लेखन

एक कधीही न झालेली चॅनलीय चर्चा

Submitted by वाट्टेल ते on 1 April, 2016 - 15:49

टायमध्ये गळा आणि pant मध्ये आवळलेले पोट टेबलाच्या आड दडवलेला, एक भक्कम आवाजाची देणगी लाभलेला चर्चेचा सूत्रधार सुरुवातीला एकटा दिसत आहे. काही वेळाने अजून काही लोक दिसतील आणि शेवट होईपर्यंत अख्ख्या चर्चेत फक्त तोच एकटा “बस मै ही मै हू “ म्हणणाऱ्या, महाभारतात रणांगणावर अर्जुनाला गीता सांगणाऱ्या कृष्णासारखा भासेल. असो तर ९ च्या ठोक्याला एक वादळी music वाजते, रणशिंग फुंकले जाते. camera ३६० अंशांचा कोन करून येतो व एका मोठ्या प्रश्नचिन्हावर स्थिरावतो.

मोत्या शीक रे.....

Submitted by परदेसाई on 30 March, 2016 - 08:51

"मोत्या शीक रे अ आ ई..., आमच्या लहानपणी कुत्र्याला शिकवायचे हे एकच गाणं होतं," आज्जीच्या या सूचनेवर तिच्या नातीने म्हणजे माझ्या मुलीने,
"शी आज्जी.. अ आ ई काय? आता कुणी कुत्र्याला अ आ ई शिकवतं का?" लगेच शंका काढली. इकडची कुत्री इंग्रजीत भुंकतात हे तिला माहीत होतं.
"आणि मोत्या म्हणजे?"
"अगं मोत्या हे कुत्र्याचे नांव." क्षणात मुलांनी कुत्र्याचे नांव आणि जुन्या पध्दतीचे शिक्षण दोन्ही निकालात काढून आपल्या आजीला फारसं काही कळत नाही असं स्वतः ठरवून टाकलं, आणि आज्जीच्या सगळ्या सूचनांना स्पर्धेतून बाद करून टाकलं.

उठती है हर निगाह खरीदार की तरहा.....!

Submitted by सुप्रिया जाधव. on 28 March, 2016 - 03:29

झोपायला रात्रीचे बारा वाजणे हे रोजचेच....त्यामुळे तसे अंगवळणी पडलेले मात्र एखाददिवशी झोपेचे बारा वाजले की तिची खरी किंमत कळते....नाही का ?....तर झाले असे की 4 दिवसांची सुट्टी आल्याने आधीच सगळ वेळापत्रक बदललेल ...दुपारी दोन एक तास मस्त झोप काढून संध्याकाळी फिरायला जायचे हा पायन्डा पडला गेला होता...कोहलीने खिशात घातलेली मॅच व कांगांरूंची पूर्वापार चालत आलेली दहशत त्यावर चर्चा करत करत काल रात्री उशिरानेच झोपी गेलो ...मात्र साधारण 2-2.30 ला भयंकर उकाड्याने जाग आली...पहातो तर सिंगलफेजिंगमुळे ए सी ने मान टाकलेली... गोव्याचा सगळा दमटपणा घरातच घुसला होता जणू ! नुसती चिकचिक आणि वैताग !!

विषय: 

'कोयने'ची स्वारी

Submitted by पराग१२२६३ on 26 March, 2016 - 07:10

सकाळी जरा लवकरच कोल्हापूरच्या स्टेशनवर पोहचलो होतो. रेल्वे फाटकाच्या बाजूने मुद्दामच स्थानकावर गेलो, म्हणजे कोयनेचा कार्य अश्व (इंजिन/लोको) दिसेल, असा विचार केला होता. मी पोहचायच्या दोन मिनिट आधी १७४११ महालक्ष्मी दोन नंबरवर आली होती. या गाडीने रेल्वेचा बडा अधिकारी कोल्हापुरात आला होता. त्यामुळे त्याच्यासाठीचा खास डबा महालक्ष्मीला सगळ्यात मागे जोडलेला होता. अधिकारी अजून डब्यातून उतरला नसला असावा. कारण त्या डब्याच्या दरवाज्याच्या आजूबाजूला अन्य अधिकारी आणि रेल्वे पोलिसांचा गोतावळा होता.

अशीच रात्र राहूदे...

Submitted by मुग्धमानसी on 25 March, 2016 - 08:13

अशीच रात्र राहूदे, तुझ्यात खोल वाहूदे
तुझ्या लिपीत बोलूदे, तुझ्या सुरांत गाऊदे..

जरा सकाळ होऊदे नी उतरू दे जरा धुके
तोवरी मला तुझ्या मिठीत चिंब नाहूदे...

कशामुळे सख्या असा उगाच सैरभैर तू
उषा अजून कोवळी... तिला वयात येऊदे!

कुणी न आज यायचे इथे अश्या खुळ्या क्षणी
तु टाक सर्व वंचना, मला तुला सुखावू दे...

ही रात्र संपता सख्या उरेल काय ते पहा
नकोस वेळ घालवू, जे जायचे ते जाऊदे...

पुन्हा मिळायची कधी, ही स्वस्थता नी रात्र ही...
तुझ्या मिठीत ही अशीच कैद रात्र राहूदे!

शब्दखुणा: 

बोट - अग्निशमन

Submitted by स्वीट टॉकर on 24 March, 2016 - 01:18

असं समजूया की नगरपालिकेचा पाणी पुरवठा विभागाचा एक कर्मचारी तुमच्या भागातलं पाणी सकाळी नऊ वाजता उघडतो आणि दुपारी दोन वाजता बंद करतो. असं समजा की त्याच्या साहेबानी त्याला सांगितलं की “आज नऊ वाजता पाणी उघडल्यावर त्याच्या जवळंच आखणी करून ठेवली आहे तिथे झाडं लावण्यासाठी एक तीन बाय तीन बाय तीन फुटांचा खड्डा कर आणि त्या रस्त्यावरचा सहावा दिवा चालत नाहिये तो बदल! तोपर्यंत दोन वाजतील. मग पाणी बंद कर आणि मगच ऑफिसला परत ये!” तर कसला स्फोट होईल!! जाऊ दे! कल्पना करण्यातंच पॉइंट नाही.

शब्दखुणा: 

दुभतं

Submitted by मनीमोहोर on 23 March, 2016 - 13:36

कोकणात आमच्याकडे दुध-दुभतं असं न म्हणता फक्त दुभतचं असं म्हणतात. दुभतं हा आमच्या सगळ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. गावाला फोन केला की विचारलच जातं " सध्या दुभतं कितपत ? " असं आणि तिकडुन " आहे भरपूर " असं उत्तर आलं की वारणा/गोकुळ वापरणारी मी इथे विनाकरण खुश होते आणि बेताचं आहे असं कळल की उगाचच हिरमुसते ही .

गावाला गुरं पाळायची ती बैलांच्या पैदाशीसाठी, दुधासाठी आणि गोबर गॅससाठी. आमचा गुरांचा गोठा आहे
घराजवळच . पक्क बांधकाम आणि लाईट, पाण्याची सोय असलेला. यामुळे गोठ्याची स्वच्छता राखणं ही सोप
होत.

विषय: 

खादाड बडबडगीते

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

१.
पापडी चुरमुरे कुरकुरीत लागले
मिरची अन कांदा चरचरित लागले
चिंचेची चटणी आंबट गोड
शेव फरसाण कैरीची फोड
सगळ्याची मिळून केली भेळ
असा आमचा भातुकलीचा खेळ

-----

२.
पुरी फुगली टमाटम
छोल्यांचा वास घमाघम
श्रीखंड खाऊ गप गप
ढेकर देऊ अsब अssब

प्रकार: 

आजची मराठी पत्रकारिता

Submitted by पराग१२२६३ on 21 March, 2016 - 23:22

ओबामा काय म्हणतायत, त्यांनी किती वर्षांच्या आजींची भेट घेतली किंवा कसा
डान्स केला, अमेरिकेत काय चालू आहे, कोणता नवा हँडसेट तिकडे बाजारात
आलेला आहे, चीन भारताला घेरतोय आणि कोणत्या तरी क्षुल्लक संशोधनातून
लक्षात आले आहे की पुरुष महिलांपेक्षा जास्त फळं खातात इ. अशाच
बातम्यांमध्ये रमून स्वतःतील दृष्टीदोष आणि अक्षमता लपविण्याची सवय मराठी
पत्रकारितेत काही वर्षांपासून भिनलेली आहे. त्यामुळे वाचकांपेक्षा
त्यांचे विश्व अतिशय संकुचित आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध करणारा आणखी एक
पुरावा म्हणजे पुढील बातमी. भारतीय नौदलाच्या क्षमतेची दखल साऱ्या जगात

Pages

Subscribe to RSS - लेखन