मायबोली दिवाळी अंकाविषयीच्या बातम्या

Submitted by मंजूडी on 5 November, 2012 - 01:06

इंटरनेटच्या माध्यमातील पहिला दिवाळी अंक म्हणून मायबोली - हितगुज दिवाळी अंकाला प्रसिद्धीमाध्यमात मानाचं आणि कौतुकाचं स्थान आहे. आपल्या या ई दिवाळी अंकाविषयी दरवर्षी नियतकालिकांमधून, वर्तमानपत्रांमधून आणि इतर अनेक माध्यमांतून छापून, लिहून येत असतं.

तर, अश्या माहितीसाठी, लेखांसाठी, ऑनलाईन लिंक (असल्यास) देण्यासाठी, अभिनंदन करण्यासाठी हा धागा.

काल, दिनांक ४ नोव्हेंबर २०१२ रोजी 'सकाळ'च्या मुंबई टूडे पुरवणीत छापली गेलेली मायबोली दिवाळी अंकाविषयीची माहिती या दुव्यावर वाचायला मिळेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा.. आज इतके इ-दिवाळी अंक असताना मायबोलीच्या अंकाबद्दल वेगळी मुलाखत आली त्याबद्दल मायबोली प्रशासनाचे अभिनंदन. Happy

केवळ मायबोलीच्या दिवाळी अंकांची एक्स्क्लूझिव्ह मुलाखत! Happy मस्त. मराठी आंतरजालीय विश्वात मायबोलीच्या किती दबदबा आहे हे ह्यातून कळतं.

साजिरा, चांगली उत्तरं दिली आहेस.

मंजू, ह्या मुलाखतीच्या मागचा पडद्यामागचा मुख्य सूत्रधार आहे आनंदयात्री. त्याच्यामुळे ही मुलाखत शक्य झाली आहे हे मी इथे आवर्जून नोंदवू इच्छिते.

मस्तच!
(त्या मायबोली संदर्भात असलेल्या मुलाखतीत, बुकगंगाचे प्रचि टाकुन त्यांची जाहिरात का केली ते नाही कळाले)

असो, ह्या वर्षीच्या दिवाळी अंकाची उत्सुकता अजुन वाढली आहे. Happy

साजिरा, चांगली उत्तरं दिली आहेस.

मंजू, ह्या मुलाखतीच्या मागचा पडद्यामागचा मुख्य सूत्रधार आहे आनंदयात्री. त्याच्यामुळे ही मुलाखत शक्य झाली आहे हे मी इथे आवर्जून नोंदवू इच्छिते >>> ही माहिती दिलीस हे खूप छान झाले, पौर्णिमा.

मा बो प्रशासन, लेखक, वाचक, आनंदयात्री - सर्वांचेच मनापासून अभिनंदन.

वा, वा! अभिनंदन! मायबोली दिवाळी अंकाच्या आजवरच्या सर्व संपादक मंडळांचे, सहभागी लेखक / कलाकार/ तंत्रज्ञांचे आणि मायबोली प्रशासनाचे हार्दिक अभिनंदन! हा वारसा असाच पुढे चालत राहो.
साजिरा, मायबोलीची ठळक वैशिष्ट्ये नेमक्या आणि संक्षिप्त स्वरुपात सांगितल्याबद्दल कौतुक.

मुलाखतीबद्दल अभिनंदन तर आहेच...

मला नेमके वर्ष आठवत नाही, पण मायबोलीच्याच दिवाळी अंकाला, मुंबई मराठी पत्रकार संघाचे
खास मानचिन्ह मिळाले होते. ईट्स्मी ( आरती ) ने त्यासाठी तो अंक सुंदररित्या प्रिंट केला होता, तसेच या मानचिन्ह्साठी उपास ( उपासनी ) च्या वडीलांनी प्रोत्साहन दिले होते.

हे मानचिन्ह स्वीकारण्याचा बहुमान मला मिळाला होता. ते मानचिन्ह मग मायबोलीकडे सुपूर्त करण्यात आले होते.
याबाबतचा जास्त तपशील, इथे आला तर चांगले.

व्व्वा! खूपच मस्त वाटले वाचून..
साजिरा, उत्तरे फारच मस्त... नचिकेत तुझे खास कौतूक!!

माबो प्रशासनाला खूप शुभेच्छा.... Happy

अवांतरः कधी यंदाचा दिवाळी अंक वाचायला मिळतोय असं झालंय!!!

हा खुप जूना अंक आहे. ते प्रशस्तिपत्र आणि मानचिन्ह, यांचा त्या अंकाच्या बीबीवर फोटो पण होता.

अभिनंदन!!! मायबोली अंकासाठी काम करणार्‍या सर्वांचे मनापासुन अभिनंदन. आपण मायबोलीकर आहोत याचा अभिमान वाटतो.