राजस्थान

उदयपूर - द लेक सिटी आणि जवळपासच्या ठिकाणा बद्द्ल माहिति हवी आहे

Submitted by चित्रा on 25 November, 2015 - 09:05

ट्रीप साठी उदयपूर - द लेक सिटी आणि जवळपासच्या ठिकाणा बद्द्ल माहिति हवी आहे.
पुण्यातून निघणार आहोत.

रैल्वे, बस आणि इतर खर्चाचा अंदाज दिल्यास खूप मदत होईल. साधारण ४ रात्री आणि ५ दिवसाच्या ट्रीप चा प्ल्यान आहे.

धन्यवाद!!

माहिती हवी आहे - राजस्थान, पंजाब भटकंती.

Submitted by मनोज. on 19 May, 2015 - 08:04

नमस्कार मंडळी..

जुलैचा दुसरा आठवडा ते ऑगस्ट या दरम्यान कधीतरी ९-१० दिवस सुट्टी घेवून अमृतसर भटकण्याचा विचार सुरू आहे.

सध्या ठरलेला आराखडा म्हणजे पुण्यातून अमृतसर पर्यंतचा रस्ता दुचाकीने पार करणे व जालीयनवाला बाग, वाघा बॉर्डर*, सुवर्ण मंदिर तसेच राजस्थानातील वाटेत असणार्‍या ठिकाणांना भेटी देणे इतकाच आहे.

एकूण ३ दुचाकींवर ३ जण जाण्याचे ठरवत आहोत. पुणे - अमृतसर - पुणे असा साधारणपणे ४००० किमीचा संपूर्ण प्रवास दुचाकीनेच होणार आहे. साधारणपणे ६ दिवस संपूर्ण प्रवासात जातील व ४ दिवस अमृतसर व वाटेतली ठिकाणे बघण्याचे ठरवत आहोत. राखीव दिवसही गृहीत धरले आहेत.

विषय: 

नीमराणा फोर्ट - राजस्थानची देखणी झलक

Submitted by मामी on 30 October, 2014 - 15:03

भारताला अत्यंत संपन्न ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या ठेव्याच्या खाणाखुणाही भारतभर अनेक रुपांत विखुरल्या आहेत. त्यातीलच एक रत्नं म्हणजे ऐतिहासिक वास्तू. गड, किल्ले, राजवाडे, वाडे , गढ्या अशा विविध स्वरुपात हा वैभवशाली गतकाळ आपल्या आठवणी जपून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पण सरकारी अनास्था आणि जनतेची उदासिनता यामुळे हे अवशेष ढासळत जातात.

उद्घाटन

Submitted by आतिवास on 14 November, 2013 - 06:23

“नमस्कार” एवढ्या गर्दीत त्या गृहस्थांनी मला नमस्कार केला.
प्रतिक्षिप्त क्रियेने मीही नमस्कार करती झाले.
“कोण आहेत हे?” मी शेजारी बसलेल्या माणसाला विचारलं.
“अरे, तुम्हाला माहिती नाही? सांसद आहेत ते आपले.” त्याने आश्चर्याने मला न्याहाळत सांगितलं.

कागदी राजस्थान : एक अप्रतिम कलाकुसर

Submitted by अवल on 20 September, 2012 - 08:27

माझी मावस-आत्ये सून ( माझ्या बहिणीच्या नणंदेची सून ) एक गुणी कलाकार. तिच्या अनेक कलाकृती नेहमीच वाखाणण्याजोग्या. या वर्षी ती आणि तिच्या दोघी मैत्रिणी अन त्यांच्या लेकींनी त्यांच्या सोसायटीच्या गणपतीची सजावट फार फार सुरेख केली आहे. मला त्यांची ही कला इथे दाखवावी वाटली, अन त्या तिघींनी तशी लगेच परवानगीही दिली. त्या तिघींचे मनापासून आभार अन कौतुकही.

विषय: 

राजस्थानी खाद्यसंपदा

Submitted by प्राजक्ता on 19 April, 2012 - 10:37

मला माझ्या मुलिच्या रविवार शाळेतील पोर्जेक्ट साठी राजस्थानी खाद्यसंपदेवर माहिति हवि आहे, विशेषतः तिथल्या धान्य, खाद्यपंरपरा,विशेष सणवार आणि त्यायोगे केलेले वेगवेगळे शाकाहारी ,मासांहारी,गोड्,तिखट पदार्थ..कुणि इथे राजस्थानचे असेल तर तुमची घरची पाकक्रुती शेअर कराल का?फोटो देवु शकलात तर अजुनच छान!

विषय: 

उदंड देशाटन करावे - राजस्थान ... भाग ३ - कुंभळगड़ मार्गे ठंडीबैरी ... !

Submitted by सेनापती... on 2 November, 2010 - 06:10

उदंड देशाटन करावे - राजस्थान ... भाग २ - वीरों का मठ मार्गे कुंभळगड़ ... !

Submitted by सेनापती... on 28 October, 2010 - 16:21

उदंड देशाटन करावे - राजस्थान ... भाग १ - मालघाट मार्गे फूटादेवल ... !

दुसऱ्या रात्रीचे 'घोराख्यान' ऐकून झाल्यावर सकाळी जागे झालो तेंव्हा चांगलेच उजाडले होते. पण जाग आली होती ती छपरावर नाचणाऱ्या माकडांमुळे. १-२ नाही तर अख्खी टोळी होती त्यांची. आम्ही सर्व सामान पटापट आवरून घेतले आणि त्यांचे फोटो काढायला लागलो. एकेकाची शेपटी ही........ मोठी. फोटो तर बघा काय सही आले आहेत त्यांचे.

उदंड देशाटन करावे - राजस्थान ... भाग १ - मालघाट मार्गे फूटादेवल ... !

Submitted by सेनापती... on 27 October, 2010 - 16:04

मुख्य टीप : वाचायला बसायच्या आधी काहीतरी खायला घेऊन बसावे नाहीतर खाऊन बसावे... वाचल्यावर भूक लागल्यास धागाकर्ता कुठलीही जबाबदारी घेणार नाही... Lol

Pages

Subscribe to RSS - राजस्थान