ऊस्ताद राशिद खान

Submitted by हायझेनबर्ग on 30 April, 2015 - 12:21

आओगे जब तुम ओ साजना
अंगना फूल खिलेंगे

ह्या गाण्याने पुन्हा एकदा वेड लावले, पुन्हा म्हणण्यापेक्षा मागच्या कैक वर्षात, तास तास भर रिपिट मोडवर ऐकायच्या माझ्या डझनभर गाण्यांच्या लिस्ट मध्ये ह्या गाण्याचा रिपिट काऊंट पुन्हा नव्याने वाढतो आहे.

ऊस्तादजींची कैक गाणी प्रचंड आवडती आहेतच, पण त्यातल्या त्यात त्यांच्या ठहराव वाल्या, डीप आवाजाची जादू खुलवणार्‍या 'आओगे जब तुम ओ साजना' सारख्या गाण्यांनी कानांवाटे मनाला जो थंडावा मिळतो तो अवर्णनीय आहे.

अताश्या माझ्या रिपिट मोड वाल्या लिस्टमधून कमर्शिअल सिंगर्स एग्झिट घेवून क्लासिकल सिंगिंगच्या प्रचंड कष्टाचा मार्ग चोखाळून आलेले गायक ठाण मांडून बसत आहेत.......कानांना सकस ऐकण्याची सवय होते आहे की वय झाल्याचे लक्षण म्हणावे हे? Proud

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझेही अत्यंत आवडते गायक.

त्यांची ही ठुमरी माझ्या रिपीट मोडवर असते. पहिलाच आलाप जान निछावर वगैरे. श्रोत्यांमधे असलेल्या जाणकारांसाठी गायलं आहे हे जाणवतं. तसंच इसक मधलं झीनी रे झीनी हे ही.

माझा अत्यंत आवडता गायक... मी त्याला क्लासीकल मधे पण नुसता 'राशीद खान' ते 'उस्ताद राशीद खान' ह्या स्टेजेसमधे ऐकले आहे.. लाईव्ह देखील. माझ्याकडे ह्याचं बरंच क्लासीकल कलेक्शन पण आहे , कॅसेटवर ...
(जातीवाचक वाटेल हे वाक्य पण त्या अर्थाने घेऊ नका) मुस्लीम गायकांच्या गळ्यात एक वेगळीच जादू असते असं मला कायम वाटत आलंय... काय खातात नक्की किंवा कोणते जीन्स असतात काय माहित !
--------------------
माझ्या पर्सनल नोट पॅड मधली ही एक जुनी नोट -
राशिद खान.. अमेरिकेला येण्यापूर्वी सवाई गंधर्व महोत्सवात ऐकले होते...
माझा आवडता गायक... २००४ मधे परत एकदा त्याला ऐकले Cleveland ला... राशिद खान ते उस्ताद राशिद खान, फरक जाणवला.
पण हाच गायक इतक्या समर्थपणे एक हिंदी कमर्शियल चित्रपटात गाईल असं कधी इमॅजीन केलं नव्हतं.
जब वी मेट आणि ते आओगे जब तुम साजना असंच माझ्याभोवती झंकारत राहिलं.. राशिद खानच्या ‘तोडी’ सारखंच !
अत्यंत हळूवार आणि नाजूक काँपोझिशन. आणि त्याला वरवर पाहता विसंगत वाटेल असा कमावलेला 'बेस' असलेला राशिद खान यांचा आवाज.
हे गाणं कोणाच्या तोंडी नाही, ते बॅकग्राउंडला वाजतं - ह्यासाठी मी दिग्दर्शकाला मनापासून धन्यवाद दिले हे गाणं पडद्यावर पाहिलं तेव्हा. गाण्याच्या सुरुवातीची प्रीतम ची 'सिग्नेचर गिटार' आणि त्यातून उगम पावून पुढच्या बासरीच्या सुरात मिसळून जाणारा राशिद खानसाहेबांचा आलाप.. खरी हुरहुर लागते ती इथपासूनच.
बरसेगा सावन....साजना.... किती ते हळूवार म्हणलंय. म्युझिकच्या मागून येणारा आलापही तसाच ’डोंगराच्या रांगामधून विहरत येणारा’... आणि खूप काळ रेंगाळणारा.
ह्या मुस्लीम लोकांच्या आवाजात काय जादू असते, उच्चारात काय जादू असते अल्ला जाने !
'नैना तेरे कजरारे' मधला 'कजरारे'चा उच्चार कसला वेगळाच आहे - कातिल ह्यालाच म्हणत असावेत.

ते कधीतरी खिलणारी फुलं.. तो एक दिवस येणारा सावन... ते कधीतरी मिळणारं प्रेम....
या आवाजाबरोबर, या शब्दांबरोबर - आत्ताच का नाही येत आहे समोर... ही लागलेली हुरहुर... ही ओढ.........तो शेवटचा आलाप अधिकच गडद करून जातो.
‘कोणाचा तरी इंतजार’ करायला लावुन राशिद खान गाणं थांबवतो... नंतर उरते नुसती शांतता... आणि ’आओगे जब’ चा अहसास !

माझं अतिशय फेव गाणं आहे हे. आणि असंच बरेचदा रिपीट मोडला ऐकलं जातं. क्लासिकल कडे फारसा कल नसल्याने त्यांची अजून बाकीची गाणी ऐकणं झालं नाहीये. पण कधीतरी ऐकणार आहे हे नक्की. छान लिहीलंय हे सांगायचं राहीलंच Happy

अरे यार रार... अफलातून लिहीलंयस!

रार,
राशीद खान साहेबांची बहुतेक सर्व कमर्शिअल गाणी बॅकग्राऊंडलाच आहेत.

आइयो पियाजी हेही तसंच फार हळुवार गायलं आहे. आणि मलातरी त्यावर आओगे साजनाचा प्रभाव जाणवला.

हो अंजली.. ही नोट 'जब वी मेट' रीलीज झाला आणि हे गाणं पहिल्यांदा ऐकलं तेव्हाची आहे.
त्यालाही आता ८ वर्ष झाली Happy

उस्ताद राशिद खानांची खूप गाणी, भजने, ठुमऱ्या, चीजा माझ्या लाडक्या आहेत. त्यांच्या आवाजातला जो एक 'दर्द' आहे, गाण्यातला ठेहराव आहे, गोलाई, नज़ाकत आहे ती कायमच वाहवा घेऊन जाते. त्यांनी बंगाली रविंद्र संगीताबरोबर केलेलं हिंदुस्थानी शास्त्रीय चीजांचं जे फ्यूजन आहे तेही निव्वळ वेड लावतं. त्यांच्या मुलाखती मी ऐकल्या - पाहिल्या आहेत. त्यांच्या जीवनप्रवासाबद्दल थोडंफार वाचलंय. त्यांचं लहानपण तसं एका प्रकारे खडतरच होतं. कष्टांतून व मेहनतीतून त्यांनी आज जे काही कमावलंय ते फार सुंदर आहे. त्यांच्या मुलाखतीतला एकच भाग मला खटकला. तो म्हणजे पुढील पिढीत त्यांनी आपल्या मुलाला गाण्याचं विधीवत् शिक्षण दिलं आहे व देत आहेत, परंतु मुलीला तसे शिक्षण दिलेले नाही. त्यांच्याकडे मुली बाहेर गात नाहीत. देशोदेशी कार्यक्रम करणाऱ्या या गुणी कलावंताकडून असे वागणे (मला तरी) अपेक्षित नव्हते. पण शेवटी हा सर्व त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. गायक म्हणून त्यांच्याबद्दल खूप कौतुक हे तर आहेच!

रार ... यू आर टोटली ईंन्टू दॅट साँग.

शेकडो धन्यवाद.. मला नाही वाटत 'आओगे जब तुम' ऐकतांना मला जो अनुभव येतो मी तुम्ही मांडलात त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने मांडला असता. तुमचं निरूपण सिंपली पर्फेक्ट.
जस्ट एक नमूद करावेसे वाटते की त्या गाण्याचा विडिओही अप्रतिम आहे म्हणजे सिनेमॅटोग्राफी नाही (ती पण चांगलीच आहे) तर ह्या स्वप्नरंजन करणार्‍या गाण्यातल्या प्रत्येक शब्दाबरोबर विडिओ मध्ये नायिकेच्या स्वप्नांचा एकेक बुरूज ढासळत राहतो हा विचार.
पहिल्याने ऐकतांना गाण्यात काहीतरी प्रचंड अपीलिंग असूनही तुम्ही म्हणालात तसा विसंगत, अनाकर्षक आवाज आणि त्याहून गाण्यातल्या भावाशी ताळमेळ न खाणारे दृष्यचित्रण...असा एक विचित्र अनुभव येतो पण एकदा का प्रत्येक सुराची ताकद आणि थेट काळजात रुतणार्‍या शब्दांची कल्पनातीत सिंपलीसिटी ह्यांचा मेळ बसला की बस्स....रोमांच म्हणजे ते काय अनुभवण्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही.

मी सिनेमा बघितलेला नाही पण एवढ्या अप्रतिम गाण्याचा विडिओ बघण्याची ऊत्सुकता होतीच
https://www.youtube.com/watch?v=ruHOVZKFMoI

जगजित सिंग यांच्या साठी झालेल्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात उस्ताद राशिद खान यांनी गायलेली ',याद पियाकी आये '…ही ठुमरी ऐकताना चित्रा सिंग यांना देखील भरुन आले इतक ते दिलोजानसे गायले. त्यांच्या आधी कितीतरी दिग्गज गाउन गेलेले पण काळीज अनावर आठवांनी गच्च आभाळून आलं ते फक्त उ. राशिदच्याच दर्दचिंब स्वरांनी .…

आम्ची मुलगी तीन वर्षाची असल्यापासून झोपताना त्यांचे गाणे ऐकल्याशिवाय झोपायची नाही. अजूनही (म्ह़णजे गेली १७ वर्षे) रोजचा परिपाठ चालू आहे त्यामुळे आमच्याकडे त्यांना "रतिब खान" म्ह टले जाते.

हे गाणं एकायला खरच कधीही छानच वाटतं. त्यांच्या आवाजानी अजून मोहनी वगैरे घातली नाही पण त्याचा काही भरवसा नाही.
माझं असच तनू वेड्स मनू मधल्या रंगरेझ गाण्याबाबत झालं होतं. एक दिवशी अचानक मला गारदच केलं त्या गाण्यानी!
पुरनचंद वडालींंचा आवाज पण एकदम वेगळाच आहे.

क्लासिकल हा माझ्या डोक्याबाहेरचा प्रान्त. पण उस्तादजींचे 'किरपा करो महाराज मोइनुद्दीन ..'हे अमीर खुश्रोचे ऐकल्यापासून एकदम प्रेमात. सुरुवातीस मला ते हिन्दु भजनच वाटले होते पण ते अजमेरच्या मोइनुद्दीन चिश्तीला उद्देशून अमीर खुश्रोने लिहिलेल्याचे लक्षात आले...

https://www.youtube.com/watch?v=0NmRheqQOao

उस्ताद कोक स्टुडिओतही आहेत बरं.... Happy

मी त्याला क्लासीकल मधे पण नुसता 'राशीद खान' ते 'उस्ताद राशीद खान' ह्या स्टेजेसमधे ऐकले आहे.. मुस्लीम गायकांच्या गळ्यात एक वेगळीच जादू असते असं मला कायम वाटत आलंय... >>> अगदी अगदी अगदी!!!
मस्त लिहीले आहेस रार!
जब वी मेट मधले हे एकच गाणे संदेश शंडिल्यचे आहे, हायली अंडररेटेड म्युझिक डायरेक्टर.

माझं असच तनू वेड्स मनू मधल्या रंगरेझ गाण्याबाबत झालं होतं.

>> माझंपण.

या उस्तादांचे "आओगे जब तुम" हे एकच गाणे ऐकलेले आहे. आता इतर पण मिळवुन ऐकायला हवीत.

मुस्लीम गायकांच्या गळ्यात एक वेगळीच जादू असते असं मला कायम वाटत आलंय... >>> सहमत!! गायकांच्या आणि गायिकांच्यासुद्धा. मस्त पोस्ट रार!

आओगे जब तुम हे माझं पण ऑल टाईम फेव्हरीट गाणं.

डे ड्रिमींग मोड ऑन :-
आपण मस्त ड्राईव्ह करत असावं. बाहेर मस्त पाऊस कोसळत असावा. शेजारी मस्त कंपनी असावी आणि साथीला अशी गाणी. आहा.....

डे ड्रिमींग मोड ऑफ

जबरद्स्त गायक !!

अलबेला सजन आयो...ही बंदिश हिंदी चित्रपटात वापरली आहे...पण हे rendition (मराठी ?) क्या बात.

Raag Ahir Bhairav : Albela Sajan Aayo By Ustad Rashid Khan
https://www.youtube.com/watch?v=D3InRlOwoSg

हा राग ऐकायची ही वेळ नसली तरीही न राहवून अलबेला साजन ऐकलं. अफलातून एक्स्पिरीअन्स आहे! थँक्स, तन्मय.

राशीदखानचं मौसम मधलं 'पुरे से जरासा कम है' पण आवडतं मला... या गाण्यावरचं नोटपॅड शोधायला हवं, सापडलं तर नक्की शेयर करीन... यातला पुरेसे , जरासा या सगळ्या ठिकाणचा 'स' चा उच्चारच से** आहे ... कातीलाना ! Happy

https://www.youtube.com/watch?v=s5HFj-6nfK4

सगळ्याच ऊस्ताद आणि पंडितांची ही आवडती बंदिश असावी बहूतेक
हम दिल.... मध्ये मात्र बहूतेक ऊस्ताद सुलतान खानांनी गायली आहे.

हायझेनबर्ग, रशीद खान आणि जास्त करुन ते गाणं अतीप्रिय आहे Happy

ते त्यांचं मौसम (नवीन, शाहिद कपूर चा) मधलं पण एक गाणं सुरेख आहे.. "पुरेसे जरा सा कम है" Happy

रार, ने आधीच सांगितल आहे होय ईथे या गाण्याबद्दल Happy

वाह, अतिशय सुरेख लिहिलंय ...
इतरांनीही ज्या आठवणी जागवल्यात त्याही बहारदारच ..... जियो ....

अरे.. हा धागा कसा निसटला.. सुरेख चर्चा.

हाझेनबर्ग, मुद्दाम बघितलं ते गाणं... खरच छान चित्रित केलय.
रार... कशी दृश्यरूप पोस्ट आहे तुमची...

उ. राशिद खान अत्यंत आवडीचे गायक. नवं, जुनं ह्याची एक अप्रतिम सांगड घालू शकणारं उमदं व्यक्तिमत्वं आहे. घराण्याचं गायला बसले तर निव्वळ घराण्याचंच... आणि इतरत्रं.. सहजी गोफ विणल्यासारखं गातात.

पंडित भीमसेन जोशींनी गौरवलेला हा कलाकार आहे. एखाद्या नातवानं घराच्या पडवीत बसून आजोबा बरोबर गुजगोष्टी कराव्यात तसं हे ऐका...
तिलंग मधली एक पारंपारिक ठुमरी - पंडितजी आणि उस्तादजी एकत्रं. (३ मिनिटांनंतर गाणं सुरु होतय Happy )

https://www.youtube.com/watch?v=cy4rXTH6ovA

कितीतरी ठिकाणी उस्तादजिंना चाऊटी करण्याची संधी आहे... एकदाही नाही... अगदी एकदाही किंचितही मर्यादा उल्लंघली नाहीये ह्या नातवानं. ठुमरीची नजाकत उस्तादजिंकडून ह्या 'मर्यादित' गाण्यातही ऐकता येतेय.

फ्युजन वगैरेंसाठी - हे सुद्धा धमाल आहे - छिनि रे मोरा चैन मृगनैनिया... कोक स्टुडिओ
https://www.youtube.com/watch?v=dJ2qKHY2ud0

माझ्या लेकामुळे ऐकलं... प्लीज पूर्णं ऐका. शास्त्रीय(च) ऐकणा र्‍यांच्या कानावर ओरखडे आहेत मधल्या ऑर्केस्ट्रेशनमधे.. पण तीच तर गंमत आहे.
असो...
ते ऐकून झाल्यावर दोन दिवसांनी मुल्गा गुणगुणत होता.. छिनी रे मोरा चैन.. त्यातलं ऑर्केस्ट्रेशन हरवलं होतं... जोग उरला होता.
Happy

Pages