर कथा लिहिली ती गझल साठी. पहिल्या काहीतरी आणि गझल (https://www.maayboli.com/node/71956) सारखंच. पण पहिल्या भागाइतकी फुलली नाही हि कथा. बघू, जमली तर वाढवू.