वर्षू नील गटग - मुंबई. फिनिक्स मार्केटसिटी फूडहॉल, कुर्ला. शनिवार, २०/१०/१२, सायं ५ वाजता

Submitted by मामी on 14 September, 2012 - 02:26
ठिकाण/पत्ता: 
पार्ल्यात किंवा दादरात. कोणी आपल्याला उठवणार नाही असं धृवबाळासारखं अढळपद मिळवून देणारं कोणतंही ठिकाण /कॉफीशॉप. सुचनांचे स्वागतच स्वागत!

तर पटापट नाव नोंदणी करा!!!!

काय म्हणता? हे कशाबद्दल आहे तेच कळत नाहीये? काय हे! साधी चायनीज भाषा येऊ नये तुम्हाला? कसं होणार तुमचं?

बरं घ्या आता मराठीतून भाषांतर ....

आपली चायनीज वर्षु नील भारतात येतेय. तिला भेटण्यासाठी शनिवार, २० ऑक्टोबरला संध्याकाळी किंवा रविवार, २१ ऑक्टोबरला सकाळी किंवा २१ ऑक्टोबरला संध्याकाळी असं गटग करायचं आहे.

त्याबद्दल आपापल्या नावाची नोंदणी करा. ठिकाण सुचवा आणि तारीखही कोणती ते सांगा.

जास्त मंडळींना सोईची तारीख ठरवण्यात येईल याची कृपया नोंद घ्या. कोणी याबाबत तक्रार केल्यास त्यांच्याशी चायनीज मधून भांडण्यात येईल.

वर्षु नील गटग शनिवार, २० ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजता फुड हॉल, फिनिक्स मार्कॅट सिटी, कुर्ला इथे आयोजित करण्यात येत आहे.

माहितीचा स्रोत: 
भारतीय हेरखाते
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, October 20, 2012 - 07:30 to 14:29
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षू, नेहमीच मी भारतात नसतानाच, भारतात येते ! त्यामूळे मला टेलिफोनद्वारे सामील होण्याशिवाय गत्यंतर नाही.

कुठलेही कॅफे डे निवडा, कुणीही हाकलत नाही ! मॅक डोनाल्डस चे पण खास हॉल्स असतात.

धृवबाळासारखं अढळपद मिळवून देणारं कोणतंही ठिकाण /कॉफीशॉप>>> सुजाता अ‍ॅनेक्सचा मेझनाईन फ्लोर. पण तिथे स्नॅक्स नाहीत, जेवण मिळतं.

कोणी याबाबत तक्रार केल्यास त्यांच्याशी चायनीज मधून भांडण्यात येईल.
>>> Rofl

मामी तू महान आहेस. Lol

मजा करा(लच) गटगला!

दोन्ही मीरांची वर्णी लागली.

माझं हे पहिलच ग ट ग असेल. मी शनीवारी म्हणजे २० ऑक्टो. संध्याकाळी भेटायचं असेल तर नक्की येणार. कुठेही चालेल दादर, पार्ले, .... त्यातही ठाण्यात असेल तर एका पायावर.......

रविवार म्हणजे जरा प्रॉब्लेम आहे....( लेकीची टर्मिनल सुरु होते आहे त्याच काळात)

प्रि, अतुल, सुशांत - पुण्यामधे २७ ऑक्टोबर ठरवतो आहोत.
>>
धागा काढा प्लिज
आय एम इन Happy

वर्षु, इकडे कधी येते आहेस?

मज्जा करा लोकहो!!!

मामी, तुझ्या सुपिक डोक्याला सलाम!

मामी.. कसलं अनोखं डोकंये तुझं.. थांकु मामी..
'कोणी याबाबत तक्रार केल्यास त्यांच्याशी चायनीज मधून भांडण्यात येईल''.. हसून हसून मेले..!!!
धन्स माझ्या सर्व सर्व मित्रमैत्रीणींनो... मी पण फार फार उत्सुकतेने तुम्हा सर्वांना पुन्हा भेटण्याची वाट पाहतेय..

अरे, चायनीज, मँडरिन मधून मजा करा लोक्स! Happy

कोणत्या नाट्यगृहाचे, कॉलेजाचे किंवा विद्यापिठाचे कँटिन असते तिथे बर्‍याचदा भरपूर वेळ बसता येते. Wink अर्थात मुंबईची कल्पना नाही.

काय हे मुंबईकर! पुण्यातल्या गटगला जास्त उपस्थिती? शोनाहो.

तुम्हारा जमीर (किंवा जे काही योग्य ते) तुम्हे ललकार रहा है, भारी आकडों मे नावनोंदणी करो........
(बहुतेक माझ्या हिंदीपेक्षा माझं चायनीज जास्त चांगलं आहे ..... Uhoh )

नमस्कार, मी नविन सभासद आहे. पण मला ग्रुपला भेटायला आवडेल. दादरमध्ये भेटण्याची आयडीया छान आहे. तुमच्या माहितीकरिता एक छान जागा म्हणजे दादरला मॅक डोनल्ड सुरु होतय... शिवाजी मन्दिर जवळ. तिथे भेटु शकतो आपण सगळे Happy

Pages