Submitted by नंदिनी on 17 January, 2013 - 05:07
मला गणपतीच्या पूजेसाठी लागणार्या पत्री आणि फुलांमधील काहींची नावे इंग्लिशमधून हवी आहेत. बोटॅनिकल नाव देऊ शकलात तर उत्तम.
१. मधुमालती.
२. माका (म्हणजेच भृंगराज का हे कन्फर्म करायचे आहे)
३. डोरली
४. अर्जुन सादडा
५. मरूवा
६. जाई
८. अगस्ती.
फुलांमधे:
१. बकुळ,
२. उंडीच्या झाडाचे फूल
३. नांदुरकीचे फूल
४. चवईच्या झाडाचे फूल
५. कावळा नावाच्या झाडाह्चे फूल (याला संस्कृतमधे गोविंदपुष्प म्हटलय)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नंदिनी माका म्हणजेच भृंगराज.
नंदिनी माका म्हणजेच भृंगराज.
गणपती पूजेसाठी लागणारी फुले व
गणपती पूजेसाठी लागणारी फुले व पत्री
फुले:
१. लाल कमळ
२. मंदार
३.चाफा
४. केवडा
५. गोकर्ण
६. जाई
७. जास्वंद
८. शेवंती
९. गुलाब
१०. पारिजातक
पत्री
१. मोगरा
२. माका
३. बेलाचे पान
४. पांढर्या दुर्वा
५. बोरीचे पान
६. धोत्र्याचे पान
७. तुळस
८. शमी
९. आघाडा
१०. डोरली
११. कण्हेर
१२, रुई
१३ अर्जुन सादडा
१४ विष्णुक्रांता
१५. डाळिंब
१६. देवदार
१७. पांढरा मारवा
१८. पिंपळ
१९. जाई
२०. केवडा
२१. अगस्ति पत्र
वरील माहीती चातुर्मास
वरील माहीती चातुर्मास पुस्तकातुन दिलेली आहे.
मस्त विवेक [आता काहीही रेफर
मस्त विवेक
]
[आता काहीही रेफर करा पण त्यान्ची इन्ग्रजी नावेही द्या
१. मधुमालती. -- Combretum
१. मधुमालती. -- Combretum indicum
२. माका - भृंगराज - Caesulia axillaris
३. डोरली - Geodorum densiflorum ??
४. अर्जुन - Terminalia arjuna
सादडा - Terminalia elliptica
५. मरूवा - मरवा - Origanum majorana
६. जाई - Jasminum auriculatum
८. अगस्ती - Sesbania grandiflora
विवेक धन्यवाद. माझ्याकडे
विवेक धन्यवाद. माझ्याकडे लिस्ट ऑलरेडी आहे फक्त मला इंग्रजीनावे हवी होती.
माधव अनेको धन्यवाद.
या २१ पत्रींपैकी, बहुतेक
या २१ पत्रींपैकी, बहुतेक पत्री(पिंपळ, आघाडा इ.), पण पुढील पत्री कुठे मिळू शकतात?
पांढर्या दुर्वा
डोरली
अर्जुन सादडा
विष्णुक्रांता
देवदार
पांढरा मारवा
अगस्ति पत्र
एखाद्या नर्सरी, बागेत सापडतील का?
माफ करा हा प्रश्न विषयबाह्य आहे. पण दरवर्षी या पत्रींऐवजी दुर्वा वाहून काम चालवावे लागते म्हणून हा प्रश्न विचारतोय.
अर्जुन,देवदार,पांढरा
अर्जुन,देवदार,पांढरा मरवा-रोपवाटिके मधे मिळतो,
(अर्जुन,देवदार यांचे मोठे वृक्ष असतात ,रोपे खुप असतील तर पान मिळु शकेल)
अगस्ती- म्हणजेच हादगा ,याचे रोप सुध्दा रोपवाटिके मधे मिळते,
विष्णुक्रांता-हे खुप छोटे तण असते,छोट्या बटना एवढे निळे फुल असते.शक्यतो माळरानात सापडते.
या लिंक मधे विष्णुक्रांता
या लिंक मधे विष्णुक्रांता आहे-http://www.flickr.com/photos/dinesh_valke/4801783131/in/photostream/
बकुळ = Mimusops elengi उंडिचे
बकुळ = Mimusops elengi
उंडिचे झाड नक्कि माहिति नाहि पण calophyllum inophyllum linn बघ सर्च करुन हेच आहे का ते
बाकि ३-५ फुलांची नावे आताच पहिल्यांदा ऐकते आहे त्यामुळे माहित नाहि.
रूई म्हणजे "मांदार" की
रूई म्हणजे "मांदार" की "मंदार"?
रुई म्हणजे मंदार.
रुई म्हणजे मंदार.
नंदिनी, इथे मंदार/ रूई चे
नंदिनी,
इथे मंदार/ रूई चे नाव Calotropis procera असे दिसते आहे. मी पांगारा वृक्षाचे एक नाव सुद्धा मंदार असे वाचलेले आहे.
http://ayurveda-florida.com/Ayurvedic_Materia_Medica_Articles/Table2.htm
मंदार वृक्षाखाली तपस्या केली
मंदार वृक्षाखाली तपस्या केली वगैरे संदर्भ असतील तर रूईचे झाड नसेल ना ते? रूई म्हणजे हनुमानाच्या गळ्यात बांधतात त्याच पानांचे झाड ना? मग अनुदोन म्हणतेय तसं पांगारा वृक्ष असावा असं मला वाटतय.
माझ्याकडे नुस्तीच एवढी लिस्ट आहे फोटो वगैरे पण काही नाहीत त्यामुळे क्रॉस रेफरन्स करणार तरी कसा??
एक शंका. पुजेमध्ये पत्रीचे
एक शंका. पुजेमध्ये पत्रीचे प्रयोजान काय असते?? आणि ठराविकच झाडांची पाने कां वापरली जातात??
भ्रमा, बहुतेक झाडांचे (बहुतेक
भ्रमा, बहुतेक झाडांचे (बहुतेक सगळी झुडपेच आहेत) काही ना काही उपयोग आहेत. ती प्रत्येक कुटुंबाने आपल्या परसात बाळगावीत, त्यांची काळजी घ्यावी हा पत्रीमागचा उद्देश. आज मात्र त्या कल्पनेचे मातेरे झाले आहे. एकतर आजकाल ही झाडे कोणी लावत तर नाहीतच पण पत्रीच्या नावाखाली झाडाला ओरबाडले मात्र जाते.