बळ
वेदनेच्या आहारी
मृत्युच्या तोंडी असताना
व्यक्त होण्याची
मृत धडपड कुणाला दिसते? समजते?
डोळे भरुन कुणाला पाहता येत नाही
हातात हात घेऊन छातीशी लावता येत नाही
खांद्यावर डोके ठेवून रडता येत नाही
पाठिवरुन हात फिरवता येत नाही
खोल श्वास घेऊन चार शब्द बोलता येत नाही
कुणाच्या शब्दाला ओ देता येत नाही!
एकेक निर्जीव .. गतप्राण झालेल्या
अवयवातली उरलीसुरली शक्ती
काही.. काहीच कामी येत नाही
व्यक्त न होण्याची ही शिक्षा भोगायला
सगळे बळ एकवटून दिलेला...
शेवटचा एक हुंकार पुरेसा आहे!!!
-बी