दिनेशदा - निसर्ग गटग - २२ जानेवारी - महाराष्ट्र निसर्ग उद्यान, माहिम.

Submitted by साधना on 11 January, 2012 - 02:58
ठिकाण/पत्ता: 
माहिमचे महाराष्ट्र निसर्ग उद्यान

आपल्या सगळ्यांचे आवडते व्यक्तीमत्व श्री. दिनेशदा यांचे मुंबईत आगमन झाले आहे.

या भेटीदरम्यान मायबोलीकरांना आणि विशेषतः निसर्गाच्या पारावर गप्पा ठोकणा-यांना भेटायला ते उत्सुक आहेत. (जिस्प्याच्या प्रदर्शनात काही मायबोलीकरांना त्यांनी आधीच दर्शनाचा लाभ दिलाय ते वेगळे Happy )

कोणाच्या घरी भेटण्यापेक्षा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी भेटणे सगळ्यांना सोईचे पडेल असा विचार करुन यावेळी माहिमचे "महाराष्ट्र निसर्ग उद्यान" हे ठिकाण निवडले आहे.

तारिख : २२ जानेवारी २०१२
वेळ : सकाळी ९ ला गेटभेट.

ज्या कोणाला भेटायचे आहे त्यांनी हात वर करावेत. अजुन काही चांगले स्थळ सुचत असले तर तेही सुचवावे. उत्सवमुर्तींना संध्याकाळी लवकर घरी परतायचेय हे लक्षात ठेऊन स्थळ सुचवा. (ते कुर्ल्याला राहतात आणि रात्री उशीराचे परतीचे विमान आहे.)

निसर्ग उद्यानाबद्दल अजुन माहिती - http://www.mumbai77.com/city/1018/gardens-parks/maharashtra-nature-park/

उद्यान रविवारीही सकाळी ८.३० पासुन सं. ४ पर्यंत सामान्य जनतेकरता उघडे असते. ३० पेक्षा अधिक लोकांचा ग्रुप असेल तर गाईडचीही व्यवस्था उद्यान व्यवस्थापक करतात.

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, January 21, 2012 - 22:30 to रविवार, January 22, 2012 - 02:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधना, हिरानंदानी (पवई) ही पण एक सुंदर जागा आहे. जिप्सी येणार असेल तर तो मस्त फिरवू शकेल तुम्हाला. खायला प्यायला अनंत प्रकार उपलब्ध आहेत.

बर वाडीला आता पपनसं मिळतील का? कुठे?

मला पण यायच आहे. साधना वेर्स्टन लाइन वरुन कस यायच? बान्द्रा की माहीमला उतरायच?

बर वाडीला आता पपनसं मिळतील का? कुठे?>
ग्रन्ट रोड वेस्ट भाजी गाल्लीत असतात पपनस.

मी पण येणार Happy पण मला नोंदणी करता येतच नाही आहे या धाग्यावर. नोंदणीचे बटनच दिसत नाहीए Sad

माधव +१
मीही हेच सांगणार होतो. एका दिवसात आपली दोन्ही ठिकाणे होऊ शकतात. हिरानंदानी बाग संध्याकाळी ४ वाजता उघडते पाहिजे तर तोपर्यंत निसर्ग उद्यान फिरूया Happy
हिरानंदानी फिरवण्याची जबाबदारी माझी. Happy

जिप्सी, वर '(३) मायबोलीकर जाणार आहेत' या वाक्याच्या वर तुला 'दिनेशदा - निसर्ग गटग..........' इत्यादी लिहिलेली निळ्या अक्षरातली ओळ दिसते आहे का? तेच बटण आहे नावनोंदणीचं..

हिरानंदानी गार्डन टाईम दुपारी १ ते सात. त्याचं नाव निर्वाणा गार्डन असे आहे. जवळ पास खुप टाईम पास आहे. समोरच गो-कार्टींग आणि गेम सेंटर आहे. टाईमपास शॉपिंग साठी जवळच गॅलेरिया आहे. पिझ्झा हट आहे. बुफे हवा असेल तर पिझ्झा हट च्या वर सॅफरॉन स्पाईस आहे. किंवा ४ इमारती सोडुन संजीव कपुरचं यल्लो चीली आहे. ही माझी कर्म भुमी ( गेली ९ वर्ष) असल्याने हिरानंदानी गार्डन पवई मधील काहीही माहीती हवी असल्यास मला विचारा.

हे जे निसर्ग उद्यान आहे तिथली भेट धारावी बाजुच्या गेट ने की अजुन कुठल्या?

हिरानंदानी गार्डन टाईम दुपारी १ ते सात>>>>येस्स. मीरा मी दुसर्‍या एका बागेबद्दल बोलतोय ते संध्याकाळी ४ लाच उघडते. नोमुरा इमारतीच्या समोरचे.
"सॅफरॉन स्पाईस" माझे फेव्हरीट Happy

हिरानंदानी गार्डन टाईम दुपारी १ ते सात>>>>येस्स. मीरा मी दुसर्‍या एका बागेबद्दल बोलतोय ते संध्याकाळी ४ लाच उघडते. नोमुरा इमारतीच्या समोरचे.>>>>

अच्छा "हेरिटेज गार्डन". ते ही छान आहे. ( मी रोज ऑफिस सुटल्यावर वॉक तिकडेच घेते वेल मिळेल तेंव्हा.) पण निर्वाणा मोठ्ठ आहे. सगळे बसु शकतील असे बरेच ऑप्शन आहेत. दुपारी ऊन पण लागणार नाही, कारण आत खुप झाडी आहे. "हेरिटेज गार्डन" मध्ये तशी झाडी बरीच कमी आहे.

बाय द वे.... तुम्ही नोमुरा+केन्झींग्टन्+फेअरमाँट या आय टी पार्कात आहात की काय कामाला? तिकडुन खिडकीतुन दिसते वाटते गार्डन......

जर म नि. उ. मध्ये गेलो तर धारावी डेपोसमोरुन प्रवेश केलेला बरा पडेल.

वेस्टर्न लाईनवरुन यायचे असेल तर ट्रेनपेक्षा बस बरी पडेल. ३४८ नं. बस समोरुनच जाते. अजुनही इतर बसेस ज्या वेस्टर्न लाईनवरुन बांद्र्यामार्गे सायनला जातात त्याही सगळ्या गेटसमोरुन जात असतील. ट्रेनने मात्र थोडे लांब पडेल. बांद्र्याला (पुर्वेला) उतरुन मग तिथुन सायनला जाणारी बस पकडावी लागेल किंवा रिक्षा.

एका दिवसात आपली दोन्ही ठिकाणे होऊ शकतात. हिरानंदानी बाग संध्याकाळी ४ वाजता उघडते पाहिजे तर तोपर्यंत निसर्ग उद्यान फिरूया

मलाही आवडेल.

यायची ईच्छा आहे पण कन्यारत्नाला सर्कस बघायची आहे.. बघुया कसे जमते ते.. नाव नोंदणि ऐनवेळि करेन..:)

>>यायची ईच्छा आहे पण कन्यारत्नाला सर्कस बघायची आहे..<<<
अहो मग या गटगलाच घेऊन जा तीला, सर्कसपेक्षाही छान करमणूक होईल तीची. Proud

>>यायची ईच्छा आहे पण कन्यारत्नाला सर्कस बघायची आहे..<<<
अहो मग या गटगलाच घेऊन जा तीला, सर्कसपेक्षाही छान करमणूक होईल तीची.>>>>>विजयजी मग तुम्ही पण याच म्हणजे आमचीही छान करमणूक होईल Proud Wink

मी नाव नोंद्णी केली.
मला सांगा की मी अंबरनाथ वरून (सेंट्र्ल लाईनवरून) येणार आहे तर अजून कोणी ट्रेनने येणार असेल तर सायनला भेटून मग एकत्र जाता येइल.
सायनला उतरून निसर्ग उद्यानासाठी टॅक्सी घेता येते का?

मला लेकीला घेऊन दोन दोन ठिकाणी जमणार नाही.. नक्की एक वेळ आणि एक ठिकाण सान्गा न प्लीज.. ठाणेकर कोणी आहेत का?

मला लेकीला घेऊन दोन दोन ठिकाणी जमणार नाही.

वर दिलेला कार्यक्रम एकाच वेळेचा आहे. तेव्हा तु माहिमच्या कार्यक्रमाला अवश्य ये, सोबत निर्मयी आली तर मला खुप आनंद होईल.. (मागच्या गोड आठवणी मी विसरले नाहीय Happy )

हिरानंदानी ज्यांना जमेल त्यांच्यासाठी. मला जमेलसे वाटत नाही, दिनेशनाही जमेल असे मला वाटत नाही कारण त्यांनी संध्याकाळी लवकर घरी परतायचेय हे आधीच सांगितलेय.

मला आवडेल. थोडा वेळ चक्कर मारेन. गाडी गार्डनच्या आत पार्क करायची सोय आहे का? नसल्यास मग रिक्षानेच येईन. तिथे रस्त्यावर पार्किंगला अजिबात जागा नाहीये.

Pages