भारतात टेलिव्हिजन क्रांती झाल्यानंतर थोड्याच दिवसांत विविध वाहिन्यांचे अक्षरशः पेव फुटले. २४ तास बातम्यांची सुरुवात हिंदी-इंग्रजी वाहिन्यांपासून होऊन मग मराठी मध्ये पण झी-२४ तास, स्टार माझा अश्या वाहिन्या आल्या. पण यामधल्या बातमीदारांची आणि निवेदकांची उच्चारांची, व्याकरणाची काही तरी मुलभूत गोची आहे (काही सन्माननीय अपवाद वगळून) असे माझे मत झाले आहे.
काल-परवाचीच बातमी... बेहरामपाड्यात लागलेल्या आगीसंबंधी निवेदक आणि वार्ताहर यांच्यातील संवादः
नि: काय परिस्थिती आहे सध्या?
वा: ही जी आग लागलेली आहे, त्याचे कारण जे आहे ते अजून स्पष्ट नाही झालेले. इथले स्थानिक जे आहेत ... वगैरे...वगैरे
ऑर्कूटवरचे बरेच जण इथं आहेत. तसंच माबोवर भेटलेल्यांचेही ओर्कूट प्रोफाईल आता माहीत होत चाललेत.
ऑर्कूटवरच्या जुन्या बॅचला मात्र आता चैतन्य हरवल्यासारखं वाटू लागलय. ब-याचशा कम्युनिटीज ओस पडल्यात. काही ठिकाणी सदस्यसंख्या घटली नसली तरी सदस्य फिरकतच नाहीत. ज्यांच्या लेखण्यांमुळं काही कम्युनिटीज नावारूपाला आल्या त्या लेखण्याही थंड पडल्यात.
प्रोफाईल व्हिजीटर्सची संख्या लक्षणीय रित्या घटलीय. वैयक्तिक स्क्रॅप्स कमी झालेत. ( नव्या ऑर्कूटमधे स्क्रॅप्स टू ऑल नावाचा प्रकार आहे जो अगदीच रद्दी वाटतो. स्पॅम वाढलेत त्याने).
सकाळ वृत्तपत्रात दि. २४ नोव्हेंबर २०१० रोजी आलेली ही बातमी वाचा. या प्रकारच्या पत्रकारितेला काय म्हणावे??? 
नाग आणि मांजरीच्या झटापटीचे अगदी साद्यंत वृत्त देण्यामागचा हेतू आणि लॉजिक नक्की काय ते केवळ या पत्रकारालाच ठाऊक 
काल दुपारी अलाहाबाद हायकोर्टाने अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणावर आपला ऐतिहासिक निकाल जाहीर केला.
भारतीय राजकारण आणि समाज यावर अतुलनीय प्रभाव टाकणार्या या वादात न्यायालयाने अत्यंत समंजस आणि सर्वसमावेशक निकाल दिला आहे. या निकालाची अनेक वैशिष्ठ्ये आहेत. राम आणि रामजन्मस्थान या दोन्हीला कोर्टाने दिलेली मान्यता, तिथे असलेली मूळ हिंदू वास्तू पाडून त्यावरच मशिद बांधली गेली या गृहितकाला दिलेली मान्यता, रामललाची मूर्ती न हलवण्याचा आदेश आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्या सर्व जागेचे त्रिभाजन करुन लढणार्या सर्वच पक्षांना न्याय देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.