कांती शाह नावाच कल्ट

Submitted by बावरा मन on 15 January, 2013 - 03:17

काल लॅपटॉप वर एड वुड हा रिचर्ड बरटन- जॉनी डेप यांचा चित्रपट बहुदा २८ व्या वेळी पाहत होतो. एड्वर्ड डेविस 'एड' वुड जूनियर हा हॉलीवुड मधला निर्माता आणि दिग्दर्शक. ६० आणि ७० च्या दशकात याने एलीयेन्स, भूत-प्रेत आणि इतर तत्सम विषयावर चित्रपट काढले. पण याची खरी ओळख ही नाही. अमेरिका मध्ये Golden Turky Award नावाचा भन्नाट प्रकार आहे. ज्याप्रमाणे ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा गौरव करतात, त्याप्रमाणे गोल्डन टर्की अवॉर्ड्स सर्वात वाईट चित्रपटाना पुरस्कार देतात. त्यांच्या मते वाईट चित्रपट बनवणे पण एक कला आहे. तर या गोल्डन टर्की अवॉर्ड नि एड वुड ला Worst Director of All Time या पुरस्काराने सम्मानित केले. हा पुरस्कार घ्यायला एड वुड मात्र हाजर राहू नाही शकला. कारण २ वर्षापूर्वीच अती मद्यपान ने तो मरण पावला होता.

रिचर्ड बरटन ने एड वुड वर काढलेला चित्रपट पाहताना मला प्रश्न पडला की एड वुड चा कोणी भारतीय वारसदार असेलच की ज्याने सतत वर्षानुवर्ष वाईट चित्रपट काढले असतील. पण प्रश्न जास्त वेळ टिकला नाही कारण लगेच मला एड वुड चा भारतीय वारसदार सापडला. कांती शाह. एड वुड प्रमाणेच कांती शाह हा मुळीच लाइम लाइट मध्ये नाही. पण त्याने त्याच्याच क्लेम प्रमाणे तब्बल ९० चित्रपटांची लेखन-निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. अनेक मराठी ब्लॉग लेखकाना कांती शाह माहीत आहे तो त्याच्या कल्ट क्लासिक 'गुन्डा' या फिल्म मुळे. 'its so bad that it's good' या सिंड्रोम मुळे ह्या चित्रपटाला कल्ट क्लासिक चा दर्जा मिळाला आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की तिला विनोदाची झालर येते म्हणतात. अतिशय वाईट संवाद, भडक अभिनय, विनोदी रेप सीन्स, व अतिशय वाईट तांत्रीक बाजू असते तेंव्हा गुन्डा सारखा चित्रपट तैयार होतो. एड वुड चे चित्रपट ज्याप्रमाणे तो मरण पावल्यावर कल्ट बनले तसा कांती शाह चा हा चित्रपट प्रदर्शित झालयावर गाजला. पण कांती शाह च दुर्दैव हे की गुन्डा हा मिथुन चा चित्रपट म्हणून ओळखला गेला. या चित्रपत्ाआचा लेखक-निर्माता-दिग्दर्शक कांती शाह हा बाजूलाच राहिला. खर तर गुन्डा चा दिग्दर्शक हीच कांती शाह ची ओळख करून देण म्हणजे त्याच्यावर अन्याय होईल. डाकु मुंनीबाई, गरम,कांती शाह के अंगूर ,लोहा,या सेमी पोर्न चित्रपटांचा लेखक-दिग्दर्शक म्हणून तो सिंगल-स्क्रीन चित्रपट मार्केट मध्ये प्रसिद्ध आहे.

छोट्या आणि सेमी-अर्बन भागात त्याच्या चित्रपटाना लाखोचा चाहता वर्ग आहे. म्हणून काही त्याचे चित्रपट काही सोशल मेसेज द्यायच्या फंदात पडत नाहीत. जे जे म्हणून या छोट्या शहरातल्या प्रेक्षकाना हवे आहे ते ते कांती शाह आपल्या फिल्म्स मधून देतो. त्याच्या सिनेमांवर अश्लिलतेचे आरोप केले जातात. पण कांती शाह कडे या आरोपानवर उत्तर आहे. कांती शाह च्या मते जेंव्हा महेश भट्ट बिपाशा किंवा मल्लिका सारख्याना घेऊन चित्रपट काढतो ज्यात हॉट सीन्स चा भडिमार असतो तेंव्हा महेश भट च्या चित्रपटाना कोणी अश्लील म्हणत नाही आणि मी माझया टार्गेट ऑडियेन्स ला जे पाहिजे ते देतो तर माझया वर अश्लिलतेचे आरोप होतात. आहे की नाही वॅलिड पॉइण्ट?

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे म्हणतात. कांती शाह ला तुम्ही यशस्वी मानत असाल तर त्याच्या यशामागे पण एक स्त्री आहे. सपना तन्वीर. कांती शाह ची बायको. पण ती कांती शाह च्या नुसते पाठीमागे उभी राहून थांबली नाही तर त्याच्या चित्रपटांमध्ये तिने कॅमेरयासमोर पण भरपूर 'योगदान' दिले आहे. कांती शाह च्या जवळपास प्रत्येक चित्रपटात तिने मुख्य अभिनेत्रिची भूमिका पार पाडली आहे. तिचा स्वतहचा असा एक फॅन बेस आहे.

कांती शाह ने त्याच्या २० वर्षाच्या कारकिर्दीत धर्मेन्द्र, मिथून, गोविंदा, मनीषा कोइराला अशा ए ग्रेड अभिनेत्यांसोबत पण काम केल आहे. बी ग्रेड चित्रपटात काम करणारे हे मोठे अभिनेते हा स्वतंत्र लेखांचा विषय. राजेश खन्नाने आपल्या पडत्या काळात वफा नावाचा एक तद्दन ब ग्रेड चित्रपट केला होता. त्यात त्याने केलेले काही सीन्स पाहून त्याच्या चाहत्यांवर वीज पडेल. तीच गोष्ट उर्वशी ढोलकिया या नुकत्याच बिग बॉस सीज़न च्या विजेतीची.

बी ग्रेड चित्रपट हे माझयसारख्या छोट्या शहरातून आलेल्या लोकांच्या अनुभव विश्वाचा अविभाज्य हिस्सा. हा विषय तसा टॅबू म्हणून गणला गेला असल्याने चार लोकात या विषयावर बोलता येत नाही. पण बोलता येत नाही म्हणून या विषयाच मह्त्व कमी होत नाही. कांती शाह हा माणूस त्यामुळे माझयच नव्हे तर लाखो लोकांच्या अनुभव विश्वाचा हिस्सा आहे. कुठलाही आव ना आणता त्याने एक प्रकारे चित्रपट सृष्टी शी आपले इमान राखले. आपल्या प्रेक्षकांशी ेकनिष्ठ राहून त्याना इमान इतबारे हवे ते दिले.भले या माणसाने शोले किंवा दो बिघा जमीन बनवला नसेल पण शेवटी गुन्डा ने त्याला मोठ्या लोकांच्या प्रभावळीत स्थान मिळवून दीलेच. आज IMBD सारख्या वेब साइट वर गुन्डाच मानांकन रणबीर च्या Rockstar, विद्याच्या द डर्टी पिक्चर, आणि चक्क शोले पेक्षा पण जास्त आहे. अजुन एका दिग्दर्शकाला काय हव.

काळ बदलत आहे. चित्रपट सृष्टीची गणित पण बदलत चालली आहेत. मल्टिपलेक्स नि सर्व समीकरण बदलून टाकली आहेत. त्याचा फटका कांती शाह ला पण बसला आहे. डिजिटल क्रांतीच्या या काळात कांती शाह सारख्या एकांड्या शिलेदाराला निभाव धरण अवघड होत जाणार आहे. कदाचित पुढच्या ५ वर्षात कांती शाह नामशेष पण झाला असेल. पण त्याची लेगसी कायम राहणार आहे. रमेश सिप्पी ने एक शोले बनवला आणि तो चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अमर झाला. कांती शाह पण त्या प्रभावळीत राहील याची व्यवस्था गुन्डाने केली आहे. पण कांती शाह आणि एड वुड सारखी लोक आपण त्याना कितीही हसत असलो तरी चित्रपट बनवल्याशिवाय राहू शकत नाहीत. त्यांच चित्रपट बनवण्यावर अतोनात प्रेम असते. कारण ते त्याशिवाय दुसर काही करू पण शकत नाहीत. कांती शाह च पुढे काय होईल या कल्पनेने जीव तुटतो. ज्या माणसाने आपल्यासाठी एवढ केल त्याची काळजी वाटायला नको?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कांती शाह के अंगूर >>> ह्म्म्म्म.. मध्यंतरी आलेल्या 'उडान' मधे ह्याचा उल्लेख आहे Happy

छान माहिती दिलीत. धन्यवाद.

शीर्षक वाचून २४च्या पंक्तीतला वाटल्याने टाळणार होते पण लेखकाचे नाव पाहिले आणि त्यामुळे वाचला. Happy

अतिअवांतर अ‍ॅलर्ट :
पानावरच्या डॉमिनो पिझ्झ्याच्या जाहिरातीतल्या पिझ्झ्यातून गरमागरम वाफा येत आहेत. मस्त वाटतंय बघताना.

सर्वाना धन्यवाद. भारतामधली बी ग्रेड चित्रपट इंडस्ट्री हा गहन चर्चेचा विषय आहे. पण तेवढाच नाजूक. कधी वेगळे वळण लागेल सांगता येत नाही : )

ज्या लोकाणा गुन्डा आणि कांती शाह काय चीझ आहे हे माहीत नाही त्यांच्यासाठी गुन्डा मधला एक सीन. संवाद ऐकुन्च आडवे व्हाल. : )

http://youtu.be/uu3NSXaJ7h8

कांति 'यमक्या' शहा असे स्लार्टीने त्याचे वर्णन केले होते (ते का ते गुंडातील यमकग्रस्त ड्वायलॉग ऐकल्यावर कळेल). गुंडा ग्रेट की लोहा हा मला पडलेला आणि न सुटलेला एक गहन प्रश्न आहे. जय कांति शहा!

http://www.youtube.com/watch?v=965L5_LLx_I

टण्या + १०

क्रांतिशहा चे चित्रपट हे पहायचे कमी व ऐकायचे जास्त असतात... कारण 'शो डोंट टेल' वर त्यांचा अजिबात विष्वास नाही 'शो लेस टेल एव्हरीथिंग' ह्या तत्वावर ते असतात.

उदय, ऊमा, ऊषा, गेला बाजार जागॄतीच्या एक्सपिरंसवर लिव्हलंय जणू. ऊदगीरकर समजून घेतीलच!!! Happy