हे गाणे कुणाच्या ऐकिवात / वाचनात आहे का?

Submitted by यक्ष on 21 April, 2015 - 06:44

मी बरेच दिवस झाले (वर्षे !) माझ्या आठवणीतील एक गाणं शोधतोय..त्याच्या ओळी थोड्या अश्या आहेत;...."पाओ (?) निरगला मायेचा ?? I ओटी मायेची मोत्यानी भरलीIIधृII....माय अंबिका माय भवानी....रुप देखणे...??....??शब्द निटसे आठवत नाहीत पण चाल (अत्यंत सुंदर) आहे; ती स्मरणात आहे.

कुणास ठाउक आहे कां? कुठे ऐकावयास मिळेल का? माहिती असल्यास कृपया कळवावे.धन्यवाद!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्षमस्व. शोधले पणः
".....Your search - पावनेर गं मायेला करु ओटी मायेची मोत्यानं भरू - did not match any documents.." असे उत्तर मिळाले.
धन्यवाद.

शांता शेळके यांची ही रचना आहे....पवनाकाठचा धोंडी चित्रपटात लतादिदींच्या आवाजात घेतले आहे.

वाट दंवानं भिजून गेली
उन्हं दारात सोन्याची झाली
मायभवानी पावनी आली
पावनेर ग मायेला करू
ओटी आईची मोत्यानं भरू !

माय अंबिका माय भवानी
रूपदेखणी गुणाची खाणी
शंभूराजाची लाडकी राणी
माझी पायरी लागे उतरू
ओटी आईची मोत्यानं भरू !

सुखी नांदते संसारी बाई
न्हाई मागणं आणिक काई
काळी पोत ही जन्माची देई
तूच सांभाळ आई लेकरू
ओटी आईची मोत्यानं भरू !

~ हे गाणे तुम्हाला "आठवणीतील गाणी" या सुंदर साईटवर ऐकायला मिळेल....त्यासाठी http://www.aathavanitli-gani.com/Song/Pavner_Ga_Mayela_Karu ह्या लिंकचा वापर करावा.

वत्सला....

अगं.... लॉगिनची कसलीही अडचण नाही. वर दिलेल्या लिंकवर क्लिक केल्याक्षणीच तू तिथली सदस्या झालीस असे समजले जाते. गाण्यांची माहिती समोर येते त्याचवेळी उजव्या बाजूस गाण्याचे रेकॉर्ड दिसते....बस्स, तिथे प्ले वर क्लिक कर....थोड्याच वेळात गाणे सुरू होते. बाकी तांत्रिक माहितीही त्याच पानावर उपलब्ध करून दिली आहे.

अशी हजारो गाणी आहेत तिथे...माहितीसह. तुला आनंद होईल.

अप्रतीम !! मामाजी !! सापड्ले...
सहस्राब्ज धन्यवाद!!
गेले दोन दिवस जुनी गाणी शोधत जुन्या आठवणींचा धांडोळा घेत होतो म्हणून प्रतिसाद देउ शकलो नाही. मनःपूर्वक क्षमस्व!
आता संग्रह करण्याची चांगली सोय झाली.
पुनश्च धन्यवाद!

>> मी बरेच दिवस झाले (वर्षे !) माझ्या आठवणीतील एक गाणं शोधतोय

अगदी असेच माझ्या बाबत झाले होते. "चिमणी चिमणी पाखरे जमली अंगणी अभ्यासाच्या खेळामध्ये गेली रंगुनी" असे खूप लहानपणी ऐकले होते मला नक्की आठवत होते. पण गाणे कधीचे कोणत्या चित्रपटातील वगैरे गुगल करून सुद्धा पत्ता लागत नव्हता अनेक वर्षे. पण आज गुगल वर सापडले ते सुद्धा जुन्या मायबोलीच्याच एका धाग्यावर:

https://www.maayboli.com/hitguj/messages/34/3581.html?1161870694

"झुंज" मधले ते गाणे इथे अखेर इथे बघायला मिळाले:

https://youtu.be/KIcaPyTLTcc?t=1865

मी सुद्धा खुप दिवसांपासुन हे गाणे शोधतोय ..

आषाढ घन सुन्दरा, आषाढ घन सुन्दरा
अन्बरा, मी प्रणयिनी अधीरा धरा
आषाढ घन सुन्दरा ||
नित्य फुलांची गावी गाणी
मनकवनांची (?) करुन खेळणी
व्हावी राधा धरा
आषाढ घन सुन्दरा||

असे काहिसे शब्द आहेत ..

मला लहानपणी खूप आवडलेल्या गीताच्या ओळी अंधुक आठवतात. - तो एक राजपुत्र मी एक रानफुल.....
हे गाणे कुणी गायलं आहे? कृपया सांगावे.

>> "तो एक राजपुत्र मी एक रानफुल....."

व्ही शांताराम यांच्या चानी चित्रपटातले गाणे आहे हे. पूर्वी वारंवार रेडिओवर लागायचे. गायिका अर्थातच लता मंगेशकर.

https://www.youtube.com/watch?v=gRN4WkNvQu4