विदुषी पद्मा देशपांडे आणि सुधा केदार

Submitted by kulu on 8 January, 2015 - 10:43

यावर्षी सवाई ला जायला मिळाले नाही त्यामुळे बरंच काही मिसंलं. थोडे विडीओज यु ट्युबवर आहेत. ते शोधताना पद्मा देशपांड्यांचा हा व्हिडीओ सापडला.कुठे टाकावं ते कळलं नाही म्हणुन नवीन धागा काढला.

https://www.youtube.com/watch?v=HoTew-nVkb8

त्यांची नवनिर्मिती राग सुधा केदार. त्यात केदार आणि यमन यांचा सुंदर संगम आहे. मी परवा चंद्रनंदन मध्ये म्हटलं तसं, या नवीन रागात देखील स्वतःचं अस्तित्व आहे. भयंकर आवडला. वाईट वाटलं की पद्माताईंनी १० मि. च सादर केला. त्यांच्या आवाजाला एक तिखट धार आहे, त्यात तीव्र मध्यम उठुन दिसतोय. तोच स्वर इथे यमन आणि केदारला जोडतो. अशावेळी स्वतःचा सतारीचा अगदी नवीन शिष्य म्हणुन राग येतो. जर सतार सुंदर वाजवता आली असती तर....... या रागातला आलाप किती सुंदर वाजेल सतारीवर. विषेशतः यमन आणि केदार हे दोन्ही प्रचंड राग आहेत. आणि त्यांच्या या युतीचा आवाका केव्हढा मोठा असेल. जेव्हा कधी बरी सतार वाजवता येईल तेव्हा ह्या रागाच जरा अभ्यास करीन. नक्की ऐका सर्वानी! Happy ऐकताना शुभ कार्याच्या आदल्या दिवशीची रात्र असल्यासारखं वाटलं!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! दोन गोड रागांचा संयोग. ऐकायला हवा सुधा केदार.

शुभ कार्याच्या आदल्या दिवशीची रात्र असल्यासारखं वाटलं>>एक विशिष्ट हूरहूर असते मनात, आनंदाच्या सोबतीला ताणही असतो एक प्रकारचा. तसं काही फीलिंग येतं असं म्हणायचंय का तुला?

बादवे, या नव्या रागांचीही बारशी किती सुंदर केलेली आहेत प्रत्येकाने Happy चंद्रनंदन, सुधा केदार, कलाश्री... पं.रवीशंकरांच्या रागांचीही नावं छान आहेत.

या नव्या रागांचीही बारशी किती सुंदर केलेली आहेत प्रत्येकाने स्मित चंद्रनंदन, सुधा केदार, कलाश्री... पं.रवीशंकरांच्या रागांचीही नावं छान आहेत. >> +१

ह्या नावाबद्दल अशीच थोडी शोधाशोध केल्यावर असे समजले की त्यांनी गायनाचे पहीले धडॅ त्यांच्या आई सुधा रानडे यांचेकडे घेतले. बहुदा म्हणूनच सुधा केदार !

एक विशिष्ट हूरहूर असते मनात, आनंदाच्या सोबतीला ताणही असतो एक प्रकारचा. तसं काही फीलिंग येतं असं म्हणायचंय का तुला?>>>>> सई अगदी हेच! तो ताण वेगळाच असतो अगदी मजेशीर. म्हणजे गंमत येते असा! Happy

रवी शंकरांचा कुठला राग? नवीन रागांची नावे खरंच चांगली आहेत, अगदीच खट, खोकर, जंगला, झिंझोटी, खेम अशी नाहीत Proud