मुंबई

व्हाइट बोर्ड

Submitted by घबाड on 20 June, 2012 - 11:54

मला ५ बाय ४ फूट असा व्हाइट बोर्ड हवा आहे. शाळा कॉलेजात असतोतसा.. ज्यावर ड्राय एरेजर पेनने लिहिता येईल. मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे कुठे मिळेल. बोर्ड फक्त लिहिण्यासाठी हवा आहे म्हणजे नॉन मॅग्नेटिक हवा.

साधारण किंमत किती असेल?

भिंतीला लावायला हूक असतात का? की स्टँडही येते त्याच्या बरोबर?

साधारण आकार ५ बाय ४ किंवा ३ फूट
१५० बाय १२० किंवा ९० सेमी.

शब्दखुणा: 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे- आणि मराठी माणसाचे भविष्य काय?

Submitted by पूजा जोशी on 12 May, 2012 - 15:42

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आज (शनिवारी) संध्याकाळी लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बाळासाहेबांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. - म टा ची बात्मी . शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खरच एक वाघ पण काय ते आपल्या मागे मराठी माणसाला एक चांगले नेतृत्व देवू शकतील का ? का आता वेळ गेली आहे? आपले मत------

विषय: 
प्रांत/गाव: 

३ मार्च २०१२ - मुंबई गटग - विनय देसाई

Submitted by नीलू on 24 February, 2012 - 06:56
तारीख/वेळ: 
3 March, 2012 - 06:00
ठिकाण/पत्ता: 
गणेश उद्यान, शिवाजी पार्क, दादर

.
.
मंडळीनू,

आपले हे मा अर्थात विनय देसाई हे भारत दौर्‍यार ईलेत.
सध्या कुडाळाक आसत पण १ तारखेपर्यंत मुंबैत येतले. आणि पुन्हा चार तारखेक माघारा जातले तेव्हा ३ तारीख शनिवारचो मुहूर्त साधून त्येंच्या भेटीचो गटग संपन्न करुया. Happy

एक तर विनयदादांची रविवारी जावची लगबग आसतली आणि काही लोकांका रविवार असो 'फुकट' घालवूक आवाडणा नाय. Wink शिवाय रेल्वेचे मेगाब्लॉक वगैरे यामुळे येवचे वगीच वांदे नको म्हणून शनिवार मुद्दाम धरलो हा.

तेव्हा येवक लागा.
वायच तेव्हढी नोंदणी करा पयली Happy

प्रांत/गाव: 

दिनेशदा - निसर्ग गटग - २२ जानेवारी - महाराष्ट्र निसर्ग उद्यान, माहिम.

Submitted by साधना on 11 January, 2012 - 02:58
तारीख/वेळ: 
21 January, 2012 - 22:30 to 22 January, 2012 - 02:30
ठिकाण/पत्ता: 
माहिमचे महाराष्ट्र निसर्ग उद्यान

आपल्या सगळ्यांचे आवडते व्यक्तीमत्व श्री. दिनेशदा यांचे मुंबईत आगमन झाले आहे.

या भेटीदरम्यान मायबोलीकरांना आणि विशेषतः निसर्गाच्या पारावर गप्पा ठोकणा-यांना भेटायला ते उत्सुक आहेत. (जिस्प्याच्या प्रदर्शनात काही मायबोलीकरांना त्यांनी आधीच दर्शनाचा लाभ दिलाय ते वेगळे Happy )

कोणाच्या घरी भेटण्यापेक्षा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी भेटणे सगळ्यांना सोईचे पडेल असा विचार करुन यावेळी माहिमचे "महाराष्ट्र निसर्ग उद्यान" हे ठिकाण निवडले आहे.

तारिख : २२ जानेवारी २०१२
वेळ : सकाळी ९ ला गेटभेट.

विषय: 
प्रांत/गाव: 

मेधा गटग १३ ऑगस्ट २०११. इन्फिनिटी मॉलच्या फूडकोर्टात.

Submitted by नीधप on 10 August, 2011 - 09:40
तारीख/वेळ: 
13 August, 2011 - 09:30 to 11:30
ठिकाण/पत्ता: 
इन्फिनिटी मॉल, वर्सोवा, मुंबई.

मेधातै भारतात आलेल्या आहेत आणि मुंबईतल्या बर्‍याच जणांना त्या भेटू इच्छितात. तर त्यासाठी हे गटग.
वेळ - संध्याकाळी ७:०० ते ९:००
स्थळ - इन्फिनिटी मॉल, वर्सोवा, मुंबई. येथील टिजिआयएफ (TGIF) च्या बाहेरच्या पायर्‍या.
तिसरा मजला.
त्याच मजल्यावर लॅण्डमार्क आणि फूड कोर्ट आहे.

मॉलकडे जायचा रस्ता:
लिंक रोडने आल्यास लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेटवरून सरळ पुढे जायचे. डावीकडे फेम अ‍ॅडलॅब्ज लागेल मग रहेजाची मोठ्ठी बिल्डींग आणि मग कॉर्नरला सिग्नलच्या इथे इन्फिनिटी मॉल.

माहितीचा स्रोत: 
मीच ती
विषय: 
प्रांत/गाव: 

सत्यसंपदा (अर्थात सत्यजित आणि डॅफोडिल्स) यांना भेटण्यासाठी गटग!

Submitted by नीधप on 13 May, 2011 - 00:33
तारीख/वेळ: 
15 May, 2011 - 08:30 to 10:30
ठिकाण/पत्ता: 
नेहमीप्रमाणेच शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी, शिवाजी पार्क, दादर

सत्यजित आणि संपदा मुंबईत आलेले आहेत त्यांना भेटण्यासाठीच्या गटगची चर्चा फेबु वर चालूच आहे. तरी इथे अधिकृतरित्या गटगची दवंडी.
१५ मे २०११ रोजी संध्याकाळी ६ ला जमूया.
नेहमीच्याच ठिकाणी. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी, शिवाजी पार्क, दादर.
वेळ ८ पर्यंत लिहिली असली तरी ती एक्स्टेण्ड होऊ शकते हे सगळ्यांनाच माहीतीये.. Happy

माहितीचा स्रोत: 
आम्ही सगळेच...
विषय: 
प्रांत/गाव: 

पुरातन नाणे प्रदर्शन...

Submitted by सेनापती... on 23 March, 2011 - 08:13
तारीख/वेळ: 
25 March, 2011 - 00:00 to 27 March, 2011 - 10:00
ठिकाण/पत्ता: 
मराठी ग्रंथ संग्रहालय, मामलेदार मिसळ जवळ, तलावपाळी, ठाणे पश्चिम.

येत्या शुक्रवार ते रविवार (२५ ते २७ मार्च २०११) तीन दिवस पुरातन नाणे प्रदर्शन ठाणे येथे भरणार आहे.

माहितीचा स्रोत: 
आयोजक - शिवस्पर्श प्रतिष्ठान..
विषय: 
प्रांत/गाव: 

'बाफ्फ (Banff) गिर्यारोहण चित्रपट महोत्सव'

Submitted by सेनापती... on 23 March, 2011 - 08:01
तारीख/वेळ: 
26 March, 2011 - 09:30 to 13:00
ठिकाण/पत्ता: 
महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड.

द हिमालयन क्लब आणि कॅनडा हाय कमिशनतर्फे शनिवार दिनांक २६ मार्च रोजी सायंकाळी ६:३० ते रात्री १० ह्या वेळेत 'बाफ्फ (Banff) गिर्यारोहण चित्रपट महोत्सव' मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघात आयोजित करण्यात आला आहे.

एकूण कार्यक्रम साडेतीन तासांचा असून त्यात काही लघुपट दाखवण्यात येतील. ह्यासाठी प्रवेश शुल्क ५० रुपये असून आगाउ नावनोंदणीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा..

द हिमालयन क्लब - ९१ - २२ - २४९१ २८२९

ई-मेल imclubmumbai@yahoo.co.in

माहितीचा स्रोत: 
याहु मेल.
विषय: 
प्रांत/गाव: 

मुंबईतील सार्वजनिक कार्यक्रम

Submitted by रैना on 5 January, 2011 - 23:48
तारीख/वेळ: 
6 January, 2011 - 21:00 to 15 January, 2011 - 21:00
ठिकाण/पत्ता: 
लोकमान्य साहित्य सेवा संघ. विलेपार्ले पूर्व

मॅजेस्टिक गप्पा आणि ग्रंथप्रदर्शन- पार्ले

माहितीचा स्रोत: 
वर्तमानपत्र, इतर
प्रांत/गाव: 

शेझवॉन चटणी

Submitted by गुंड्याभाऊ on 9 September, 2010 - 03:56

साधी सोपि पण झकास शेझवॉन चटणी तयार करण्याची पद्ध्त मला हवी आहे. तरी कृपया ज्यांना माहीत आहे त्यांनी मला सांगावी.... Happy

विषय: 
प्रांत/गाव: 

Pages

Subscribe to RSS - मुंबई