कला

ऑनलाईन गझल प्रोसेसर

Submitted by ब्रह्मांड आठवले on 20 June, 2014 - 01:01

ऑनलाईन गझलेचा प्रोसेसर उपलब्ध आहे. या यंत्रात वरून शब्द आणि इतर आवश्यक जिन्नसा घातल्या असता गझल तयार होते. वापरण्यास अत्यंत सोपा, युझर फ्रेण्डली अशा या प्रोसेसरच्या सहाय्याने आपल्या उत्पादनाचा वेग वाढवून बाजारात सर्वत्र आपल्या मालाचा बोलबाला करता येतो.

gajhal.jpg

शब्दखुणा: 

'तो' म्हणजे???????

Submitted by लाजो on 19 June, 2014 - 01:01

'तो' .....

'तो' म्हणजे... सळसळता उत्साह
'तो' म्हणजे... खळाळता प्रवाह

'तो' म्हणजे... गाण्यांचा पाऊस
'तो' म्हणजे... भिजण्याची हौस

'तो' म्हणजे... मस्तीचा झरा
'तो' म्हणजे... हास्याचा फवारा

'तो' म्हणजे... ढोलकीची थाप
'तो' म्हणजे... गटगंचा बाप

'तो' म्हणजे... मातीचा गंध
'तो' म्हणजे... नवे ऋणानुबंध

'तो' म्हणजे... वार्षिक पर्वणी
'तो' म्हणजे... सुखद आठवणी

'तो' परत येतोय...
सगळेच वाट बघतोय........ Happy

विषय: 
शब्दखुणा: 

अस्वस्थ

Submitted by चाऊ on 18 June, 2014 - 07:39

भय वाटते शांततेचे करा गोंगाट करा
ढोल ताशे नगारे टिव्ही रेडीओ सुरु करा

बुडून जाऊ या कल्लोळात भोवतालच्या
बघू दडपतो का आवाज आतल्या कल्लोळाचा

बधीर सारी गात्रे नको ऎकू काही खरे
नुसताच आवाज, नको कुठल्या अर्थाचे किनारे

भणंग भटकणे दिशाहीन, आज भावते
न मिळाली मंझील तर? जीवा धाकावते

कमवू उधळू जाळू स्वता:ला आणी जगाला
कशास हवे काही कारण आज जगायला

चित्र नको नुसतेच रंगाचे फराटे
गुंगवून टाकणारे मायाजाल उफराटे

अशांत मन, तन, जग सारे तेवढेच उरते
विध्वंसाची पहाट फक्त उजाडताना दिसते

शुभ्र...सुंदर ??

Submitted by pinkswan on 11 June, 2014 - 21:01

पुन्हा एकदा क्रोचेट ...
अवल च्या मार्गदर्शनानुसार हा स्कर्ट करायला घेताना मोठ्या उत्साहात घेतला...पण धागा निवडताना केवळ आवडला ...म्हणुन घेतला,इतक्या छोट्या धाग्याचा स्कर्ट पुर्ण व्हायला किती वेळ लागेल याचा विचारच केला नाही Lol . विणत असताना खुपदा पेशन्स संपल्यात जमा..पण अवल ने मधे मधे प्रोत्साहन सुरु ठेवले..आणि हुश्शः...झाला एकदाचा Happy
झाला म्हणजे ....बनत आलाय हे दिसल्यावर तो घालण्याच्या प्रबळ इच्छेमुळे त्याची ठरलेली डिझाइन न विणताच संपवला. आणि वाढ्दिवसाला 'माझी मलाच भेट' ...म्हणुन घालुन मिरवला Wink

विषय: 

वटपौर्णिमेच्या निमित्ताने

Submitted by मनीमोहोर on 11 June, 2014 - 13:16

उद्या जेष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा. वडाच्या झाडाला भेटण्याचा निदान त्याचे स्मरण करण्याचा दिवस. वडाचा थँक्स गिव्हिंग डे म्हणा ना. नीट डोळसपणे बघितले तर हे असे दिवस आपल्याला निसर्गाजवळ जाण्याची , आपली त्यांच्याप्रति असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देतात हे ही तितकेच खरे.

विषय: 

मी पेंट केलेले बेडशिटस

Submitted by Avanti Kulkarni on 8 June, 2014 - 13:34

माझे काही आगाऊ कारभार

Submitted by टीना on 7 June, 2014 - 15:19

ग्लास पेंटिंग

१.
1_0.JPG

२.
2_0.JPG

३.
3_0.JPGयाला काय म्हणावं नेमकं ते सुचत नाही आहे …

४.
4_0.JPGक्विलिंग :

५.
5_0.JPG

६.

विषय: 
शब्दखुणा: 

चला..(फुलांची)सप्तपदी शिकू/काढू या!

Submitted by अत्रुप्त आत्मा on 17 May, 2014 - 14:34

माझा फुलांच्या रांगोळ्यांमधला सगळ्यात अवडता प्रकार.
फुलांची सप्तपदी
============================

हम्म्म्म्म...पण हा प्रकार एकंदर सगळ्याच बाबतीत खर्चीक...बरं का! वेळ/पैसा/फुलांची बाजारहाट-ने आण/आणि आमच्या मंगल-कार्यालयातनं यासाठी मिळवून घ्यायचं सहकार्य! या सगळ्याला खर्चीक..हाच टॅग लावावा लागेल. कारण,ही सप्तपदी माझ्याकडनं करवून घेणारा माझा एखादा यजमान असो! (हल्ली क्लायंट म्हणातात ना हो त्यांना!? Wink ) किंवा त्या'खेरीज फक्त सप्तपदी काढण्याची आलेली ऑर्डर असो. घाम काढल्याशिवाय होणारं ,हे काम नाही!
तुंम्ही म्हणाल..काय काय ..असं होतं तरी काय?

विषय: 

Pages

Subscribe to RSS - कला