रंगपेटी

Submitted by रंगराव on 15 July, 2019 - 11:45

काल प्रवासात नेटफ्लिक्सचा तीन और आध‍ाचा शेवटचा एपिसोड पाहिला. एम. के. रैना अन् सुहासिनी मुळेच्या 'कामराज' ची थीम आहे सत्तरीच्या जोडप्याला जगताना मध्येच हरवलेली इंटिमसी. एकाच शॉटमध्ये पुर्ण कथा शुट करण्याच्या दिग्दर्शकीय कौशल्यापेक्षा मी अडकलो तो वेगळ्याच गुंत्यात... अचानक गवसलेला क्षण बांधुन ठेवण्यासाठी ती त्याला म्हणते की आता बाहेर जावु नकोस, tomorrow you will not be same again.

वाटलं, रोजच्या धबडग्यात आपलं जगणं राहुन जातय की काय? काय ते कळतं नाहीय पण वय वाढतंय तसं तसं काहीतरी सुटतं चाललयं. मोठेपणाचं हे ओझं पेलवण्याईतपत आपल्या जाणिवा जाग्या आहेत की फक्त यांत्रिक दिनक्रमात साचेबद्ध ठोकळे आहोत आपण?

प्रवासाचं कारणं होत ते, नविन काहीतरी शिकायचा किडा वळवळलाय परत एकदा! नव्या कोर्सची प्रवेश परिक्षा MIT मध्ये होती. सागर अन् मी तासभर आधीच पोहोचलो सेंटरवर. हिरवळीवर बसुन आजुबाजुची हिरवळ बघत होतो. तेवढ्यात एक मुलगी हसत जवळ आली. डोक्याला बंडाना घातल्यानं आपले पांढरे केसं दिसत नाहीयेत याची खात्री होती. पोरगी होती छत्तीसगडहुन आलेली. सन्डे मॉर्निंगला चिल मारत बागेत फिरत होती. दोन मिनिटात स्वत:बद्दल सांगुन , आमचं येण्याच कारण विचारुन , पुण्याच्या Osssuum मौसमची तारीफ करुन परत आम्हाला परिक्षेसाठी best wishesh देवुन सटकली देखिल.

पुढच्या क्षणाला मी सागरला म्हणालो 'हायला! आपल्या पोरी कधी अश्या धीट व्हायच्या' . .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults