आशा

आशा

Submitted by Asu on 31 March, 2020 - 03:08

सध्याच्या करोनाच्या निराशाजनक वातावरणात आशेचा किरण दाखवणारी कविता-
आशा

अंधार आजचा सरेल
उद्या नक्की उजाडेल
सुख काय म्हणतात ते
कधीतरी आम्हां दिसेल
अंधाराची सरेल निशा
एवढीच फक्त आशा

आशा निराशेचा मेळ
ऊन पावसाचा खेळ
कधी कडक उन्हाळा
कधी घन निळा सावळा
गर्जू दे दाही दिशा
एवढीच फक्त आशा

आशेवर माणूस जगतो
निराशेने माणूस मरतो
जगण्याची जरी दुर्दशा
भरकटल्या भवसागरी
आयुष्या मिळो दिशा
एवढीच फक्त आशा

शब्दखुणा: 

आशा

Submitted by राजेंद्र देवी on 29 November, 2019 - 10:43

आशा

जीव कासावीस होतो
रात्र दिवस होतो
तुझ्या आठवणीत
जीव वेडापिसा होतो

चांदण्या धूसर होतात
चंद्र फिका होतो
तुझ्या आठवणीत
जगण्याचा विसर होतो

नाही येणार तू आता
याचा विसर होतो
खोट्या आशेवर
दिवस पसार होतो

राजेंद्र देवी.

शब्दखुणा: 

सुख-दुःख

Submitted by मन्या ऽ on 23 August, 2019 - 05:38

सुख-दुःख

आज आनंदीआनंद
झाला,दुःखामागे
सुख धावते; हा
विश्वास ठाम झाला

दुःख असतेच मुळी
पारिजातकाप्रमाणे
मन हळवे करुन जाते
जाता जाता
आयुष्याला आठवांचा
दरवळ देऊन जाते

सुखापेक्षा करावी
दुःखाची आराधना
दुःखाचाच सोबती असे
सुखाचा अनमोल ठेवा

दुःख आहे ते
आभाळ; पण
सुखाच्या
नक्षत्रांनी सजलेले
अन् सुर्याच्या
तेजाने व्यापलेले

(Dipti Bhagat)

विरह..

Submitted by मन्या ऽ on 1 August, 2019 - 03:18

विरह..

चंद्र-तारकांनी भरलेले आभाळ हे आज
रिते आहे
मनातल्या विचारांचे
मळभ हे आज
आभाळातही दाटले आहे

तुझ्यासवे जगायचे होते
आयुष्य हे सारे
आणाभाका- वचनंही
दिलेली एकमेकांस
ते सारे धुक्यात
आज विरले आहे

आषाढघन होऊन
तु बरसुन गेलास
मनात नव्या जाणिवा
पेरुन गेलास
त्याच जाणिवांआधारे
जगते आहे
पण आता मी एकटी
कमी पडते आहे
दिले वचन मोडते आहे

शब्दखुणा: 

आशा !!!

Submitted by मण - मानसी on 22 April, 2019 - 07:59

श्वासा गानिक साद तुला जाते,
मग कोऱ्या कागदाची ही कविता होते,
आपले स्वप्न , कविता यातच मी गुंतते,
एका जन्माची ही सोबत न केलेली सात जन्माची आशा मी धरते....

@ किर्ती कुलकर्णी

शब्दखुणा: 

साद

Submitted by मी कल्याणी on 31 March, 2013 - 22:15

पापणीतल्या स्वप्नांना
आशेची साथ दे..
अंतरीच्या भावनांना
सप्तसुरांचा नाद दे..

आकाशातल्या चांदण्यांना
सुगंधी श्वास दे..
ओंजळीतल्या पाखरांना
भरारीचा ध्यास दे...

इंद्रधनुच्या सतरंगांना
आनंदाची साथ दे..
नादमयी सप्तस्वरांना
मोहक हास्याने दाद दे..

सप्तर्षीच्या त्या तेजाला
निरांजनाची वात दे..
सत्यस्रुष्टीतील स्वप्नांना
मनापासून साद दे.....

शब्दखुणा: 

तिच्या आठवणी

Submitted by आमोल पाटिल on 29 April, 2011 - 08:31

एकदा तिने मला माझ्या कवीता वाचावयास मागीतल्या,
मी तिला म्हणालो,
"एका कागदच्या तुकड्यात रुप पहाण्या पेक्षा,
एकदाच आरशात पहाण सोप नाही का?" !!!

तर ती म्हणाली,
"आरशा मध्ये दिसेल ही रुप कदाचीत,
पण ते पहयला तुझे डोळे कोठुन आनु"........

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सांगेन मी

Submitted by तुषार जोशी on 25 January, 2011 - 21:39

आधी जरा साहेन मी
केव्हातरी सांगेन मी

अंधार जेथे एकटा
तेथे दिवा टांगेन मी

प्रीतीत बाजी हारलो
हारूनही जिंकेन मी

जादू तुझ्या डोळ्यातली
झाली नशा झिंगेन मी

राखेतुनी झालो उभा
आता कसा भंगेन मी

तुषार जोशी, नागपूर

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - आशा