'ओव्हररेटेड' - 'अंडररेटेड'

Submitted by सामो on 22 May, 2023 - 13:49

चांगुलपणा, बचतीची सवय, करुणा, उत्साही व्यक्तीमत्व, उद्योजकता असे नानाविध गुण असतात, पैकी तुमच्या मते कोणता गुण हा 'ओव्हर रेटेड' आहे आणि कोणता गुण हा 'अंडर रेटेड' आहे. आणि का? तेव्हा एकोळी उत्तर नको. 'का' या प्रश्नाचे सविस्तर उत्तर द्यावे.

माझ्या मते 'सातत्य' = कन्सिस्टन्सी हा प्रचंड अंडररेटेड गुण आहे. उदा. - मैत्री टिकण्याकरता, अनेक प्रकारच्या गुणांचे खरे तर सातत्य लागते. तुम्ही दुसर्‍या व्यक्तीस सपोर्ट करणे, धीराने म्हणजे पेशंटली त्या व्यक्तीचे गुणावगुण सहन करणे. त्या व्यक्तीला काय हवे ते त्या क्षणी ओळखून त्याप्रमाणे सल्ला देणे किंवा क्रिटिसाइज करणे. या सगळ्यात मुख्य म्हणजे सातत्य हवे. हे सातत्य तेव्हा येते जेव्हा, ते नाते निभावण्याची इच्छा असेल.
जॉबमध्येही, एक प्रॉजेक्ट मारे वेळेच्या आधी डिलीव्हर केले आणि दुसर्‍या प्रॉजेक्टला हयगय झाली तर कौतुक होणच शक्य नाही ना. कौतुक तर सोडाच पण तुमच्यावर कोणी विसंबूनही राहू शकणार नाही.

आता 'ओव्हररेटेड' गुण - मला वाटतं स्वकर्तुत्वावर न मिळालेले, वडिलोपार्जित, जेनेटिकली आलेले गुण हे ओव्हररेटेड. उदा - हुषारी. हां मूळात आपोआप आलेल्या हुषारीला तुम्ही धार लावलीत तर ते कर्तुत्व आहे आणि नक्कीच कौतुकास्पद आहे परंतु - वर्ण, जात, जात्याच बुद्धी, पिढ्यान पिढ्या चालत आलेली पारंपारिक कुशलता - या काही गोष्टी मला ओव्हररेटेड वाटतात. अर्थात सर्वांना वाटाव्यात असेही नाही.

ओव्हररेटेड - मराठी शब्द?
अंडररेटेड - मराठी शब्द? (अतिपरिचयात अवज्ञा?)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यश overrated ( अवास्तव महत्त्व दिलं जात)
यशाला, यशस्वी माणसाला खूप जास्त महत्व मिळत, पण त्या मागे नक्की काय आहे ह्याचा तितकासा विचार केला जात नाही. कधी ते शॉर्टकट घेऊन मिळवलेले असते तर कधी पळवाटा काढून, कधी कधी भट्टीत तळपलेल्या सोन्यासारखे राबून, कष्ट करून, ध्येयासक्ती ने.

यश overated आहे.
त्या यशाचा मार्ग underrated आहे.

प्रयत्न, चिकाटी underrated आहे.
त्या प्रयत्नांना यश मिळाले तरच त्याचे कौतुक होते . पण त्या प्रयत्नांचे, जिद्दीचे कौतुक व्हायला हवे.

My two cents

>>>>>त्या प्रयत्नांना यश मिळाले तरच त्याचे कौतुक होते . पण त्या प्रयत्नांचे, जिद्दीचे कौतुक व्हायला हवे.
१००% सत्य!!

दारू, सिगारेट, गुटखा, पानतंबाखू वगैरेचे सेवन न करता निर्व्यसनी असणे हा फार अंडररेटेड गुण आहे.

कित्येक निर्व्यसनी लोकांनाही आपल्याच या गुणाची कदर नसते वा त्याचा अभिमान बाळगता येत नाही.

उलट व्यसने असणारी लोकं यांची खेचतात की तुम्ही काय आयुष्यात मजाच करत नाहीत, व्यसनच नाही केले तर जगलात काय, किती बोअर आयुष्य जगता वगैरे वगैरे आणि हे निर्व्यसनी लोकं निमूटपणे ऐकून घेतात Happy

सौंदर्य हे बरेचदा ओवररेटेड असते पण त्याचवेळी किंवा त्याचमुळे सौंदर्याच्या जीवावर मिळवलेले यश अंडररेटेड असते.
सौंदर्य तर ऊपजत आहे. त्यात काय कर्तुत्व असे सहज समजले जाते. आणि ते खुलवायची, टिकवायची, प्रेझेंट करायची मेहनत आणि स्किल दुर्लक्षिले जाते.
प्रत्यक्षात अक्कलहुशारी एखादे स्किल वा प्रत्येक गुण हा जन्मजात असतो. पुढे तुम्ही त्याला कसे पैलू पाडता हे तुमचे स्वत:चे कर्तुत्व असते.

Overrated = So called ‘News’, Religion, Brands, Politicians & Celebrities Happy

Underrated = Luck, Kindness, Education, Chivalry & Gossips Happy

कर्तृत्व
कर्तृत्व n Capability, power of doing. Agency. Act.
वझे शब्दकोश
न. १ कर्तेपणा; सामर्थ्य; नैपुण्य वाकबगारी; कार्य करण्याची शक्ति. २ कृति; काम; कार्य. 'कर्तृत्व कुमारीचें कळलें । ऋषीनें शापिलें ते वेळे ।' -रावि ३.१०१. [सं.] ॰शक्ति-स्त्री. उत्कृष्टपणें काम पार पाडण्याचें सामर्थ्य, उरक; कार्यक्षमता. (इं.) एफिसीएन्सी. -शिल्पवि ७५२.

दाते शब्दकोश

कर्तुत्व
स्त्री. १ (कर्तृत्व अप.) काम; कार्य; कर्तव्य. 'रजोगुणांचें कर्तुत्व । दाखऊं आतां ।' -दा २.५.६. २ कुशलता; काम करण्यांत चतुराई. ३ पराक्रम; कर्तबगारी; कर्तृत्व पहा. 'कर्तुत्व याचेंन स्वभावें ।' -दा १८.४.३३.
कुठला शब्द ओव्हररेटेड' - 'अंडररेटेड' आहे?

सातत्य
consistency is the virtue of an ass.

दयाळूपणा - underrated
दयाळूपणा म्हणजे कर्णासारखा नाही म्हणायचे आहे. कोणाशीही धीर देणारे, आश्वासक, आधार देणारे बोलणे, सोबत असणे.

ओव्हररेटेड, अंडरेटेड हे वय, परिस्थिती इ.च्या संदर्भात सापेक्ष ठरतं. उदा., १)) आमचा एक मित्र अगदीं लहानपणापासून अत्यंत शिस्तबद्ध व नीटनेटका. इतरांचे पालक आपल्या मुलांना त्यांचं उदाहरण देत. पण त्या मित्राची आई मात्र नेहमी त्याला ओरडत असे, " मेल्या, कसा पोक्त माणसासारखा वागतोस रे या वयात ; इतर पोरांसारखा धिंगाणा घालून माझा ओरडा खायला शिक आतां ! " 2) स्वच्छतेचा फार बाऊ हा चेष्टेचा विषय असला , तरीही करोना काळात तो अतिरेकही एक दैवी गुणच समजला जायचा !

दुसरं, ओवररेटेड आहे की नाहीं हे ठरवायला वस्तूनिष्ठ निकष लावणं अशक्यच असावं. प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार व अनुभवाच्या आधारेच हे ठरवलं जातं व जावं हे उत्तम.

क्रिकेटमध्ये बॅटसमन ओवररेटेड असतात.
तर बॉलर अंडररेटेड.
फिल्डर तर त्याहून अंडररेटेड.
फिल्डींग आणि फिटनेसचे कारण देत खेळाडूंना डावलले तर त्याच्या चाहत्यांना हे कधी पचनीच पडत नाही.

- गेल्या आठवड्यात घरी धोनीचा पिक्चर लावलेला. त्यावरून हे आठवले.

स्पोर्टस आणि ईतर कला आजही अंडररेटेड आहेत.
आपण कितीही शिक्षणपद्धती आणि पालकांची मानसिकता बदलली असे बोलत असलो तरी मुलांच्या शाळेच्या व्हॉटसप ग्रूपवर हे जाणवतेच की आजही पालक अभ्यासातील यशाच्या मागेच धावत आहेत.

यावर नंतर वेगळा धागा काढेन.
घरी हा वाद फार असतो आमच्या..

माझ्या मते 'सातत्य' = कन्सिस्टन्सी हा प्रचंड अंडररेटेड गुण आहे. + १००

वेळ पाळणे- अन्डररेटेड
वेळ पळणाऱ्याला लोकं गृहीत धरायला लागतात आणी बऱ्याच वेळा तर ह्या गुणाची खिल्ली उडवल्या जाते.

Overrated = So called ‘News’, Religion, Brands, Politicians & Celebrities Happy

Underrated = Luck, Kindness, Education, Chivalry & Gossips Happy >>>>>>> मी हेच लिहिलं असतं. I could not agree more.

माझ्या मते 'underrated' हा शब्द खूप overrated आहे.
याला व्हायसे व्हर्सा सुद्धा करता येईल Happy

बाई दवे
ईंग्लिश भाषा सुद्धा खूप ओवररेटेड आहे आपल्याकडे
आणि संस्कृत भाषा त्याहून जास्त.

>>>>>>>>Overrated स्तोम माजवणे
Underrated कमी/तुच्छ लेखणे
धन्यवाद दसा!! अगदी चपखल.

Overrated = So called ‘News’, Religion, Brands, Politicians & Celebrities
Brands, Celebrities - बद्दल सहमत

>>>>>Democracy is so overrated
मला नाही पटले. हुकुमशाहीचा आपल्याला अनुभव नाही.

>>>> Consistency is the virtue of an ass
Emersion ने वेगळ्या संदर्भात म्हटलेले आहे. लर्निंग-अनलर्निंग.
मी सतत धरसोड न करणे, रिलाएबल रहाणे या संदर्भात म्हटलेले आहे.

>>>>>माझ्या मते चांगुलपणा हा एक अंडररेटेड गुण आहे. होय अति अंडररेटेड. किंबहुना हा गुण नसलेलाच बरा अशा रीतीने लोक दुगाण्या झाडत निघून जातात.

>>>>>>The most underrated is Luck.
यु टु ब्रुटस Happy
ज्योतिषात लक तर बघतात लोकं Happy

Pages