उड जायेगा हंस अकेला कबीर

उड जायेगा हंस अकेला

Submitted by शरी on 11 May, 2015 - 07:45

संत कबीराची ओळख पुस्तकांमधूनच झाली फक्त! त्यांचा वेगळेपण, त्यांचा कर्मठपणाला नकार, त्यांच्या धर्माबद्दल कुणालाच काही माहित नसणं आणि सर्व धर्मांमधले लोक त्यांचे अनुयायी असणं हे सगळं जरी भारावून टाकणारं असलं, तरी ते पुस्तकी माहिती पुरतंच मर्यादित होतं; म्हणजे अजूनही ते तसंच आहे. कारण जसे ज्ञानोबा-तुकोबा आपल्याला त्यांच्या अभंगांमधून, गोष्टींमधून, आषाढी-कार्तिकी वारी मधून भेटले, तसे कबीर कधीच नाही भेटले! त्यांच्या भाषेशी, म्हणजे हिंदीशी पण जुजबीच ओळख! हिंदी सिनेमे पाहणे आणि कामचलाऊ हिंदी बोलणे ह्या पलिकडे ती ओळख गेलेली नाही.

Subscribe to RSS - उड जायेगा हंस अकेला कबीर