वेबमास्तरांना भेटण्यासाठी विलेपार्ले, मुंबई येथे गटग
अधिक माहिती:
मुंबईकरांच्या विनंतीला मान देऊन वेबमास्तरांनी मुंबईत गटगसाठी रूकार कळवला आहे. बोस्टनकडे हवाईमार्गे कूच करायच्या आधी ते आपल्याला भेटणार आहेत. तेवढ्यासाठी ते काही तास लवकर पुण्यनगरीचा निरोप घेणार आहेत.
पुढे विमानतळावर जाण्यासाठी त्यांना सोयीचे व्हावे या दृष्टीने हे गटग पार्ल्यात करण्यात येत आहे. तेव्हा वेस्टर्न, सेंट्रल, हार्बर, टाऊन असे कुठलेही जातिभेद मनात न ठेवता ५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६:३० वाजता पार्ल्यात येणेचे करावे.