ताई

ताई

Submitted by Yogita Maayboli on 23 July, 2019 - 02:09

अशाच एका आठवणीत भेटलीस आम्हाला तू
प्रत्येक अडचणींना पार करताना दिसलीस आम्हाला तू

 कधी मोठी बहीण, कधी मैत्रीण, तर कधी आई होऊन पाठीशी उभी तुझीच सावली
तुझ्या रूपाने जणू काही मिळाली आम्हाला एक नवीन माउली

 तुझे ते गुबरे गाल,कधी हसताना कधी फुगताना  दिसतातआम्हाला
पण त्यात लपलेली अनामिक चिंता लपवताना भासलीस तू

 तुझ्या डोळ्यातला तो तीळ जणू तुला सगळ्यापेक्षा वेगळेकरून गेला
आणि त्याच डोळ्यात लपलेली काळजी तुझ्या अजूनजवळ घेऊन गेला

 मुलांसाठी राबताना नेहमीच आम्हाला दिसलीस तू
पण त्यातही तुझ्यातल्या "मी" ला शोधताना भासलीस तू

शब्दखुणा: 

आम्चं बाळ...

Submitted by पुरंदरे शशांक on 6 July, 2014 - 23:04

आम्चं बाळ...

पाळण्यात झोपलंय इटुक्लं बाळ
चळवळ करुन दमलंय पार

इटुकल्या बाळाचं नाक नै बट्टऽण !!!
डोळे टकाटका नी डोके पार चमन ... Happy

इटुक्लं बाळ चालवते सायकल
हाता-पायांची किती ती वळवळ

इटुक्लं बाळ काय काय सांग्ते
आईला माझ्या बरोब्बर कळ्ते Happy

प्रिय ताई

Submitted by संतोष वाटपाडे on 31 March, 2014 - 22:46

गेली सासराला ताई दिस सुखात जाईना
तुझा घोगरा आवाज आता कानात येईना॥ धृ ।।

ताई मांडवाच्या दारी
तुजी वरात थांबली
व्हटावर हाक आली
आमी घशात कोंबली
आता रडायाचं न्हाई यकामेका सांगताना
डॊळ्यामंदी पाणी आलं तरी बाह्यर येईना ॥ १।।

वसरीतल्या झोक्याला
तुझ्यासंगं झुलायाचं
यड लागलं जात्याला
तुझ्यासंगं फ़िरायाचं
तुझ्या हातानं बांधल्या सार्‍या गवर्‍या शेणाच्या
चुलीमंदी जाळायाला आई तयार व्हईना ॥२।।

तुझ्याईना सुना सुना
आडावरचा रहाट
बगुण्याच्या बादलीचं
रोज रड्तं चर्‍हाट
ये ना ताई भेटायाला हाका मारायाच्या किती
गाय गोठयातली काळी आज चाराबी खाईना ॥३।।

शांता कुंभारीण ताई
तुला इचारीत व्हती

कळले ताई ?

Submitted by रसप on 16 July, 2013 - 04:02

शाळेसाठी
जातानाचा
डोंगरातला
रस्ता होता
आठवतो का
आता ताई ?

घोट्याइतके
खळखळ पाणी
असलेला तो
ओढा लागे,
त्याच्यानंतर
माळावरच्या
चिखलामधली
पायवाटही
थबथब थबथब..!!
आठवते का ?

रोज तिथूनच
दूर-दूरच्या
शाळेसाठी
चालत जाणे
तरी कधीही
कंटाळाही
आला नाही
आठवते का ?

बरेच चालुन
गेल्यावरती
शाळा येई
तू आनंदी
अन् मी दु:खी
रोज व्हायचो
आठवते का ?

कितीकितीदा
माझ्या बाई
माझ्याबाबत
तक्रारींचा
तुझ्याचपाशी
पाढा वाचत
पण तू कधिही
आईला ना
सांगितले ते
आठवते का ?

मला आठवे
तेच नेहमी
म्हणून अजुनी
आयुष्याच्या
ह्या रस्त्यावर
माझ्यासोबत

वयाची ऐशीतैशी...

Submitted by मोहना on 12 February, 2013 - 22:49

मंडळाचा कार्यक्रम छान रंगला. आलेल्या पाहुण्यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी तरुण कार्यकर्त्याने मीनलच्या नावाचा पुकारा केला,
"आता मी मीनलताईंना विनंती करतो...."
मीनलच्या आजूबाजू्ला असलेल्या आम्ही मीनलताई म्हटल्यावर फिस्सऽऽऽ करुन हसलो. ती पण पदर फलकावित, ताईऽऽ काय..., किती स्वत:ला लहान समजायचं ते असं काहीसं पुटपुटत पुष्पगुच्छ देण्यासाठी गेली.
मीनल परत येऊन बसल्यावर ताई, माई, अक्का असे विनोद करुन झाले. आणि मग मनात तेच घोटाळत राहिलं.

घरी आल्याआल्या मेकअप पुसला. चेहरा खसखसा धुवून न्याहाळते आहे तोच लेक डोकावली.
"किती निरीक्षण करते आहेस स्वत:चं."
"अगं पिल्लूऽऽऽ..."

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - ताई