मखर

मखरासाठी कल्पना सुचवा

Submitted by _प्राची_ on 17 August, 2013 - 10:32

घरच्या गणपती साठी मखर बनवायचे आहे. कोणाकडे काही चांगल्या कल्पना असतील तर इथे सांगाल का ?
मी घरीच मातीचा छोटा गणपती बनवते. मखर करताना शक्यतो विघटनशील वस्तूंचा वापर करण्याची इच्छा आहे.
इथे या दिवसात मोराची पिसे चिक्कार सापडतात. ती वापरून गेल्या वर्षी मयूरासन बनवले होते.

mayoor.jpg

विषय: 
शब्दखुणा: 

मोड.... (अनपेक्षीत वळण, Turning Point).....

Submitted by गिरिश देशमुख on 16 November, 2010 - 06:51

imagesCAYEG12T.jpg

नकळत जीवनात
मोड असा लागला
गेले सारे कसे कुठे
राहिलो मी एकला...

गरजेस्तव जो तो
संगती ने चालला..
मखरात स्थापुनी मला
कुठे चालता जाहला...

शिखरावर भोगतो मी
एकान्ती असली सजा
मीच इथे माझा राजा
मीच असे माझी प्रजा...

गुलमोहर: 

गणपतीसाठी मखर / सजावट

Submitted by सोनपरी on 22 July, 2010 - 13:34

गेल्या ३ वर्षापसुन मी घरी (उसगावात) गणपती बसवतेय. दर वेळेस देव्हार्याच्या बाजुलाच असतो गणपती बाप्पा, आता ह्या वेळी मखर / सजावट करावी असे मनात आहे. ईथे मला काय काय साहीत्य मीळेल, काय करता येईल (जसे आपल्याकडे थर्माकोलचे तयार खांब मीळतात) आणी माझ्या ४ वर्षाच्या मुलीला सहभागी करुन करता येइल असेही पर्याय सुचवा मला.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - मखर