मुंबई
पार्ले
कोकणकडा रॅपलिंग करणार का ??
हरिश्चंद्रगड म्हटले की कोकणकडा आलाच ! खास कोकणकड्यासाठी हरिश्चंद्रगडाला भेट देणारेसुद्धा तुम्हाला भरपुर आढळतील.. या कड्याची उंची एकंदर ३००० फुट (२००० फुट सरळ खाली नि १००० फूट घसरणीची खोली पायथ्यालगत).. अशा कोकणकड्यावरुन रॅपलिंगकरणे म्हणजे स्वप्नवत..
माझीही इच्छा होती पण काहि कारणास्तव जमणार नाहीये..
पण ज्यांना हा अनुभव घ्यायचा असेल वा इच्छा असेल त्यांच्यासाठी मी खास या "ट्रेक मेटस - शालोम एडवेन्चर्स आयोजित कोकणकडा रॅपलिंग" या कार्यक्रमाची माहिती खाली देत आहे.. (त्यांच्या कार्यक्रम मी मराठीत अनुवादीत करत आहे..)
कोकणकडा centre rappelling १८०० फूट -:
गप्पागोष्टी
नमस्कार मंडळी,
हे गप्पांचे पान अगदी सर्वांसाठी आहे. या, मस्त मनमोकळ्या गप्पा मारा. ह्या पानावर गप्पा मारायला प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे; वय, विषय, वेळ, सामाजिक स्थान - कसलीच मर्यादा नाही.
मैत्री करा, एकमेकांना मदत करा, धम्माल करा. या पानावर नवीन मंडळींनी यावं, मित्र जोडावेत आणि टिकवावेत अशांचे निखळ, निकोप गप्पागोष्टींसाठी माझ्यातर्फे सर्वांचे हार्दिक स्वागत.
कुणी निंदा, कुणी वंदा, माणसे जोडण्याचा आमुचा धंदा!
ध्यास कलावंतीण सुळक्याचा !
१९ ऑगस्टला मिळालेली पतेतीची आयती सुट्टी.. मग कशाला घरी बसुन आळस देत वाया घालवा.. लगेच नेटवर कुठले ट्रेक करता येईल बघु लागलो नि तोच एक फोटो समोर आला..
खल्लास.. बरेच दिवसापासुन इथे जायचे राहिले होते..म्हटले आता इथेच जायचे.. लगेच मित्राला फोटोसकट माहिती मेल केली नि तोपण खुष झाला !
सारे काही अचानकपणे घाईमध्ये आदल्यारात्री ठरले !
कलावंती दुर्ग हा एक सुळकाच आहे. नेटवर मिळालेल्या माहितीप्रमाणे हा सुळका बाजुलाच लागुन उभ्या असलेल्या प्रबळगडाचे उपांग असुन त्याला कलावंतिणाचा महाल म्हणुनही ओळखले जाते.
भीमाशंकर व्हाया शिडी घाट !
१५-१६ ऑगस्टला काय करायचे ठरवता ठरवाता ऑर्कुटवरील "Trek Mates" या ग्रुपबरोबर भीमाशंकरला जायचे ठरवले.. ह्या ग्रुपमध्ये कुणालाही आधी भेटलो नव्हतो पण गेले एक वर्ष त्यांचे ट्रेकींग ईवेन्टस मात्र वाचत होतो.. त्यांच्याबरोबर जायचे म्हणजे घरातले काळजी करतील म्हणुन एका मित्राला(त्याचा पहिला वहिला ट्रेक !!) घेउन जायचे ठरवले... पहिलाच ट्रेक त्याचा म्हणुन मी त्याला "शिडी घाटचा थरार नि नेहमीची तंगडतोड याबाबत" जाणीव करुन दिली पण त्यानेही उत्साहाने भीमाशंकर पार करण्यास मी फिट आहे सांगितले..
खादाडी: पार्ल्यातली.
पार्ल्याची खाद्यसंस्कृती म्हणा, परंपरा म्हणा नाहीतर खादाडी म्हणा. ती चविष्ट, चारीठाव आहे ह्यात काहीच वाद नाही. अगदी बाबू वडेवाल्यापासून, शर्मा पाणीपुरीवाल्यापर्यंत आणि आरके पासून कॅफे मैलू पर्यंत ती पार्ल्याच्या गल्लोगल्ली पसरली आहे. चला तर. सगळे रेसिडेन्ट आणि नॉन रेसिडेन्ट पार्लेकर्स मिळून लिहूयात इथे.
मुंबईतली खादाडी
मुंबईतल्या खादाडीचं हितगुज.
सगळ्यानाच कितीही इच्छा असली तरी एकाच दिवशी मुंबईतल्या सगळ्या भागात जाऊन खाणं जमेल असं नाही. तेंव्हा एकाच धाग्यावर लिहिण्यापेक्षा, कृपया त्या त्या भौगोलिक विभागाचा नवीन धागा सुरू करा.
म्हणजे आज दादरला जायचंय तर येताना काय काय हादडून येता येईल हे ठरवणं सोपं जाईल.