बंगलोरमधील नाट्यप्रेमींसाठी - आसक्तचे नाटक 'एफ वन - वन झिरो फाईव्ह' (रविवार, २७ सप्टेंबर, २०१५ रोजी रंग शंकरा, जेपी नगर)

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

बंगलोर येथील नाट्यप्रेमींसाठी सुवर्ण संधी.
आसक्त, पुणे निर्मीत 'एफ वन - वन झिरो फाइव्ह' या नाटकाचे २ प्रयोग रंग शंकरा, जेपी नगर, बंगलोर येथे रविवार दिनांक २७ सप्टेंबर, २०१५ रोजी दुपारी ३:३० आणि सायंकाळी ७:३० वाजता सादर होत आहेत.
नाट्यरसिकांनी ह्या संधीचा नक्की लाभ घ्यावा ही विनंती.

प्रयोगासंबंधी आधिक माहिती खालीलप्रमाणे :

NatakAd.jpg

लेखक: आशुतोष पोतदार
दिग्दर्शन व नेपथ्य : मोहित टाकळकर
प्रकाश योजना: प्रदीप वैद्य
वेशभूषा: रश्मी रोडे
निर्मिती सूत्रधार: आशिष मेहता
सहाय्यक दिग्दर्शक: तुषार गुंजाळ
स्थिर चित्रण: जय जी, सारंग साठये
कलाकार: मृण्मयी गोडबोले, राजकुमार तांगडे, सागर देशमुख, तृप्ती खामकर, आनंद क्षीरसागर, जीवक मोरे, हृषीकेश पुजारी, ओमप्रकाश शिंदे व आलाप वैद्य

नाटकाविषयी:
मराठी बरोबरच हिंदी, गुजराती आणि इंग्रजी या भाषांमधे घडणारे एफ़- वन/ वन झिरो फ़ाईव्ह हे नाटक माणसांचे भाषा आणि संस्कृतीचे व्यवहार, त्यांची धार्मिक-आर्थिक-सामाजिक व्यवस्था यांच्या नानाविध ‘रंग’ छटा सादर करत समकालिन बहुसांस्कृतिक समाजाचा एक अंधारा आणि दुखरा कोपरा समोर आणते. नासत चाललेले व्यक्तीसंबध, बहुपदरी सत्ताकारण, एकमेकांबद्दल आणि भवतालाबद्दल विश्वास गमावलेले माणसांचे भावनिक विश्व यामधून येणारे रंगांचे भान आणि राजकारण हे नाटक दाखवते. समकालिन बहुसांस्कृतीक समाजातली संकूचित वृत्ती, सामाजिक व्यवस्थांमधली उतरंड, विविध संस्कृतीमधला निखळत चाललेला व्यापक दुवा आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा तीव्र संकोच एफ़- वन/ वन झिरो फ़ायव हे नाटक दचकवून टाकणा-या रंगमंचीय भाषेत सादर करते.
पाठिंबा: इंडिया फ़ाऊंडेशन फ़ॉर द आर्टस, बेंगलुरु.

प्रकार: 

मलाही हे तेव्हा पाहिल्याचे आठवत नाही. बंगलोर बीबीवर लिन्क दिली होतीस का?

मृण्मयी गोडबोले म्हणजे राजवाडे वालीच का?

जाहिरातर्‍ केली असतीस तर अजूनच उत्तम झाले असते.

पुढच्या वेळेस प्रत्येक पानावर जे " तुमची जाहिरात इथे .. " असं दिसतं त्यावर टिचकी मारून जायचे पुढे.

मलाही नव्हते दिसले.
बंगळुर गप्पा धाग्यावर दिले असते किंवा माबो जाहिरातीत दिले असते तर नक्की जाउन पाहिले असते.