लेखन

Men will always be men and women will always be women

Submitted by भागवत on 20 March, 2016 - 11:11

मी खुप वेळेस बालाजीला दर्शनासाठी गेलो आहे. त्या आठवणीतला एक किस्सा येथे देत आहे. एकदा मी बालाजीचे दर्शन घेऊन श्रीकालहस्तीला गेलो. तिथे मंदिरा बाहेर ओळीने बरीच दुकाने होती. मा‍झ्या पत्नीला भांड्याच्या दुकानात इडली पात्र दिसले. आम्ही किंमत विचारायला दुकानात गेलो. तिथे मला एक जाडजूड बाई ने तेलुगु मिश्रीत हिंदीत आवाज दिला "भैया आप कहा से आ रहे हो" मी तिला पुणे उत्तर दिल. ती नवऱ्याकडे बोट दाखवून समजावून सांगण्याच्या उद्देशाने म्हणाली. "इस आदमी को थोडा समझाओ लोग यहासे शॉपिंग करके सामान पुणे लेके जा रहे है और इसको हैदराबाद इतना नजदीक है फिरभी शॉपिंग को ना बोलता है"

धूळ

Submitted by जव्हेरगंज on 17 March, 2016 - 11:04

गाव तसं बरं वाटलं. हायवेलाच लागून होतं. गाव कसलं चार घरांची वस्तीच ती. डांबरीवरुन आत गेल्याशिवाय दिसली पण नसती. आडवळणाला एक देऊळपण होतं. तिथं चिटपाखरुपण नव्हतं. गावातल्या घराघरांत मिनमिनतं दिवं तेवढं दिसलं. बाकी सगळा अंधार.

वेळ संध्याकाळची. सुर्य बुडून गेलेला. कानोसा घेत घेत देवळाकडं गेलो. देऊळ दगडी होतं. भरभक्कम. काळा पाषाण. अंधारात न्हाय म्हणलं तरी ते भेसूरच दिसत होतं. बाजूनं मोकळं मैदान आणि त्यापलिकडं घनदाट झाडी. बाकी वाऱ्यानं उडवलेली नुसती धूळ.

गाभाऱ्यात एक पणती जळत होती. देव काय ओळखीचा नव्हता. हात जोडायची इच्छा कधीच मरुन गेलेली. आतल्या अज्ञात गुहेत जायचं काही धाडस झालं नाही.

विषय: 
शब्दखुणा: 

राजाराम सीताराम...........सूट्टीसाठी आतूर

Submitted by रणजित चितळे on 17 March, 2016 - 09:25

ह्या आधीचे..........
राजाराम सीताराम एक राजाराम सीताराम दो।...... भाग १ प्रवेश.
राजाराम सीताराम....... भाग २... पुढचे चार दिवस.
राजाराम सीताराम....... भाग ३... सुरवातीचे दिवस – भाग १.
राजाराम सीताराम....... भाग ४... सुरवातीचे दिवस – भाग २.
राजाराम सीताराम....... भाग ५... आयएमएतले दिवस.
राजाराम सीताराम....... भाग ६... मसुरी नाइट.
राजाराम सीताराम....... भाग ७… ड्रिलस्क्वेअर.
राजाराम सीताराम....... भाग ८....शिक्षा.
राजाराम सीताराम....... भाग ९....एक गोली एक दुश्मन।.... भाग १.
राजाराम सीताराम....... भाग १०. एक गोली एक दुश्मन।.... भाग २.
राजाराम सीताराम....... भाग ११. पिटी परेड.

शब्दखुणा: 

माझे २६ प्रपोज - भाग पहिला

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 March, 2016 - 17:14

क्या तुमने कभी किसी से प्यार किया है ....
क्या तुमने कभी किसी को दिल दिया है ..

विषय: 
शब्दखुणा: 

हरिप्रिया...

Submitted by पराग१२२६३ on 10 March, 2016 - 13:45

८ एप्रिल २००५. माझ्यासाठी एक एक्सायटींग दिवस होता. काही कामाच्या निमित्ताने चेन्नईला जायचे होते. मग मी आणि वडिलांनी कोल्हापूरहून रेणिगुंट्यापर्यंत ७३१६ हरिप्रिया एक्सप्रेसने आणि पुढे चेन्नईपर्यंत मिळेल त्या गाडीने जाण्याचा निर्णय घेतला. महिनाभर आधी आरक्षण केले आणि मिळालेही. त्यानंतर हा दिवस एक्सायटींग ठरण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे कोल्हापुरातून निघून वेगळ्याच दिशेने जाणाऱ्या गाडीने हा प्रवास होणार होता. त्यातच कोल्हापुरातून निघून थेट मिरजेतच थांबणाऱ्या गाडीचा आयुष्यातील तो पहिलाच प्रवास असणार होता. इतकेच नाही तर कोल्हापुरातून सुटणारी ती पहिलीच वेगवान गाडी होती.

मुबारक हो, उस्ताद ! - उस्ताद झाकीर हुसैन ह्यांचा ६५ वा वाढदिवस

Submitted by आशयगुणे on 8 March, 2016 - 14:02

थेट हृदयाचा ठोका होत मन तृप्त करणारा तबल्याचा ठेका आणि द्रुत लयीत जुगलबंदीचा शेवट करताना एका उन्मनी अवस्थेत मानेला वारंवार झटका दिल्याने लयीत डोलणारे डोईवरचे केस... तबलानवाज उस्ताद झाकीर हुसेन यांच्या रसिकजनांच्या मनांवर ठसलेल्या प्रतिमा...

आपली सात बलस्थाने .. महिलादिना निमित्त

Submitted by स्मिता द on 8 March, 2016 - 02:39

पृथा..

आज महिला दिन..:) समस्त महिलावर्गाला शुभेच्छा..

महिला शक्ती ..महिला सबलीकरण..महिला शोषण या बाबी भिन्न वाटतात ना ऐकायला. जर ती शक्ती आहे तर सबलीकरण का? अन मग शोषण का ?
पण एक स्त्री म्हणुन सांगते खूप सबल असतो आपण. मोठा उर्जा स्त्रोत आहे आपल्यात. फक्त काही कारणांनी त्यावर आलेला लेप मग तो अज्ञानाचा, काही असंवेदनशील मुजोरी, दांडगेपणाने आलेला असेल पण वेळ आली की महिला सर्व शक्तीनिशी नक्कीच उठते.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - लेखन