खालील माहिती हवी आहे.बरीचशी शोधाशोध करुनही न मिळाल्याने इकडे आलो आहे.अाता सर्वजण गणेश आगमनाच्या तयारीत असतील.त्यामुळे नमनाला घडाभर तेल न घालता थेट प्रश्न विचारतो.
1)पूर्वी CNBC या वाहिनीवर GE (General Electric)corporation ची एक जाहिरात लागत असे.बरीच मोठी अशी ही जाहिरात होती.या जाहिरातीत tion वरुन शेवट होणार्या बर्याचश्या शब्दांचा,विशेषणांचा वापर केलेलं हे गाणं होतं याचा व्हिडिओ किंवा Mp3 आंजावर कुठे मिळेल?
साल २००८ पासून सुरु झालेल्या ह्या कार्यक्रमाचा सध्या नववा सिझन चालू आहे. पाकिस्तानातील विविध पारंपरिक गानप्रकारांना नव्या वाद्यमेळासोबत आणि नव्या आवाजात पेश करणे ही ह्या कार्यक्रमाची प्रमुख ओळख. ह्या कार्यक्रमाची कल्पना ज्याच्या डोक्यात आली त्याचे नाव रोहेल हयात. त्यानेच ह्या कार्यक्रमाच्या पहिल्या सहा सिझन्सची निर्मिती केली आहे. २०१४ म्हणजे सिझन ७ पासून स्ट्रिंग्स ह्या प्रसिद्ध बँडने ह्या कार्यक्रमाच्या निर्मितीची जबाबदारी घेतली आहे.
गेले २-३ वर्षे माझा मुलगा तबला शिकतो आहे. आता शाळेमधे ऐच्छिक पियानो क्लासेस आहेत. मधे एका मित्राकडे छोटा किबोर्ड वाजवण्यात बराच इंटरेस्ट दाखवला होता आणि याचेपण क्लासेस असतात का विचारत होता. तेव्हा शक्य झाले नाही. आता शाळेतच शिक्षक येतील आणि त्याच वेळेत होईल म्हणून विचार करतो आहोत.
माझा प्रश्न असा की, तबला आणि पियानो एकमेकाना पूरक आहेत का? तबला तर बंद नाही करायचा. पियानोपण चालू केला तर काही गोंधळ उडणार नाही ना?
What a day ....69 yrs back both India and Pakistan got independence
Indians have become CEOs of Google, Microsoft, Pepsico, Jaguar, Land Rover and
Pakistani have become heads of Taliban, Al-Qaeda, Jammat U Dawa, Hijbul Mujahideen
What a contrast......
Adding a line to this joke ...
India reached Mars and
Pakistan still trying to enter India
'तू प्यार का सागर है...'च्या गीत रसग्रहणच्या निमित्ताने मी तुम्हाला नेतोय थेट ६१ वर्षे मागे ...
येणार का माझ्या बरोबर या अर्थपूर्ण गाण्याची कथा ऐकायला ?
चला तर मग .....
कामाठीपुरयाच्या ११व्या गल्लीत अरुंद बोळांच्या आणि खेटून उभ्या असलेल्या कळकटलेल्या इमारतींच्या भाऊगर्दीत उभी आहे 'आशियाना' ही आता पडायला झालेली इमारत. या इमारतीच्या आठवणी हिराबाईशी अन तिच्या मुलीशी ताजेश्वरीशी निगडीत आहेत. आजही 'आशियाना' हिराबाईच्या मधुर आवाजाला आसुसलेला असेल असं वाटते. 'बच्चुची वाडी' पासून उजव्या हाताला वळून पुढे आले की गल्लीतली सर्वात जुनी इमारत म्हणजे 'आशियाना'. जागोजागी भितींच्या गिलाव्याचे पोपडे निघालेले, आतल्या विटांचे लाल काळे आतडे बाहेर डोकावणारे अवशेष पहिल्या नजरेत तिरस्करणीय वाटतात.
गेल्या वर्षी नोकरी शोधत असताना एक वेगळाच अनुभव आला. इंटरव्ह्यूला गेले तर तिथे ज्यांनी इंटरव्ह्यू घेतला ते मॅनेजर पाकिस्तानी होते. इंटरव्ह्यू छान झाला. अर्थात सर्व बोलणं इंग्लिश मधेच होत होतं आणि तेही अमेरिकेत त्यामुळे तसा विचार करायचं काही कारण नव्हतंच. सर्व बोलणी झाल्यावर मला त्यांनी एक प्रश्न विचारला,"तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना की आमचं ऑफशोअर चं ऑफिस पाकिस्तान मध्ये आहे?" खरंतर भारतीयांनी जगात आय टी मध्ये इतकं नाव मिळवलं आहे (चांगलं आणि वाईट दोन्हीही) की पाकिस्तान वगैरे मध्ये ऑफशोअर म्हणल्यावर मला जरा हसूच आलं. कधी असा विचारच केला नव्हता. अर्थात मला काय इथे बसूनच काम करायचं होतं.
त्याचे झाले काय, पुढच्या विकांताला आमचा शाळासमुह समुद्र बघायला जातोय. बहुतांश जणांचा समुद्र एव्हाना बघून झालाय तरीही पुन्हा बघणार आहोत. कारण फुल्ल टू धिंगाणा घालायचा प्लान आहे. या आधी आम्ही असे फार वर्षापूर्वी डोंगराच्या वेळी आणि नुकतेच हिलस्टेशनवर केले होते. यण्दा हा मान चक्क समुद्राने पटकावला आहे. पण एक गोची आहे. धिंगाणा डान्स करायला पोषक अशी जागा समुद्राजवळ नाही. म्हणून मग समुद्राला भरती आली की दंगा करायचा प्लॅन आहे. पण धिंगाणा करायला ब्रांडेड हॉटेल भाड्याने घेणे आले. किती वेळा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मायबोलीकरांना त्रास देणार. म्हणून यंदा सरळ आमच्या नंदीबैलाला विचारले.