आपण यांना पाहिलंत का?

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 11 October, 2014 - 02:15

तीन दशकांहून अधिक काळ मराठी व हिंदी अशा दोन्ही भाषांमधील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि नाटके पाहत आहे. अनेकदा असे होते की एखादा चेहरा आवडतो, पण पुन्हा कुठे फारसा दिसतच नाही. माध्यमांतूनही त्या चेहर्‍याची चर्चा होत नाही. जसे काही हा चेहरा सर्वांच्या विस्मृतीतच गेला आहे. नेमका हा चेहरा मला बर्‍यापैकी आठवत असतो, पण इतर अनेकांना त्याचा परिचयच नसतो.

अशाच काही (इतरांच्या) विस्मृतीत गेलेल्या पण मला आवडत असलेल्या या चेहर्‍यांबद्दल.

 1. अभिनव चतुर्वेदी:- हमलोग मालिकेतील नन्हे हे पात्र. या मालिकेनंतर पुन्हा बुनियाद या मालिकेत आणि रिश्ते मालिकेच्या एका भागात पल्लवी जोशीसोबत पाहिले होते, पुन्हा दर्शन नाहीच.
 2. डॉ. पलाश सेनः- फिलहाल चित्रपटात सुश्मिता सेन चा नायक, विद्या बालन सोबत एका विडीओ अल्बम मध्ये नायक व गायक देखील. पुन्हा फारसा दिसला नाहीच.
 3. भानू उदय- स्पेशल स्क्वाड या स्टार वाहिनीवरील मालिकेचा नायक. बराच काळ दूर राहून आता पुन्हा सोनी पल वाहिनीवर डॉक्टरच्या भुमिकेत दिसतोय.
 4. लवलीन मिश्रा:- हमलोग मालिकेतील छुटकी हे पात्र. या मालिकेनंतर पुन्हा स्टार वाहिनीवरील श्श्श कोई है च्या एका भागात इरफान खान सोबत पाहिले होते, पुन्हा दर्शन नाहीच.
 5. काजल किरणः- हम किसीसे कम नही चित्रपटाची नायिका. पुन्हा मांग भरो सजना या चित्रपटात जितेन्द्रसोबत लहानशा भूमिकेत दिसली होती. विक्रम और वेताल च्या दोन भागांमध्येही तिने दर्शन दिले. तिने बहुतेक सर्व बी ग्रेड चित्रपटांतूनच काम केले. तिचे कराटे, सबूत, भागो भूत आया, अंदर बाहर, हमसे बढकर कौन व सात बिजलीयां हे चित्रपट माझ्या संग्रहात आहेत.
 6. वैशाली दांडेकरः- अधांतरी मालिकेची नायिका आणि हमाल दे धमाल चित्रपटात नायिकेची बहीण. पुन्हा दर्शन नाही.
 7. शीतल क्षीरसागरः- रात्र आरंभ चित्रपटातील डॉक्टर. पुन्हा कधीच कुठल्याच चित्रपटात, मालिकेत दिसली नाही. काल अचानक महाराष्ट्र टाइम्स च्या पुणे टाईम्स पुरवणीत दिसली. http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/44755907.cms?prtpa... सत्ताधीश-किस्सा खुर्चीचा, गारंबीचा बापू, इत्यादी नाटकांतून काम करत असते, अर्थात मी अजून पाहिली नाहीत. रामचंद्र पुरुषोत्तम जोशी या आगामी चित्रपटातूनही तिचे दर्शन होईल.
 8. नंदिनी जोग:- काही दूरचित्रवाणी मालिका तसेच पंढरीची वारी, आघात, थांब थांब जाऊ नकोस लांब, कळत नकळत आणि आईशप्पत अशा काही चित्रपटांमधून दिसलेली ही अभिनेत्री आता गायबच झाली आहे.
 9. वन्या जोशी:- हिमालय दर्शन, मैला आंचल, मंझिले, अशा दूरदर्शन मालिका आणि सरदार व संशोधन या चित्रपटांतून दिसलेली ही अभिनेत्री आता कास्टिंग डायरेक्टर बनली आहे.
 10. वंदना पंडितः- अष्टविनायक चित्रपटातून सचिन पिळगांवकर सोबत दिसलेली ही अभिनेत्री पुन्हा कुठेच दिसली नाही.
 11. सोनाली जोशी:- एक्स्क्यूज मी चित्रपटातून आणि एका हिन्दी मालिकेतून श्रेयस तळपदेसोबत दिसलेली अभिनेत्री.
 12. फातिमा शेखः- देव आनंद यांच्या सौ करोड या चित्रपटाची नायिका
 13. सारा खान:- ढुंढ लेंगी मंझिले हमें ही दूरचित्रवाणी मालिका आणि पेबॅक हा चित्रपट यात मुख्य भूमिका केल्यावर ही मध्यंतरी टोटल सियप्पा चित्रपटात नायिकेची बहीण म्हणून दिसली होती.
 14. गायत्री जोशी:- स्वदेस चित्रपटाची नायिका आणि मॉडेल. आयएमडीबीनुसार वाँटेड देखील तिच्या नावावर दिसतोय, मला तरी त्यात दिसली नाही. इतरत्रही फारसे दर्शन नाहीच.
 15. बरखा मदन:- काही दूरदर्शन मालिका, खिलाडीयोंका खिलाडी चित्रपटात सहनायिका, भूत चित्रपटातील भूत आणि सोच लो चित्रपटात प्रमुख नायिकेची भूमिका केल्यावर आता संन्यास घेऊन बौद्ध भिक्खू झाली आहे.
 16. अपर्णा टिळकः- फुटपाथ चित्रपटा इम्रान हाश्मीची नायिका, जीत या स्टार वाहिनीवरील अंकूर नय्यर ची नायिका, लेफ्ट राईट लेफ्ट व कही किसी रोज या मालिकांमधील काही भागांत लहानशी भूमिका तसेच जुन्या सब टीवीवरील एका विनोदी मालिकेत कंवलजीत सिंहच्या मुलीची भूमिका करून आता गायब झाली आहे.
 17. पल्लवी कुलकर्णी:- क्या हादसा क्या हकीगत, वैदेही आणि कहता है दिल या मालिका तसेच बॉबी देओलच्या क्रांती चित्रपटात त्याची बहीणीची भूमिका करून सध्या गायब. https://www.youtube.com/watch?v=Rp_dqBOC9t8&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA
 18. वैदेही अमृते:- अभिनेत्री / मॉडेल. गृहस्थी मालिकेत किरणकुमार सोबत होती.
 19. अमृता रायचंदः- चित्रपट - बात बन गयी, मालिका - माही वे, रिअ‍ॅलिटी शो - ममी का मॅजिक, जाहिराती - व्हर्लपूल, पॉण्ड्स व इतर अनेक.
 20. आरती चांदूरकरः- खतरनाक चित्रपटात महेश कोठारेंची नायिका https://www.youtube.com/watch?v=B7fYRg2vdb4&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA
 21. इंदु वर्मा:- सिद्धांत मालिकेतली आर्किटेक्ट अलका, नायक अ‍ॅडव्होकेट सिद्धांतची क्रमांक २ ची प्रेयसी.
 22. जमुना:- दो फंटूश, अंधेरा चित्रपटांतली नायिका, प्रसिद्ध नृत्यांगना

अज्ञात चेहरे:-

 1. हेच माझे माहेर चित्रपटातील मोहन गोखलेची नायिका.
 2. माझं घर माझा संसार चित्रपटातील अजिंक्य देवची नायिका
 3. देव आनंदच्या बुलेट चित्रपटात डॉ. श्रीराम लागूंच्या कन्येची भूमिका करणारी अभिनेत्री
 4. ताल चित्रपटातील ऐश्वर्या राय सोबत असलेली अभिनेत्री. मी चित्रपट पाहिला नसल्याने तिची भुमिका किती मोठी आहे ते माहित नाही पण इथे https://www.youtube.com/watch?v=p_OoCr4uRhM या गाण्यात ३ र्‍या सेकंदाला निळ्या कपड्यांत दिसतेय. अजून एका गाण्यात अक्षय खन्नाला काही तरी चिडवतेय असे पाहिले होते.
 5. पाप चित्रपटातील जॉन अब्राहम ची बहीण https://www.youtube.com/watch?v=ObRQx4PHeTg&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA

हे चेहरे मी उल्लेख केल्याव्यतिरिक्त आपण कुठे पाहिले असल्यास जरूर नमूद करावे. तसेच आपणांस देखील असे कुठले जनतेच्या विस्मृतीत गेलेले चेहरे आठवत असतील तर त्यांचा देखील उल्लेख करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<अभिनव चतुर्वेदी:- हमलोग मालिकेतील नन्हे हे पात्र. या मालिकेनंतर पुन्हा बुनियाद या मालिकेत आणि रिश्ते मालिकेच्या एका भागात पल्लवी जोशीसोबत पाहिले होते, पुन्हा दर्शन नाहीच.>>>

सौदागर आणि पनाह या चित्रपटातही काम केलं होतं,

<<सारा खान:- ढुंढ लेंगी मंझिले हमें ही दूरचित्रवाणी मालिका आणि पेबॅक हा चित्रपट यात मुख्य भूमिका केल्यावर ही मध्यंतरी टोटल सियप्पा चित्रपटात नायिकेची बहीण म्हणून दिसली होती.>>

बिदाई हि स्टार प्लस वरची तिची मालिका खुप गाजली होती., बिग बॉस या रीयॅलीटी शो मधील एकमेव व्यक्ती जीने रीयॅलीटी शो मध्येच बिग बॉसच्या घरात असताना लग्न केलं

बिदाई हि स्टार प्लस वरची तिची मालिका खुप गाजली होती., बिग बॉस या रीयॅलीटी शो मधील एकमेव व्यक्ती जीने रीयॅलीटी शो मध्येच बिग बॉसच्या घरात असताना लग्न केलं >>>>> ही सारा खान वेगळी आणि धागालेखक म्हणतात ती वेगळी आहे बहुतेक कारण टोटल सिय्याप्पा मध्ये बिदाई/ बिग बॉस फेम सारा खान नाहीये

<<माझं घर माझा संसार चित्रपटातील अजिंक्य देवची नायिका>> - मुग्धा चिटणीस - यांचा काही वर्षांपूर्वी कर्करोगामुळे मृत्यू झाला.

<<वंदना पंडितः- अष्टविनायक चित्रपटातून सचिन पिळगांवकर सोबत दिसलेली ही अभिनेत्री पुन्हा कुठेच दिसली नाही.>>

एकाच चित्रपटात काम करायचं असं त्यांनी ठरवलं होतं. त्यामुळे 'अष्टविनायक'नंतर त्यांनी बराच काळ चित्रपटांत काम केलं नाही. पुन्हा 'मुक्ता'मध्ये त्या होत्या.

नंदिनी जोग अजूनही नाटकांतून काम करतात.

लवलीन मिश्रा युवा, सरदार, सिटी ऑफ जॉय, पांच, ब्लॅक फ्रायडे, तक्षक, गॉडमदर अशा अनेक चित्रपटांत होत्या. गेली अनेक वर्षं त्या नाटकांतून काम करत आहेत. त्या स्वतः नाट्यकार्यशाळाही घेतात.

ममता कुलकर्णी आता साध्वी झाल्यात म्हणे ?? हायला!!!!
साध्वी म्हणजे नक्की काय असते ?? म्हणजे मला जे आतापर्यंत वाटायचे तो अर्थ चुकीचा होता बहुतेक .. एखादी हिरोईन, ते देखील ममतासारखी बिनधास्त .. साध्वी .. कोणी जाणकार प्रकाश टाकेल का? साध्वी म्हणजे काय, कसे होता येते, काय क्रायटेरीया असतात वैगेरे ..

ममता कुलकर्णी आता साध्वी झाल्यात म्हणे ?? हायला!!!! >>> मी पण अशीच तीन ताड उडाले होते बातमी ऐकुन... ती म्हणे हिमालयात होती कुठेतरी तपश्चर्या करत होती आणि आता साध्वी झालीय.

ममता कुलकर्णी हिमालयात तपश्चर्या ! बापरे , म्हणुनच हिमालयतला बर्फ वितळतोय बहुतेक ?

यांचा काही वर्षांपूर्वी कर्करोगामुळे मृत्यू झाला. >>>> फक्त ३० वर्षाच्या होत्या त्या मृत्युसमयी.. किती लहान वयात गेल्या.. त्यावेळी त्यांची मुलगी फक्त ५ वर्षाची होती... सो सॅड Sad

ममता कुलकर्णी आता साध्वी झाल्यात म्हणे ??

म्हणुनच तो वाक्प्रचार प्रचलित झाला असावा की, "करुन करुन भागला/ली नी देव पुजेला लागला/ली .....

मी तेच लिहायला आले होते बॉण्ड... ती बातमी ऐकल्यावर माझ्या मनात पहीला विचार आला तो हाच

तिने एका अन्डर वर्ल्ड डोन शि लग्न केल आहे. विकि गोस्वामि त्याच नाव. त्या दोघानि मुस्लिम धर्म पन स्विकारला आहे. लिन्क वाचा जमेल तेन्वा अधिक माहितिसाठि.

भानु उदय यांच्या बरोबर स्पेशल स्क्वॉड या मालिकेत काम करणारी कुलजीत रंधावा या देखील त्या मालिके नंतर कुठे दिसल्या नाहीत नंतर ८ फेब्रु २००६ रोजी कुलजीत यांनी आत्महत्या केली.

Parambrata Chatterjee - "कहानी" मधला सत्योकी.

क्योंकी सास भी कभी बहु थी (हुश्श्श!! नाव लिहीतानाच दमले) मधली नंदीनीचा रोल करणारी जिच मूळ नाव गौरी कर्णीक आहे बहुतेक ती पण दिसली नाही परत.. तिने त्या मालिकेतल्या तिच्या नवर्‍याचा रोल केलेल्याशीच लग्न केल होत ना?

पियू, परमब्रत बंगाली सिनेमासृष्टीतील टॉपच्या अभिनेत्यांपैकी एक आहे, हरवलेला चेहेरा नाही Happy

गायत्री जोशीने तो एकच सिनेमा करणार असं तेंव्हाच सांगितलेलं असं कुठे तरी वाचल्यासारखं आठवतय
>>>>>>>>

गायत्री जोशीने मी अंगप्रदर्शन करणार नाही असंही तेंव्हाच सांगितलेलं असं कुठे तरी वाचल्यासारखं आठवतय Happy

हे तर कारण नसेल तिची करीअर संपायचे!

खरे तर यावर वेगळा धागाही निघू शकतो. अंगप्रदर्शनाला नकार म्हणजे हिरोईनच्या कारकिर्दिला पुर्णविराम का?

ममता कुलकर्णी >>एक बिनधास्त नटी >> हिमालय >> साध्वी >> अंडरवर्ल्ड डॉनशी लग्न >> मुस्लिम धर्माचा स्विकार ......... हे फारच ईंटरेस्टींग बनत चाललेय !

सॉरी ममता!

Pages

नवीन प्रतिसाद लिहा