जागा
काल दिवसभर पायपिट करुन मी संध्याकाळी सात वाजता घरी जायला निघालो तर ती वेळ म्हणजे पीक आवर्सची होती. ट्रेन खच्चून भरलेली होती. इतक्या गर्दीतही मला बसायला जागा मिळाली म्हणून मला फार हायसे वाटत होते. अजून दोन मिनिटात मला पेंग येईल असे वाटत होते पण समोर एक भारतिय जोडपे नुकतेच शिरले आणि त्यांच्यासोबत त्यांच्या दोन लहान मुली होत्या. एक प्रॅममधे बसून बडबड करत होती तर दुसरी सुस्त वाटत होती. तिने जांभळा लेग ईन्स घातला होता आणि त्यावर प्रिन्टेट कुरता होता. ती खूप गोड दिसत होती. तिला जागा देऊ की नको देऊ ह्या मन:स्थित असताना एक दोन ट्रेन स्टेशन निघून गेले. मग मी उठलो आणि त्या मुलीला जागा दिली.