मुक्काम पोष्ट घोडपदेव

अंगणात माझ्या....

Submitted by ASHOK BHEKE on 22 March, 2024 - 01:33

हसरा चेहरा आणि साफसुथरा वेष त्याचा
वाजवित डंका,
संगे झिंदाबाद बोलणारा तांडा सारा
अंगणी माझ्या हात जोडीत आले
याचक खरा पण अतृप्त बिच्चारा
विनम्रतेचे भाव लोचनी, अगतिक मुद्रा
माना उंचावीत मताची याचना करावया
अंगणी माझ्या हात जोडीत आले
गोठ्यातल्या गायीने हंबरडा फोडीला
कुत्र्याने देखील भू भू चा नारा दिला
परी साथ हवी अस्तित्व सावराया म्हणोंनी
अंगणी माझ्या हात जोडीत आले
कितीतरी वेळा ते आले, विजयी झाले
भ्रष्टाचारी म्हणून मस्तीत जगले...
निवडणूक येता आमची आठवण झाली
दर्शवीत अभाग्याच्या वेदना

दक्षिण मुंबई लोकसभा कोण बाजी मारणार....

Submitted by ASHOK BHEKE on 2 March, 2024 - 00:14

लोकसभा निवडणुकीचं काऊंटडाऊन सुरु झालंय. मुंबईतील अत्यंत महत्वाचा भाग असलेला मूळ मुंबईचा श्रमजीवी आणि उच्चभ्रू वस्ती असलेला मतदारसंघ म्हणून दक्षिण मुंबई मतदार संघ ओळखला जातो. कुलाबा ते शिवडी, वरळी भागापर्यंत मराठी, मुस्लिमबहुल आणि गुजराती मतदार असलेला हा भाग. आतापर्यन्त या मतदारसंघावर शिवसेना कॉग्रेस खासदार म्हणून निवडून आणले आहेत. सध्या अरविंद सावंत गेली दहा वर्षे या ठिकाणी लोकसभेचे प्रतिनिधित्व करीत आहेत. या जागेवर अनेकांचा डोळा असून शिवसेना पुन्हा अरविंद सावंत यांना मैदानात उतरविणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

विषय: 

सायली मधील य....

Submitted by ASHOK BHEKE on 24 February, 2024 - 22:50

आज सायलीचा वाढदिवस... सायली म्हणजे नाजुक वेळीवरचे साजूक फूल. पण या वेलीचा वृक्ष झाला आणि त्याने इतरांना छायेत घेऊन प्रत्येक बाबतीत पाठराखण तीने करावी. हुशार, प्रतिभावान आणि उत्साही, स्वतःच्या मेहनतीने आणि प्रयत्नाने यशाला गवसणी घालणारी अनेक गुणांची कमतरता नसलेल्या सायलीशी मैत्री करायला नक्कीच आवडेल. कुंभ राशीच्या या मुलीना बुध्दिमत्तेची जोड जन्मत: असते. खूप स्पेशल असतात. मित्रांशी गट्टी जमविताना आपल्या कुटुंबावरचा प्रेमांश ढळू देत नाही. भल्या सकाळी शुभेच्छा द्याव्यात म्हणून मेसेज टाईप करायला गेलो. आपल्या वेगाने टाईप करीत असताना सायली मधील य हे अक्षर येतच नव्हते. उमटत नव्हते.

विषय: 

केरकरांचा वीणाधारी बाप्पा....

Submitted by ASHOK BHEKE on 16 February, 2024 - 08:46

nk.jpgनितिन केरकर.... मुंबई लालबाग काळाचौकी भागातील दिग्विजय चाळीचं साधी राहाणी, उत्तम विचारसरणी, समाजउन्नतीसाठी झटणारे सामान्य व्यक्तिमत्व. माणसाचे मोठेपण ओळखण्यात बराचसा कालावधी जातो, पण नितिन केरकरांच्या मुखाकडे पाहून लागलीच अंदाज येतो. माझ्या लेखन प्रवासातील एक सापडलेली शिदोरी. त्यांच्या विचारसरणीमुळे त्यांच्या सभोवताली एक वलय निर्माण झाले आहे ते मित्रांचे. त्यापैकी आम्ही एक भाग्यवंत. ज्याला भक्तीचे वर्म सापडले त्या घरी शांतता प्रस्थापित होते. नितिन सारखा भक्तीभाव जतन करणारा मित्र लाभणे म्हणजे एक सुवर्णयोगच.

विषय: 

शरद पवार यांचा नवा डाव

Submitted by ASHOK BHEKE on 10 February, 2024 - 02:48

ज्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची स्थापना केली त्या आदरणीय शरदचंद्र पवार यांचा त्यांच्या उतारवयात पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने त्यांचे पूतणे श्री अजितदादा पवार यांना देऊ केले. दुसर्‍याच्या मालावर मिटक्या मारणार्‍या अजितदादा समर्थकांनी यावर जल्लोष केला. फुगड्या खेळल्या गेल्या. फटाके फोडले. गुलाल उधळून आनंद साजरा केला. त्यांना सोशलमीडियावर ट्रोल करण्यात आले. विविध विपरीत शब्दाने त्यांची अवहेलना करण्यात आली. या निर्णयामुळे शरद पवार डगमगतील, रडतील, माझा पक्ष चोरला म्हणून बोंब ठोकतील, असे वाटले होते. पण डगमगेल ते शरद पवार कसले....

विषय: 

Pages

Subscribe to RSS - मुक्काम पोष्ट घोडपदेव