पाली

पुन्हा एकदा सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड

Submitted by पाषाणभेद on 15 January, 2012 - 17:46

पुन्हा एकदा सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड

मागे एकदा पाली -रायगड येथील सरसगडावर गेलो होतो. यावेळी मुलगा अनंत व भाचा शुभम आणि भाची आर्या यांनी सरसगडावर येण्याचा फारच आग्रह केला. मागील पावसाळा संपल्यानंतर सरसगडावर त्यांना घेवून जाणे झाले. त्याची काही छायाचित्रे.

sarasgadh pali maharashtra
सुरूवातीची चढण

गुलमोहर: 

माझी पाली यात्रा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 January, 2011 - 06:07

रविवार सकाळीच ह्यांच्या मित्राचा फोन आला. गाडी नविन घेतली आहे म्हणून पहिला पालीला न्यायची आहे. तुम्ही दोघ पण चला आमच्याबरोबर. आयत्या वेळी असल्याने मी हो-नाही करत होते. कारण घरात कामेही काढलीहोती आठवड्याची. पण मग म्हटल जाऊदे नाही सांगितल तर भाव खातो म्हणून पुढच्यावेळी विचारणार नाही ह्या भितीने आम्ही दोघांनी येतो म्हणून सांगितल :स्मित:. १२ वाजेपर्यंत भराभर कामे आटपुन निघालो. गाडी छानच होती. चालवायलाही दुसरा मित्रच होता. गाडीत गाडीचे मालक नवरा-बायको, मुलगा होता. गाडीत बसल्यावर चर्चेत कळल की आज नॉनव्हेजच खायचे म्हणून दर्शन घेतल्यावर जेउ.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पालीचा गणपती

Submitted by पाषाणभेद on 14 September, 2010 - 10:01

(पाली, ता. सुधागड, जि. रायगड)

|| पालीचा गणपती ||

मंदिर तुझे हे सुबक साजीरे
पालीच्या गणराया रुप तुझे गोजीरे

तुझ्या देवुळाचा आहे नागमोडी रस्ता
आनंद होत असे कळस तुझा दिसता

समोरच्या तळ्यात असे नितळ पाणी
तिथून मंदिर दिसे जसा महाल खानदानी

बाजुस हिरवा परीसर मागे किल्ले सरसगड
हे गणनायक गौरीनंदन वंदन करतो सच्या एक मुढ

- पाषाणभेद

(जालवहीवर पुर्वप्रकाशित)

गुलमोहर: 
Subscribe to RSS - पाली